जिवलगा

धो धो बरसणारा पाऊस , त्यात रात्री ची वेळ , संथ सावध चालणारा पुणे -कोल्हापुर महामार्ग , घाट रस्त्यांवरून पुण्याहून कोल्हापुर साठी निघालेली ही रातराणी अशीच सावध पणे मार्गस्थ होती ..घाटाच्या एका वळणावर एक महागडी चारचाकी चे पार्कींग लाईट टीमटीमत होते . बसला पाहताच त्या बंद पडलेल्या चारचाकी ड्राईव्हर ने पटकन बोनट बंद केल अन बस ला हात दिला . बस ड्राईव्हर ने ही प्रसंगाच गांभीर्य ओळखुन बस थांबवली , दार उघडताच गाडीच्या आतला दिवा पेटला अन एक २२-२३ वर्षांची तरूणी गाडीतून तिची पर्स सांभाळत उतरली , वाहकाने दरवाजा उडडला , आताशा पावसाचा जोरही खुप वाढला होता , तिने ड्राईव्हर काकांना काही सुचना केल्या अन ती बसमधे चढली...

बस मधे जेमतेम २०-२५प्रवासी असतिल , पण कोणी दोघेच बसलेले तर कोणी पाय पसरून ताणलेले , वाहकाच्या मागच्या सिटवर सिटवर एक २५चा तरूण पेंगुळलेला होता...तिने त्याला

हलवत उठवले "जरा सरकता का".. ? अस तोर्यात म्हणत ती बसली . तो मुलगा आता जरा सावध बसला होता...बस घाटाची वेडीवाकडी वळण कापत तोवर मार्गस्थ झालेली ...

आज नाईलाज म्हणुन पहील्यांदाच बसमधे बसलेली रईसजादी मात्र खुप अवघडलेली होती , त्यातच एका वळणावर सहप्रवासी मुलगा तिच्या अंगावर रेलताच हिचा पारा सटकला..

" निट नाही बसता येत का हो..? मुलगी पाहीली नाही की घसरलेच हे" "मुर्ख"...

तिने जरा आवाज चढवतच सहप्रवासी असलेल्याची कानऊघडणी केली , आता त्याला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले होते ...तो शरमला , आजूबाजुला पाहीले ..मागचे पुढचे प्रवासी त्याच्याकडे पाहत होते ...तोच वाहकाने हस्तक्षेप केला ...

" मॅडम घाटरस्ता आहे वळण खुप आहेत , जरा अॅडजस्ट करा "

आता तो खिडकीला चिकटून समोरचा बार घट्ट धरून सावध बसला होता , आता त्याला झेप येणे शक्यच नव्हती , बण बाजूची रईसजादी मात्र आता पेंगुळली होती , ती काही वळणांवर त्याच्या अंगावर रेलत होती , पण हा गप्प बसला होता , मनातुन वाटत होत हीने केलेला पाणऊतारा हिच्यावर उलटवावा पण याच्यात एका मुलिशी ईतक बोलण्याची हिम्मत नव्हती , हा गप्पच बसला .

पुढे गाडी एका ढाब्यावर थांबली , लाईट लागली , वाहक आर्धा तास गाडी चहापानासाठी थांबणार म्हणुन जोरात बोलला..तशिच ही भानावर आली , वाहक आणि आजूबाजूचे प्रवासी पाहतच होते , त्या रईसजादीने मस्त त्याच्या खांद्यावर डोक ठेऊन निजलेली .हे पाहून बाजूचे सहप्रवासी हसत होती , ती एकदम भानावर आली आणि तो ही सावरून बसला , आता त्या दोघांची नजरा-नजर झाली , तशी ती अस्पष्टशी "साॅरी " अस पुटपुटली , त्याने फक्त पापण्या बंद करून दुजोरा दिला अन फ्रेश होऊ म्हणुन खाली उतरला .

