बागेश्री देशमुख
प्रकाशित साहित्य
4
वाचक संख्या
61,181
आवड संख्या
2,733

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

नाव : बागेश्री प्रसाद देशमुख उपाख्य : बागेश्री व्यवसाय : नोकरी (Sr. Manager at Reliance Communications Ltd) अनुदिनी: http://venusahitya.blogpost.com साहित्य विषयक : मी प्रथमतः एक वाचक आणि नंतर एक लेखिका आहे. अनेक प्रकारचं मराठी साहित्य वाचत रहायला आवडायचं, आजही किमान दोन पाने वाचल्याशिवाय दिवस संपत नाही! सुरूवातीला प्रत्येक पुस्तक वाचून झाले की, त्या पुस्तकाबद्दल काय वाटलं, मनावर कुठला नवा संस्कार झाला ह्याचं टिपण काढून ठेवण्याची सवय होती, त्या सवयीचंच पुढे नियमित लिखाणात रुपांतर झालं! मग आपल्या काही कल्पना साकारात जाऊन कथांचं, दीर्घकथांचं लिखाण होत गेलं. एखादं पुस्तक मग त्या कथा असो वा कादंबरी अथवा कविता, वाचून झाल्यानंतर त्या कलाकृतीतून जो काही निखळ आनंद मिळतो, त्या लेखकाशी मनोमन जे एक नातं जुळतं, तशा प्रकारचं नातं आपल्या लेखणीतून जोडल्या जावं, वाचकांशी लेखणीतून संवाद व्हावा, आपल्या कलाकृतींतून आपणही असा आनंद द्यावा ह्या उद्देशाने लेखनप्रवास सुरु आहे! ह्या आनंदाची देवाण-घेवाण हा प्रमुख उद्देश! साहित्यविषयक प्रवास : १. नाते तुझे नि माझे: एक दीर्घ पत्रकथा: ऑडियो बुक लाँच, पाडवा ३१ मार्च २०१४ रोजी, पुणे येथे वेगवेगळ्या थियेटर आर्टिस्ट्सने एकत्र येऊन ही कथा ऑडियो रुपात जिवंत केली. सृजन ह्या बॅनरखाली प्रकाशन सोहळा पार पडला २. रंगात रंगूनी सा-या: ह्या दीर्घकथेचे ऑडियो बुक प्रकाशित ३. मायबोली, मराठी कविता समूह, अनाहत व इतर अनेक इ-पुस्तकांतून लेखन. ४. देशोन्नती वृत्तपत्रातील युवा पुरवणीमधे लेखन:  ललितलेखन, कविता प्रकाशन ५. विविध दिवाळी अकांसाठी लेखन ६. मैत्रांगण ह्या त्रैमासिकासाठी लेखन ७. आंतरजालावरील अनेक मंचांवर सक्रीय व ह्या venusahitya.blogpost.com ब्लॉगवर नियमितपणे विविधांगी लेखन: लघुकथा, दीर्घकथा, स्फूट, कविता ८. कवितांचे आंतरजालावरील सर्वात मोठे व्यासपीठ 'मराठी कविता समूह'चे  सप्टेंबर २०१४- सप्टेंबर १५ कालावधीत सहसंचालन ९. मुंबई- पुणे विभागातील कार्यक्रमांत कविता सादरीकरण १०."कविता महाराष्ट्राची" कार्यक्रमात आमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग ११. मानाचि लेखक संघटनेची सक्रिय सभासद  


Pralay Soyam "गुडड्या"

0 अनुयायी

RamRaje Pisal

0 अनुयायी

Ganesh Shinde

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.