दिल दोस्ती यारी गोष्ट लेखन

आपल्याला सबमिशनमध्ये येत असणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आम्ही या स्पर्धेसाठी दिनांक १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिल दोस्ती यारी : भाग दुसरा : गोष्टलेखन स्पर्धा ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट (रात्री १२ पर्यंत) 
 
आमची यारी - यामध्ये आपण आपल्या मैत्रीच्या गोष्टी, मैत्रीतल्या धमाल आठवणी, बालपणीपासून ते आतापर्यंतच्या आयुष्यातले मैत्रीचे किस्से असे बरेच काही लिहू शकता.
सखा सोबती - यामध्ये ओळखीतून फुललेले मैत्रीचे नाते आणि नंतर विवाहाच्या मांडवाखालून गेलेली आपली मैत्री आणि आयुष्यभर त्या सख्याची अथवा त्या सखीची आपल्याला मिळालेली सोबत याबाबतचे आपले सुखदुःखाचे किस्से, आपल्या गोष्टी आपण गोष्टरूपात लिहू शकता.
 
महत्त्वाचे नियम:  
१) गोष्ट लेखनासाठी शब्दसंख्या ३०० असेल. ३०० पेक्षा कमी शब्दसंख्या असलेले साहित्य निकालाच्यावेळी ग्राह्य धरले जाणार नाही.
२) स्पर्धेसाठी कमीतकमी १ साहित्यरचना लिहून आपण सहभागी होऊ शकता. जास्तीतजास्त ५ साहित्यरचना आपण सबमिट करू शकता.
३) स्पर्धेत पाठवलेले साहित्य हे स्व-लिखित असावे. (दुसऱ्या लेखकाच्या साहित्याची कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.)
४) स्पर्धेसाठी नवीन साहित्यरचना लिहून आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. प्रतिलिपिवर पूर्वप्रकाशित कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. 
 तथापि, इतर कोणत्याही ऑनलाइन अथवा ऑफलाइन माध्यमांवर प्रकाशित असलेली कथा आपण स्पर्धेसाठी नक्कीच सबमिट करू शकता. 
५) गोष्ट लेखनामध्ये ११ ऑगस्ट रोजी रात्री १२ पर्यंत आपण आपल्या गोष्टी सबमिट करू शकता. 
६) रात्री १२ नंतर ऑगस्ट १२ रोजी पत्रलेखनाच्या स्पर्धेचे पोस्टर आपल्याला होमपेजवर दिसेल त्या पोस्टरवर क्लिक करून आपले पत्रलेखन सबमिट करू शकता.
 
स्पर्धेत सहभागी कसे व्हाल ?
स्पर्धेत सहभागी होणे अत्यंत सोपे आहे. यासाठी आपण प्रतिलिपि ऍप किंवा वेबसाइट दोन्हीचा वापर करू शकता.
१)  फक्त भाग घ्या या बटनावर (याच पानावर खाली उजव्या कोपऱ्यात दिलेल्या) क्लिक करा. 
२) यानंतर आपल्याला लेखनासाठी दिलेल्या चौकटीत आपले साहित्य टाइप करा किंवा पेस्ट करा.
३) माहिती विभागात कथेचे शीर्षक, मुखपृष्ठ, श्रेणी, सारांश आदी तपशील भरून कॉपीराइटची अनुमती देऊन सादर करा वर क्लिक करून सबमिशन पूर्ण करा.
४) आपण एक साहित्यरचना सबमिट केल्यानंतर आपले जमा केलेले साहित्य याच पानावर असलेल्या "एकूण सबमिशन " या भागात आपल्याला पाहावयास मिळेल. 
    याचप्रकारे एक एक करून जास्तीत जास्त ५ साहित्यरचना आपण सबमिट करू शकता. 
५) साहित्य वाचकांकरता प्रतिलिपिवर प्रकाशित झाल्यांनतर अर्थात २५ ऑगस्ट, २०१९ नंतर आपण ते सामायिक (शेअर) करू शकता.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जगात अशी एकही वल्ली शोधून सापडणं कठीण की जिला जवळचं हक्काचं असं मैत्रीचं नातं नाही. मैत्रीचं हे नातंच अगदी निराळं. या नात्याला कोणतीही अट नाही. चूक असो वा बरोबर  ते आपल्या सोबतीला कायम आहेच आणि असणारच आहे. अगदीच कोणी नाही तर चंद्र, सूर्य,सागर तर आपल्या सोबतीला कायम उभे आहेतच. कवी लेखकांचे तर हे अगदी जिव्हाळ्याचे मित्र. तुमच्याकडेही आहेत अशा तुमच्या मैत्रीच्या गोष्टी ?  किंवा अशी एखादी व्यक्ती की जिला तुम्हाला काही सांगायचयं पण ते राहूनच गेलं.