एव्हाना पाऊस अजुनही जोरात होता सोबत गार अंगाला झोंबणारा वारा , ते दोघ खाली उतरले , तिच्या हाय हिल सँडल आणि खाली गचगच चिखल , एका हातात पर्स अन एका हातानी छत्री सांभाळत ती वाॅशरूम च्या दिशेने चालत होती , हा ही मागेच होता ... अन वार्याच्या जोराचा झोत आला अन तिची छत्री उलटली , छत्री सांभाळत असतांनीच पाय घसरला ती पडणार तोच ह्याने तिला हात दिला अन ती पडता पडता वाचली , तिने पुन्हा आभार व्यक्त केले आणि ह्याने फक्त स्मित केल.

तो त्या छोट्याश्या हाॅटेलच्या एका टेबलावर चहा , भिस्किट घेऊन निवांत बसलेला , ती ही त्याला शोधत तिथपर्यंत पोहोचली ...

ती..."मी बसू शकते न"..?

तो .."व्हाय नाॅट "..."प्लिज"...

ती ..." माय सेल्फ ..हिना" ..."हिना खान..'

तो ..."ओह "..."नाईस टू मिट यू"

तो पुन्हा गप्प झाला चहा च्या घोटा सोबत भिस्किट खात होता ..

ती आजूबाजुला कोणी वेटर आहे का पाहत होती ....पण कोणी दिसत नव्हत...तीने वेटर म्हणुन हाक ही मारून पाहीली तर कोणी दूजोरा नव्हता दिला...आणि भूक ही लागलेली , बाहेर कढई तून गरमा गरम कांदा भजी चा वास तिची भुक चाळवून गेलेला ..तर हिला तिथे कोणी दिसेना...

तो..."तुम्हाला काही हवय का"...? "ईथे सेल्फ सर्विस असते मॅम"

ती..."ओह" आणि जरा रागातच त्याला पाहत ती बोलली... "अँन्ड फाॅर युवर काईंड ईंफोर्मेशन माझ नाव हिना आहे".... "नाॅट मॅम"

आता मात्र त्याला त्याची चुक एव्हाना कळली होती...

तो ..."साॅरी ".."माय सेल्फ हेमराज"

तीने हात पुढे करत ....जर तिखट नजरेन अन जरा रागानेच "ग्लॅड टू मिट यू मिस्टर हेमराज"

तो आता मात्र हसला आणि "आय टू" एवढ म्हणुन उठू लागला...

हिना..."कुठे निघालात तुम्ही "..?

हेमराज..." तुमच्यासाठी चहा आणतो "

हिना .."मला चहा नको...दोन प्लेट कांदा भजी आणुन दे "..."खुप दिवस झाले खाऊन " ...

हेमराज ने तिच्याकडे पाहत तिला हो म्हटले अन खिशाला हात लावला ,...अन काऊंटर कडे निघाला ...तोच हिना ने त्याला आवाज दिला...

"हेमराज एक मिनीट" ...अन पर्स मधुन ५०० ची नोट काढली आणि त्याच्या हातात देत म्हटली "छान खरपुस कांदा भजी आण ...आणि हो खरपूस निवडून आणशिल " अन गोड हसली ...त्याने ही पापणी मिचकावत स्मित केल अन कांदा भजी घ्यायला निघाला...

हेमराज ने दोन प्लेट कांदा भजी , पाणी बाॅटल आणुन ठेवली अन तो तीच्या समोर बसुन होता , बाहेरचा धो धो कोसळणारा पाऊस पाहत होता...

हिना...."हेमराज मी दोन प्लेट माझ्या एकटीसाठी नाही मागवली "

हेमराज...."मी बाहेर सहसा काही खात नाही"

हिना ..."मला एकटीला पण खाण जात नाही"

हेमराज..."मग एक परत करून येऊ का" ..?

