नवदुर्गा: स्त्रीविशेष कथा-कविता लेखन

प्रतिलिपिच्या लेखक वाचकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा !

खास नवरात्रीनिमित्त प्रतिलिपि आपल्यासाठी घेऊन आली आहे : नवदुर्गेचं एक आगळंवेगळं लेखन आव्हान !

मराठी वाहिन्यांनी आजवर आपल्याला अशा काही विशेष स्त्री व्यक्तिरेखा दिल्या. ज्यांच्या कथा-व्यथांची बीजे आपल्या मनात अगदी आजही खोलवर रुजलेली आहेत. मालिकेतल्या त्या स्त्री व्यक्तीरेखांनी आपल्या मनात एक समांतर शोध सुरू केला. या मालिकांच्या शीर्षकगीतांनीसुद्धा आपल्या मनाचा ठाव घेत आपल्याला अंतर्मुख केलं. आणि मग आपल्याच आजूबाजूला आपल्याला दिसू लागले 'ती' चे जीवंत संघर्ष, तिच्या त्यागाच्या कहाण्या, प्रेमाच्या विराण्या तर कधी तिच्या ध्येयाचा ध्यास ! 
 
नवदुर्गा या स्पर्धेमध्ये मराठी वाहिन्यांवरील गाजलेल्या ९ स्त्री व्यक्तिरेखांची नावे आपल्याला देण्यात आली आहेत:
१) दामिनी २) स्वामिनी ३) बंदिनी ४)सुवासिनी ५) अवंतिका ६) मानसी ७)अस्मिता ८) जगावेगळी ९) कुलवधू 
यापैकी एखादी व्यक्तिरेखा, तिच्या नावाचा अर्थ आपल्या मनात जी कथा घेऊन येतो अथवा जे भाव ठसवतो ते आपण आपल्या कथांमध्ये अथवा कवितांमध्ये लिहू शकता. याव्यतिरिक्तही आपल्या अनुभवात, वाचनात अथवा पाहण्यात आलेल्या आणि मनात रुतून बसलेल्या तिच्या कथा-व्यथा आणि ध्येयगाथा, तिचे संघर्ष या स्त्रीविशेष कथा आणि कवितांमधून आपण मांडू शकता. या स्पर्धेमध्ये आपण लेखसुद्धा लिहू शकता. 
 
यामध्ये भाग घेऊन तुम्ही जिंकू शकता एकूण १०,०००/- ची बक्षीसे आणि अनेक आकर्षक संधी !

पारितोषिके:

या स्पर्धेसाठी १० विजेत्यांना प्रत्येकी रूपये एक हजार रक्कमेची १० समान पारितोषिके देण्यात येतील. 
या १० पारितोषिकांमध्ये ५ कथा आणि ५ कविता असे विभाजन असेल.

तसेच निवडक १५ विजेत्या कथा आणि १५ विजेत्या कविता यांचे ई-बुक आणि ऑडिओसुद्धा बनवण्यात येतील! 

निवडक लेखांना विशेष प्रसिद्धी देण्यात येईल; परंतु लेखासाठी कोणतेही रोख बक्षीस देण्यात येणार नाही.

स्पर्धेचे सर्व विजेते परीक्षकांकडून घोषित करण्यात येतील. परीक्षकांची टीम कथानक, लेखनाची गुणवत्ता, व्याकरण आदी भाषेचे आणि साहित्याचे निकष विचारात घेऊन विजेते निश्चित करते.
*निकालाबाबतचे पूर्ण अधिकार प्रतिलिपिकडे राखीव राहतील.

स्पर्धेचे नियम :

१) नवदुर्गा स्पर्धेचे लेखन आव्हान हे घटस्थापना ते दसरा असे १० दिवसांचे आहे. म्हणजेच, ही स्पर्धा सप्टेंबर २९ ते ऑक्टोबर ०८ अशी १० दिवस सुरू राहील.
२) या स्पर्धेमध्ये आपण कथा आणि कविता मिळून एकूण ५ साहित्यरचना सबमिट करू शकता.
३) स्पर्धेत पाठवलेले साहित्य हे स्व-लिखित असावे. (दुसऱ्या लेखकाच्या साहित्याची कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.)
४) प्रतिलिपिवर पूर्वप्रकाशित साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तथापि, इतर कोणत्याही माध्यमांवर प्रकाशित असलेली कथा वा कविता आपण स्पर्धेसाठी नक्कीच सबमिट करू शकता. तसेच स्पर्धेसाठी नवीन कथा वा कविता लिहूनही आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
५) कथा अथवा कविता यांसाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही.
६) आपण कथामालिका स्वरूपात कथा लिहिल्यास एकाच शीर्षकाखाली त्या कथेचे सर्व भाग एकत्रित करून संपूर्ण कथा सबमिट करावी.    
७) व्याकरणाच्या जास्त चुका असलेले साहित्य ग्राह्य धरले जाणार नाही.   
 
लक्षात ठेवा महत्त्वाच्या तारखा:
 
१) सहभागाचा अंतिम दिवस -  दसरा: ०८ ऑक्टोबर, २०१९ 
२) आपले साहित्य वाचकांसमोर उपलब्ध होईल: १४ ऑक्टोबर, २०१९
३) ३० नोव्हेंबर, २०१९ रोजी स्पर्धेच्या निकालाची तारीख घोषित करण्यात येईल.
 
सहभाग कसा घ्यावा ?
 
१. भाग घ्या बटनावर क्लिक करून आपण स्पर्धेमध्ये आपल्या कथा अथवा कविता सबमिट करू शकता. ईमेलवर पाठवलेले साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. साहित्य सबमिट करताना कथा किंवा कविता अथवा लेख यापैकी साहित्य प्रकार निवडावा. श्रेणीमध्ये स्त्रीविशेष या श्रेणीची निवड करावी.
३. योग्य साहित्य प्रकार आणि श्रेणी निवडणे अत्यावश्यक आहे.
 
सबमिशनच्या पायऱ्या:
अ) साहित्य सबमिट करणे अत्यंत सोपे आहे. फक्त सबमिट बटनावर (याच पानावर खाली उजव्या कोपऱ्यात दिलेल्या) क्लिक करा. यासाठी आपण प्रतिलिपि ऍप किंवा वेबसाइट दोन्हीचा वापर करू शकता.
ब) यानंतर आपल्याला लेखनासाठी दिलेल्या चौकटीत आपले साहित्य टाइप करता येईल किंवा पेस्ट करता येईल. याचबरोबर कथेचे शीर्षक, मुखपृष्ठ, श्रेणी, सारांश आदी तपशील भरून सबमिशन पूर्ण करता येईल.
क) आपण एक साहित्यरचना सबमिट केल्यानंतर आपण जमा केलेले साहित्य याच पानावर असलेल्या "एकूण सबमिशन" या भागात आपल्याला पाहावयास मिळेल. याचप्रकारे एक एक करून जास्तीत जास्त ५ साहित्य आपण सबमिट करू शकता. 
 
स्पर्धेविषयी काही शंका अथवा समस्या आहे ?
 
मेल आयडी:    marathi@pratilipi.com  
मोबाइल क्रमांक : ६३६२३ १५४०७ (11am to 8pm) 
आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.
 

All the best!!  तुम्हाला भावलेल्या नवदुर्गेची गोष्ट , तुमच्या कथा-कवितांमधून वाचायला आम्ही उत्सुक आहोत.

 

कार्यक्रम प्रवेश

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.