हो ! तर मग लगेच सहभागी व्हा प्रतिलिपि आयोजित "दिल दोस्ती यारी " या लेखन स्पर्धेत आपल्या गोष्टीतून किंवा पत्रातून आपल्या मैत्रीच्या भावना व्यक्त करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे आणि विशेष संधी !!!

 
स्पर्धेविषयी :
मैत्रीदिनानिमित्त प्रतिलिपिने " दिल दोस्ती यारी " स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये आपण काव्यलेखन, पत्रलेखन आणि गोष्टलेखन करू शकता. प्रतिलिपिच्या होमपेजवर या स्पर्धेचं पोस्टर दिसेल त्यावर क्लिक करा आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम, माहिती वाचून तिथेच असलेल्या भाग घ्या बटनावर क्लिक करून आपले साहित्य सबमिट करा:
 
कालावधी: ०४ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट
१) साहित्य वाचकांसाठी प्रकाशित : २५ ऑगस्ट, २०१९
३) वाचकांना मतनोंदणीसाठी : २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर (२ आठवडे)
 
स्पर्धेची संकल्पना आणि विषय खालीलप्रमाणेअसतील :
 
गोष्ट लेखन ८ ऑगस्ट - १४ ऑगस्ट आमची यारी
    सखा सोबती
पत्र लेखन १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट गेले सांगायचे राहून
 
पारितोषिके:
 
प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग ह्या तीन निकषांवर या स्पर्धेचे विजेते घोषित करेल.
स्पर्धेच्या निकालाची तारीख २५ ऑगस्ट रोजी घोषित करण्यात येईल.
प्रत्येक श्रेणीतून २ विजेते घोषित करण्यात येतील. त्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येईल.
प्रथम पारितोषिक: १०००/-
द्वितीय पारितोषिक: ५००/-  
 
आणि 
"दिल दोस्ती यारी " या संपादकीय पुस्तकाचे इ-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात प्रकाशन
 
स्वतंत्रपणे संपादकांच्या निवडीनुसार प्रत्येक श्रेणीमधून निवडक अशा रचनांचे संपादन करून मान्यवरांच्या प्रस्तावनेसह "दिल दोस्ती यारी" या पुस्तकाचे इ-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात प्रकाशन करण्यात येईल. वाचक आवडीनुसार विजेत्या रचनांचासुद्धा या पुस्तकामध्ये समावेश असेल. पुस्तक प्रकाशनाची तारिख निकालाच्या दिवशी कळवण्यात येईल.
 
*निकालाबाबतचे पूर्ण अधिकार प्रतिलिपिकडे राखीव राहतील.
 
 स्पर्धेशी निगडीत कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी आम्हाला खालील माध्यमांद्वारे संपर्क करु शकता. २४ तासांच्या आत आपल्या शंकेचे निरसन करण्यास आम्ही बांधील आहोत.  

मेल आयडी: marathi@pratilipi.com  अथवा  मोबाइल क्रमांक : ६३६२३ १५४०७

All the best!! आपल्या साहित्यातून आम्हाला जाणून घ्यायचंय आपल्या मैत्रीच्या भावना काय आहेत ?

कार्यक्रम प्रवेश

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.