हिना ...जरा रागातच बोलली ..."तुला कंपनी द्यायची असेल तर ठिक नाहीतर दोन्ही प्लेट परत कर"

आता हेमराज चा नाईलाज झाला तो बसला , आणि हिना ने त्यापुढे प्लेट सरकवली ...

हिना ..."तुला मी रागावले बसमधे बसल्यावर त्याचा अजुन राग आहे का रे तुझ्या मनात"…?

हेमराज ने नकारार्थी मान हलवली ...

हिना..."साॅरी न बाबा"...आणि हात पुढे करत ...फ्रेन्ड्स ..?

हेमराज ..."अरे साॅरी का म्हणता"...? ....

हिना ...."हेमराज मला अस्सा राग येतोन न तुझा"..."काय लावलय हे अहो जाहो"..."फ्रेंड म्हटली न मी तुला "..? .."तरी मला तू"....सोड जाऊदे " ..."सो साॅरी" म्हणत ती ऊठू लागली ...तसा हेमराज ने पटकन उठून तिला बसवले अन हात पुढे केला ...

हेमराज..." हिना" .."आय अॅम एक्स्ट्रीमली साॅरी" ..."प्लिज बैस न "...."फ्रेंन्डस्"....?

हीना ने त्याने पुढे केलेला हात हातात घेतला अन त्याच्या डोळ्यांत पाहत गोड हसत " सो क्युट ना"....

आता हेमराजलाही गोडस हसू आल होत...दोघांनी कांदा भजी संपवली , हेमराज ने पुन्हा चहा आणला , तिला काॅफी आणली ...तोवर बस निघायची वेळ झाली होती वाहक ओरडून सर्वांना बोलवत होता ...ती दोघ उठली ... हेमराज ने छत्री उघडली , तिला हाय हिल मुळे चिखलात निट चालता येत नव्हत हिना ने हात पुढे केला...हेमराज जरा अवघडला पण त्याने हात दिला अन ते दोघ बसमधे चढले...

दोघांना हसतांना , बोलतांना पाहून वाहक , आणि आजूबाजुला असलेल्या प्रवाशांनाही गोड हसू आल...हेमराज ची नजर चहूबाजूला फिरली , त्याला ते लक्षात आल आणि तो मनातून लाजला...सहप्रवाश्यांशी नजर चोरत तो सिट वर बसणार तोच हिना बोलली..."राज मी विंडो सिट ला बसू " ...?" प्लिज"..?

तीच ते लाडीक बोलण ऐकून हेमराज च्या गालांवरची खळी मात्र खुपच ठळक दिसली...

बसता बसता हिना... हेमराज ला पाहून हसली अन बोलली .."ओए होये डिंपल बाॅय"..? "किती क्युट दिसतात न"

तसा तो पुन्हा लाजला ...गोड हसला...

हेमराज हा एका छोट्याश्या खेड्यातला , माध्यमिक शिक्षकाचा हुशार मुलगा...१२ ला मेरिट मधे आलेला , मुलाने डाॅक्टर व्हाव ही आई-बापाची खुप ईच्छा , आणि हेमराज ने ही तेच स्वप्न लहानपणा पासुन जोपासलेल...तो मोठ्या कष्टाने , काटकसरीने सहा वर्ष पुण्यात राहिला , एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाला ...त्याने त्याच ध्येय साध्य केल होत आता त्याला पुढे पेडीयाट्रीक डीप्लोमा करायचा होता ...इंटर्नशिप सोबत त्याला पुढच्या आभ्यासाचीही तयारी करायची होती , भरपुर मेहनीतीची तयारी , शांत मनामिळावू स्वभाव , गोरागोमटा , सहा फुट उंच , रूबाबदार हेमराज कधीच मोहात नव्हता अडकलेला .. मोहाचे अनेक क्षण आलेत आयुष्यात पण त्याने आपल्या जबाबदार्यांपुढे या गोष्टींकड दुर्लक्ष केले कधी ढुंकूनही नाही पाहीले . काहीसा शांत , अबोल फक्त ध्येयापाठी पछाडलेला हा हेमराज..

