बालरंग: चिमुकल्यांसाठी माझी लेखणी

बाल साहित्य असे म्हणताच मराठीमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकीच नावे डोळ्यासमोर येतात. पण घराघरात आजी-आजोबा आपल्या चिमुकल्यांना सांगण्यासाठी स्वतःच कितीतरी गोष्टी रचत असतातच. तर कधी गाणी, बडबडगीते गात असतात. तुमच्याकडेही आहेत अशा फक्त तुमच्या चिमुकल्यांना सांगितलेल्या गोष्टी , गायलेली गाणी ? सांगितलेली, ऐकलेली पण कुणीही न वाचलेली ?
तर मग समस्त चिमुकल्यांसाठी घ्या ती लेखणी हाती आणि स्विकारा हे आव्हान बालरंगचे !
ज्यात भाग घेऊन तुमच्या साहित्याला मिळेल एक नवा बाल चित्रकार !!!  आणि अनेक आकर्षक संधी !!
 
प्रतिलिपि चिमुकल्यांसाठी "बालरंग" च्या माध्यमातून एक अगदी आगळीवेगळी योजना घेऊन आलेली आहे. मुळातच रंगाचे वेड असलेल्या या बालकांना वाचनाची प्रेरणा देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न !
बालरंग हे ३१ दिवसांचे लेखन आव्हान आहे, ज्यामध्ये आपण लहान मुलांसाठी गोष्टी किंवा कविता लिहू शकता. 
वयोगट : 
इयत्ता ५ वी ते इयत्ता  ७ वी 
इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी 
 
१५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती, दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशीपासून हे बालसाहित्य वाचकांसाठी खुले केले जाईल.
यानंतर हे साहित्य वाचून बालकांना त्यांना आवडलेल्या कथेच्या किंवा कवितेच्या मुखपृष्ठासाठी चित्र काढण्याचे आव्हान देण्यात येणार आहे. 
ज्या कथेला आणि ज्या कवितेला बालकांची सर्वाधिक पसंती मिळेल, ती कथा आणि ती कविता या स्पर्धेची विजेती कथा आणि विजेती कविता म्हणून जाहीर करण्यात येईल. 
 
पारितोषिके:

प्रथम क्रमांक:

प्रथम पारितोषिक: २५००/- (अडीच हजार रुपये)
द्वितीय पारितोषिक: १५००/- (दीड हजार रुपये)
तृतीय पारितोषिक:  १०००  /- (एक हजार रुपये)  

पहिल्या तीन विजेत्यांना प्रतिलिपितर्फे मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येईल.

टॉप ५० विजेत्या कथा आणि कवितांना मिळेल डिजिटल सर्टिफिकेट !!

टॉप २५ विजेत्या कथा आणि कवितांचे (ऑडिओ) ध्वनिमुद्रण  करण्यात येइल !

स्पर्धेचे नियम :

१) स्पर्धेत पाठवलेले साहित्य हे स्व-लिखित असावे. (दुसऱ्या लेखकाच्या साहित्याची कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.)
 
२) प्रतिलिपिवर पूर्वप्रकाशित कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. तथापि, इतर कोणत्याही माध्यमांवर प्रकाशित असलेली कथा आपण स्पर्धेसाठी नक्कीच सबमिट करू शकता. 
     तसेच स्पर्धेसाठी नवीन कथा लिहूनही आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
३)  कथा अथवा कविता यांसाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. तथापि चारोळी स्पर्धेमध्ये स्वीकारली जाणार नाही.
४) एक किंवा एकापेक्षा जास्त कितीही कथा आणि कविता प्रकाशित करून या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊ शकता.
५)  आपण कथामालिका स्वरूपात कथा लिहिल्यास एकाच शीर्षकाखाली त्या कथेचे सर्व भाग एकत्रित करून संपूर्ण कथा सबमिट करावी.    
६)  शक्यतो व्याकरणाच्या चुका टाळाव्यात. व्याकरणाच्या जास्त चुका असलेले साहित्य ग्राह्य धरले जाणार नाही.   
 
सहभाग कसा घ्यावा ?
 
१. बालरंगचे लेखन आव्हान एक महिन्याचे आहे. ही स्पर्धा २३ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर अशी ३१ दिवस सुरू राहील.
 
२. यावेळी सहभागी होण्यासाठी भाग घ्या हे बटनअसणार नाही.
 
३. स्पर्धेत भाग घेण्यासाठी थेट आपले साहित्य प्रतिलिपिवर प्रकाशित करायचे आहे. 
  [ साहित्य प्रकाशनासाठी (इथे निळ्या शब्दांवर क्लिक करून) प्रतिलिपि सेल्फ़ पब्लिशिंग गाईड  काळजीपूर्वक वाचावे.
 
४. साहित्य प्रकाशित करताना कथा किंवा कविता यापैकी साहित्याचा प्रकार निवडल्यानंतर श्रेणी मध्ये बालसाहित्य या श्रेणीची निवडकरणे अनिवार्य आहे. 
इतर श्रेणीची निवड केल्यास ते साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच ईमेलवर पाठवलेले साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
 
५. कथेच्या शेवटी वयोगट अवश्य नमूद करावा.

६. २५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेमध्ये सहभागी साहित्य मुलांना वाचनासाठी प्रतिलिपिच्या होम पेजवर खुले केले जाईल. 
 
 
स्पर्धेविषयी काही शंका अथवा समस्या आहे ?
 
मेल आयडी:    marathi@pratilipi.com  
मोबाइल क्रमांक : ६३६२३ १५४०७ (11am to 8pm) 
आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.
 
लक्षात ठेवा: 
सहभागाची अंतिम तारीख :  २३ ऑक्टोबर, २०१९ 

All the best!!  चिमुकल्यांना तुमची लेखणी काय काय सांगते, हे तुमच्या कथा-कवितांमधून वाचायला आम्ही उत्सुक आहोत.

कार्यक्रम प्रवेश

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.