म्हणींच्या दुनियेत

नमस्कार लेखकवर्ग,
 

म्हणी वाक्प्रचार ही सारी भाषारत्नेच! आपली मायमराठीसुद्धा या भाषारत्नांनी मढून गेलेली आहे. त्यातला म्हणी हा तर बोलीभाषेला जिवंत ठेवणारा दागिना !

एके ठिकाणी वाचनात आले ते यथार्थच आहे, " मानवी आयुष्यात सुरू झालेला 'पाळण्यात दिसणाऱ्या बाळाच्या पाया' पासूनचा मराठी म्हणींचा प्रवास हा इहलोक सोडल्यानंतरही 'मरावे परी किर्तीरूपी उरावे' पर्यंत येऊन पोहोचतो. मराठी भाषेतील म्हणींचे हे ऐतिहासिक-भाषिक महत्त्व शिवाय मानवी जीवनाशी असलेले म्हणींचे नाते लक्षात घेता प्रतिलिपि लेखकांना आपल्या कथालेखनाद्वारे म्हणींच्या दुनियेत सफर करण्याचे आव्हान करत आहे. यासाठी प्रतिलिपिने 'म्हणींच्या दुनियेत' ही म्हणींवर आधारित कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे!

ज्यात भाग घेऊन तुम्ही जिंकू शकता एकूण २०,०००/- ची बक्षीसे आणि अनेक आकर्षक संधी !

इतकेच नाही, तर टॉप ५० विजेत्यांना मिळेल डिजिटल सर्टिफिकेट!!

तसेच टॉप ५० विजेत्या कथांचे ई-बुक आणि ऑडिओसुद्धा बनवण्यात येतील!

शिवाय निवडक कथांचे दिग्गजांकडून अभिवाचनही करण्यात येईल. 

पारितोषिके:
या स्पर्धेसाठी एकूण २० पारितोषिके देण्यात येतील. ज्यामध्ये १० विजेते टीम प्रतिलिपिकडून तर १० विजेते परीक्षकांकडून घोषित करण्यात येतील.

प्रथम पारितोषिक: ३०००/-
द्वितीय पारितोषिक: २०००/-
तृतीय पारितोषिक: १५००/-
चतुर्थ पारितोषिक: १२५०/-
पाचवे पारितोषिक: ७५०/-
उत्तेजनार्थ ५ पारितोषिके : ३००/- (प्रत्येकी)

टीप: प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग ह्या तीन निकषांवर विजेते निश्चित करते. तर परीक्षकांची टीम कथानक, लेखनाची गुणवत्ता, व्याकरण आदी भाषेचे आणि साहित्याचे निकष विचारात घेऊन विजेते निश्चित करते. 
*यापूर्वीच्या प्रतिलिपि आयोजित स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक विजेत्या नावास प्रथम पारितोषिकासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
*निकालाबाबतचे पूर्ण अधिकार प्रतिलिपिकडे राखीव राहतील.
 
महत्त्वाच्या तारखा:
 
१) सहभागाची अंतिम तारीख १२ ऑगस्ट, २०१९. 
२) आपले साहित्य वाचकांसमोर उपलब्ध होईल: १५ ऑगस्ट, २०१९
३) १५ ऑगस्ट, २०१९ रोजी स्पर्धेच्या निकालाची तारीख घोषित करण्यात येईल.
 
कथालेखनाचे नियम:

- कथा ही म्हणीवर आधारित असावी आणि कथेचे शीर्षक लिहिल्यानंतर त्याखाली #म्हण: असे लिहून आपली कथा कोणत्या म्हणीवर आहे ते नमूद करावे.

उदा: #म्हण: अति तेथे माती 

एखादी म्हणसुद्धा आपण कथेचे शीर्षक म्हणून वापरू शकता. तरीसुद्धा शीर्षकाखाली #म्हण: असे लिहून त्यापुढे आपली कथा कोणत्या म्हणीवर आहे ते नमूद करणे आवश्यक आहे.

- कथेमध्ये म्हणीचा आशय असावा. आशय नसल्यास कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

 
महत्त्वाचे नियम:
१) भाग घ्या या बटनाद्वारे आपण जास्तीत जास्त ५ कथा या स्पर्धेसाठी सबमिट करू शकता. (कमीत कमी १ किंवा ५ पेक्षा कमी कथा पाठवून सुद्धा आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.)
२) प्रतिलिपिवर पूर्वप्रकाशित कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. तथापि, इतर कोणत्याही ऑनलाइन अथवा ऑफलाइन माध्यमांवर प्रकाशित असलेली कथा आपण स्पर्धेसाठी नक्कीच सबमिट करू शकता. तसेच स्पर्धेसाठी नवीन कथा लिहूनही आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
३) स्पर्धेत पाठवलेले साहित्य हे स्व-लिखित असावे. (दुसऱ्या लेखकाच्या साहित्याची कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.)
४) कथा कमीत कमी ०० शब्दांची असावी. कमाल शदसंख्येचे कोणतेही बंधन नाही.(४०० शब्दांपेक्षा कमी शब्दसंख्या असलेली कथा तुम्ही सबमिट करू शकता परंतु निकालाच्यावेळी त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.) कथा मालिका स्वरूपात लिहिल्यास एकाच शीर्षकाखाली त्या कथेचे सर्व भाग एकत्रित करून संपूर्ण कथा सबमिट करावी.
५) या स्पर्धेकरिता आपल्याला केवळ कथा पाठवता येतील. लेख अथवा कविता निकालावेळी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. 
 
स्पर्धेत सहभागी कसे व्हाल ?
 
१) स्पर्धेत सहभागी होणे अत्यंत सोपे आहे. फक्त सबमिट बटनावर (याच पानावर खाली उजव्या कोपऱ्यात दिलेल्या) क्लिक करा. यासाठी आपण प्रतिलिपि ऍप किंवा वेबसाइट दोन्हीचा वापर करू शकता.
२) यानंतर आपल्याला लेखनासाठी दिलेल्या चौकटीत आपले साहित्य टाइप करता येईल किंवा पेस्ट करता येईल. याचबरोबर कथेचे शीर्षक, मुखपृष्ठ, श्रेणी, सारांश आदी तपशील भरून सबमिशन पूर्ण करता येईल.
३) आपण एक कथा सबमिट केल्यानंतर आपले जमा केलेले साहित्य याच पानावर असलेल्या "एकूण सबमिशन" या भागात आपल्याला पाहावयास मिळेल. याचप्रकारे एक एक करून जास्तीत जास्त ५ कथा आपण सबमिट करू शकता. साहित्य वाचकांकरता प्रतिलिपिवर प्रकाशित झाल्यांनतर अर्थात १५ ऑगस्ट, २०१९ नंतर आपण ते सामायिक (शेअर) करू शकता.

स्पर्धेशी निगडीत कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी आम्हाला खालील माध्यमांद्वारे संपर्क करु शकता. २४ तासांच्या आत आपल्या शंकेचे निरसन करण्यास आम्ही बांधील आहोत.  

मेल आयडी: marathi@pratilipi.com  अथवा  मोबाइल क्रमांक : ६३६२३ १५४०७ 

All the best!! या म्हणीतून आपण काय काय म्हणता हे आपल्या कथेतून वाचायला आम्ही उत्सुक आहोत.

कार्यक्रम प्रवेश

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.