आणि हिना प्रतिथयश वकिलाची एकूलती एक कन्या , जन्मापासुनच एश्वर्यात वाढलेली , खान कुटुंबाची लाडकी गुणी लेक . कुशाग्र बुद्धीमत्ता , इंटेरीयर डेकोरेटर पदवीका प्राप्त...दिसायला सुंदर , चेहर्यावर ऐश्वर्य छळाळत....पदवीका झाल्यानंतर पुण्यातच एका मान्यताप्राप्त कंपनीत ती काम करू लागली , प्रचंड हुशार सर्वांना सोबत घेऊन चालणारी , मनमिळावू हिना एक एक यशाची पायरी चढत होती ... स्वत:च्या पायावर उभ राहायचय ...अशिच नाही याहुन मोठी फर्म मी काढावी , ही ईच्छाशक्ती उराशी बाळगुन असलेली , तिने तिच्या वडीलांना एक शब्द सांगीतला असता तरी याहुन मोठी फर्म रातोरात उघडली असती पण हिनाला ते मान्य नव्हत ...जे करणार मी माझ्या मेहनतिने करणार ...कोणाच्या कुबड्यांना धरून चालण हे खान साहेबांच्या लाडक्या कन्येला कधीच मान्य नव्हत , अशी ही चंचल , बडबडी पण ध्येयाने पछाडलेली हिना..,

..

पुढचा प्रवास सुरू झाला , हेमराज तिच बोलण तल्लिन होऊन ऐकत होता , जणू सुरांची बरसात होतेय अन तो लीन झालाय...तो असाही खुपच अबोल आणि हिना खुप बोलकी ...तो हसायचा तेंव्हा ती त्याच्या गालावरच्या खळी कडे पाहून नाक उंच करून किती क्युट न. ...मला हे डिंपल दे न म्हणुन लाडाने हट्ट करायची तो ही लाजायचा गोड ..., जरावेळाने हिना ला झोप येऊ लागली , तिने खिडकिच्या काचेवर डोक टेकवल ...पण पावसाळ्यातल्या रस्त्यांवरच्या तळ्यात गाडी गचकल्यावर लक्जरी गाडी मधे फिरणारी हिना दचकून उठायची ....हेमराज ने स्वतःहून पहील्यांदा तिला स्पर्श केला ....तिच डोक त्याच्या खांदाला टेकवल अगदी हक्काने ..हिना त्याच हे वेगळ रूप पाहून खुप खुष झाली ...गोड स्मित करत ती त्याच्या खांद्यावर निर्धास्त , शांत विसावली ...

पहाटे सहा वाजता बस कोल्हापुर बसथांब्यावर पोहोचली , पाऊस अजुनही धो धो कोसळतच होता ...क्षणाचीही उसंत नव्हती ...सगळीकडे फक्त पाणीच पाणी ...अन चिखल ...हेमराज तिला सोबत घेउन रिक्षा स्टँड ला सोडवले ...तिच हाॅटेल आधीच बुक होत , तिने तस सांगितलही होत त्याला ...छत्री ची घडी करत ती रिक्षात सरकून बसली , त्याला आत बसण्याचा इशारा केला ...

हेमराज .."मी ह्या समोरच्या हाॅटेलात थांबलोय "

समोर कुठलच हाॅटेल नव्हत , तो पाऊसात पुर्ण भिजला होता...

हिना आता जरा रागातच बोलली "तू गुमान बसतो की मी खाली उतरू "

हेमराज ला तिच्या अशा हक्काने काही सांगण्याच , बोलण्याच का कुणास ठाऊक पण खुप कौतूक वाटे...फक्त मोजून ८-१० तासांच्या ओळखीत ही किती अधिकाराने बोलते ...हेमराज विचार करतच होता तोच हिना ने त्याला रिक्षात ओढले , तो ही यंत्रवत बसला ...हेमराज ओला चिंब झाला होता ...तो काहीच बोलत नव्हता , अन बडबडणारी हिना ही आता गप्प झाली होती....एक शब्दही न बोलता ते हाॅटेलवर पोहोचले .

हिना ने पर्स मधुन बुकिंग स्लिप दाखवली , अन हाॅटेल स्टाफ सोबत ती रूम मधे पोहोचली...हेमराज ते पंचतारांकित हाॅटेल न्याहळत होता , ते दोन्ही रूम मधे दाखल झाले , हिना ने तिच्या मम्मी पप्पांना फोन करून पोहल्याच सांगीतल ...लगेच गाडी च्या ड्राईव्हर ना काॅल केला , त्यांना काही सुचना केल्या आणि तीच लक्ष एकदम सोबत आणलेल्या हेमराज कडे गेल. तो पुर्ण भिजला होता , त्याला हुडहूडी भरली होती , आणि तो वेडा त्या हाॅटेल रूमच इंटेरियर आश्चर्यचकित नजरेन पाहत होता .

हिना..."काय पाहतोस राज"...?

हेमराज..."इंटेरीयर काय जबरदस्त ना" ..."किती अप्रतीम सजावट"

हिना ..."राज ह्या हाॅटेलच रूम डीजाईन मी केलय "

हेमराज हे ऐकून आवाक होता , तर हिना भुवया उंचवत त्याला कौतुकाने न्याहळत होती..

तिने इंटरकाॅम वरून काॅफी आॅर्डर केली , आणि त्याला कपडे बदलून यायला सांगीतले..

हेमराज ने चेंज केला , तोवर काॅफी आली होती , दोघ गरमा गरम काॅफी चे सिप घेत होते, बोलत होते , पण हेमराजला खुप अवघडल्यासारखे झालय हे हिनाला लक्षात आले होते . ती हेमराज च्या डोळ्यात पाहून म्हटली ,

" मला रात्रभर तू खांदा दिला न त्याची परतफेड करतेय "..." मी कोणाची उसनवारी नाही ठेवत "..." कळल नं "..?

तो काहीच नाही बोलला , बस मंद हसला , पुन्हा हीनाच लक्ष त्याच्या गालावरच्या खळीवर गेल...अन आता मात्र हमराज ला जोरात हसू आल...ति तशिच गुडघ्यांवर रेलुन बेडच्या काठावर गेली अन हसत उभा असलेल्या हेमराज च्या क्युट स्माईलचे हलकेच लचके तोडले .

ती बेडवरून उठली ...पर्स मधुन तिने एक कॅरीबॅग काढली , बहुदा नाईट ड्रेस असावा , ती म्हटली "तू आराम कर मी पण चेंज करून येते , मग जरा वेळ झोपू , मग काॅलेजला जाऊ सोबत " ...."बच्चु मला पण त्याच काॅलजमधे काम आहे कळलं नं "

ती चेंज करते म्हणुन हा बाहेर निघणार तोच तिने पुन्हा त्यावर डोळे काढले , तो जागीच थबकला . हेमराज विचार करत होता आजवर कित्येकदा तो मुलिंच्या , मैत्रीणिंच्या संपर्कांत होता पण त्यावर न कोणाची जादू चालली न कोणाची अधीकारवाणी...तो नेहमीच आपल्या कोशात जगायचा , आपल्या स्वतःनेच स्वतःवर घातलेल्या नियमात जगायचा .

तो उभ्या जागीच विचार करत उभा होता , हिना ने ते पाहील पावलांचा आवाज न करता ती त्याच्या मागे आली आणि जोरात भाॅ~ केल तोच हेमराज दचकला आणि मग दोन्ही कितीतरी वेळ असेच वेड्यासारखे हसत होते . हेमराजला अस खळखळून हसायला न जाणो कितीक वर्ष झाले असतिल...तो हसता हसताच काही क्षण बालपणात हरवला ...हिना ने त्याला पुन्हा जाग केल तो सावरला अन समोरच्या सोफ्यावर जाऊन निवांत पहूडला , शांत झोपला .

हेमराजला दोन दिवस झाले होते पुण्यात परतून , पण त्याच मन कुठेच लागत नव्हत . हिनाने त्याला मोबाईल नंबर ही दिलेला , पण हिना म्हटली होती मी काॅल करणार म्हणुन , मग तिने का नसेल केला ..? कामात असणार बहुतेक ती ...आपणच करावा का तिला काॅल ..? पण कोणत्या अधीकाराने , हक्काने तिला काॅल करावा ..? मोबाईल वर तिचा नंबर डालय करायचा , तिचा हसरा चेहरा आठवायचा , मनातुनच हसायचा , खिन्न व्हायचा , पण काॅलिंग न करताच मोबाईल परत खिशात ठेवायचा , परत काढायचा ...कितीतरी वेळ त्याचा तोच चाळा सुरू होता . ती आज पुण्यात परतणार होती , आली असेल की नाही , आली असती तर काॅल करणार होती , काॅल का नाही आला..? , विसरली असणार...नाहीतरी आपला आणि तिचा काय मेळ , एक बस मधे झालेली ओळख , त्यानंतर झालेली दोस्ती , तिने आपल्यावर केलेले उपकार...कारण आपल्याकडे हाॅटेल रूम करू ईतकेही पैशे नव्हते , तिनेच सर्व खर्च केला , तिला कस कळल की याच्याकडे मोजकेच पैशे आहेत , पण तिने हे जाणवुही नाही दिले , आपली मदत केली , आता का तिने ओळखाव...? मनात मात्र तिच ती होती , दुसर काहीच सुचत नव्हत ...रूमवर आला ...कधी आरश्यात निट न पाहणारा हेमराज आज मात्र परत परत आरश्यात पाहत होता , हसत होता आणि आपल्या गालांवर पडणारी खळी आवडली होती खुप हिना ला ...हे आठवुन तो आरश्यात पाहुन हसायचा अन स्वतःच्याच गालांवरची खळी पाहायचा.

हि गोष्ट त्याचा रूम पार्टनर बाळा ला चटकन लक्षात आली , त्याने हे ताडल कि आपला सोफिस्टीकेटेड , सिंसीयर दोस्त जरा वेगळ्याच मुडमधे आहे . त्याने त्याला हटकले तसा हेमराज वरमला .

नजर चोरत तो स्टडी टेबलवर बसला . पुस्तक होतात घेतल , कव्हर पेज न्याहळत बसला , पुस्तक उघडायच असतं , मग वाचायच असत हे ही तो विसरला , पेन हातात घेऊन पुस्तकाला वही समजुन काही लिहू लागणार तोच ," पुस्तक लायब्ररीत जमा करायच "" राज"...अस म्हणताच हा भानावर आला . मित्राने पुन्हा त्याला विचारले काय झालय सांग ना ..? पण हेमराज काहीच नाही बोलला , टिपूस टिपला अन रूमच्या बाहेर चौकात असलेल्या कट्ट्यावर येऊन बसला . समोरची रहदारी शुण्य नजरेन कितीतरी वेळ पाहत होता...सोबतचे मित्र टपरीवर होते काही आजूबाजुला कट्टयांवर बसले होते . मागच्या सहा वर्षांपासुन सोबत असणारा हेमराज आज पहील्यांदा आपल्या कट्टयावर आला ह्याचे मात्र प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते .

तिन दिवस झाले होते हिनाचा फोन नव्हता , हा ही करत नव्हता , आता मात्र त्याला जाणवले की तिच्या मनात आपल्याबद्दल कणव होती , तिने दया केली , तस काहीच नव्हत आपण तिला पडतांना वाचवल , तिची देखभाल केली तेच तिने सव्याज परत केले . ती गर्भश्रीमंत बापाची लेक , मोठ मोठ्या ओळखी , दिसायला अप्रतीम सुंदर ती का आपल्याला आठवणार ...आपण कोण एक फाटका डाॅक्टर अजुन एक दमडी न कमवलेला , ती आज यशस्वी उद्योगरत...पन्नास हजार रूपये महिना कमवते ...आणि आपण कोण ..? तिने का कराव आपल्याला याद. सोड हेमराज , डोक्यातुन काढ तिचे विचार...अस मनाशीच पुटपुटत होता . तोच त्याला तिचे डोळे आठवले आणि तिच्या डोळ्यांत फक्त मदत नव्हती यार , किंवा फक्त मैत्रीही नव्हती दिसली...परततांना तिलाही भरून आलेल होत...डोळ्यांवर तिने किती पटकन काळा गाॅगल लावलेला ...तो तिच्या सोबत जगलेला एकएक क्षण आठवत होता. एका बाजुला आठवणी अन दुसर्या बाजुला त्याचे तर्क ... तीने संपर्क नव्हता केलेला . हेमराज ला गुंता सुटत नव्हता , आणि सोडवता सोडवता तो अजुन गुंत्याच स्वतः गुंतत होता.

दुपारी चारच्या सुमारास हेमराज रोजच्यासारखा कट्टयावर बसुन शुण्यात हरवलेला होता , तोच मोबाईल किणकिणला ....

हिना..."कुठेयेस तू"..?

राज..."होस्टेलवरच "...? " का "...गं..?

हिना..." मी तुला होस्टेलवर पाहून आली तू नाहीस , म्हणुन काॅल केला" ...." कुठय निट सांग "

हेमराज आता पळतच होस्टेलला गेला ...बाळा आणि सोबत हिना दोन्ही गेटवरच दिसले ...त्याला हसाव की रडाव काही कळेना ...

हिना.....खुप रागात ..."मुर्ख तुला एक काॅलपण नाही करता आला का "...? " मीच वाट पाहायची का तुझ्या फोन ची "

बाळा ..."मी याला बोललो ही की कर काॅल तर हा म्हणे ती करणार म्हटली होती " "म्हणुन याने नाही केला "

आता आभाळ मात्र खुप भरून आल होत ..... दोन्ही बाजूंनी धो धो बरसत होते ...एकमेकांना पाहत होते , हिना ने हात पसरले अन हेमराज ने तिला घट्ट मिठित घेतले ... दोन्ही हमसून हमसून रडत हिना..."वेड्या एक काॅल तर करायचा न" ..? किती छळुन घेतलस स्वतःला .. मुर्ख " ती बडबडत होती रडत होती अन हेमराज चकार शब्दही बोलत नव्हता ...हसत होता रडत होता ...

हिना ...तु सोडून गेल्यापासुन तुला भेटू वाटतय..., कामात मन नव्हत , की कशात ...बस तुझाच चेहरा दिसत होता समोर ...हिना रडत रडत बोलत होती ,

हेमराज.."मलाही तुझी खुप खुप आठवण येत होती , कशात कशातच मन नव्हत लागत..." तू जर नसती आली तर वेडा झालो असतो पिलू "...

"बस आता काही नको बोलू राजा " म्हणत हिना ने पुन्हा त्याला घट्ट मिठी मारली .

हिना- हेमराज एकमेकांच्या मिठित विसावले अन पहील्या भेटीचा साक्ष असलेला पाऊस या दोघांच्या प्रेमाचा साक्षी होण्यास आजही उतावळा दिसला ...धो धो बरसला ... चिंब चींब भीजवत होता , जोरात बरसत होता तसाच जसा पहिल्यांदा भेटले होते बिलकूल तसाच ...धुँवाधार बरसला....अन या दोन निरागस जिवांच्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार झाला.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.