माझा बापू अब्दुल लाखात एक असा माणूस. त्याचे विचार जगापेक्षा निराळेच. त्याचा शेतकऱ्यांवर फार जीव त्यांच्या बद्दल मनात एक तळमळ एक आत्मीयता होती. त्याला शेतकऱ्यांच्या कष्टाची फार जाणीव. घराच्याच काय तर पूर्ण समाजाच्या आणि धर्माच्या विरोधात जाऊन त्याने एका हिंदू शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न करून एका छोट्या गावात संसार थाटला. माझी माय मी तर तीच तोंडही पाहिलं नाही. माझा जन्म आणि तिचा मृत्यू एकाच दिवसाचा सगळ्या गावाने मला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवल पण माझा बापू एकदम खमकी सगळ्यांना पुरून उरून त्याने मला मोठ केलं. माय गेल्यानंतर बापू, मी आणि माझे दोन भाऊ राम-रहीम असा आमचा परिवार होता. आई हिंदू आणि बाबा मुस्लीम म्हणून एकाच नाव राम तर एकाच रहीम ठेवलं होत. राम रहीम म्हणजे आमच्या शेतातली शान आमचे दोघे बैल होते ते पण कधी प्राणी आहेत असा आम्हाला वाटलं देखील नाही. बापूचे तर दोन हात होते ते दोघे. बापूच्या सहवासात राहणारा कुठलाही मनुष्य मग तो कसा का असेना माणसाळल्यावाचून कसा सुटेल तसच ह्या दोघांच होत. राम रहीम वर बापूचा माझ्या इतकाच जीव. जे आमच्या ताटात असे तेच त्यांनाही बापू खायला देई. आईच सुख कधी अनुभवलं नाही पण माझ्या परिवारात त्याची कधी कमी जाणवली नाही. बघता बघता वयाचे अठरा वर्ष उलटून गेले होते पण आमचा परिवार अगदी तश्याचा तसाच होता. बापूने जितके कष्ट मला मोठ करण्यासाठी घेतले तितकेच ह्या दोघांनीही घेतले. बापू कधी शेतात जाई तर माझे दोघे भाऊ मला सांभाळत. अहो माणसपण काय जीव लावतील इतका जीव ह्या दोघांनी मला लावलाय. म्हणून तर प्रत्येक रक्षाबंधनला मी त्यांना राखी बांधी पुरणपोळी चा गोड गोड जेवण देई. माझं सोडा पण बापूला पण तितकाच आधार दिलाय अगदी मुलांसारखा..... गेल्या अठरा वर्षात फार कष्ट केलेत तिघांनी. आता बापू पण म्हातारा होत चालला होता आणि भाऊ पण. मला मोठ होताना बघून बापु मात्र चिंतातूर होई. नेहमी माझ्या भावांना माझ्या लग्नाविषयी बोलत असे पण मी ठाम होते कि मला माझ हे घर सोडून कुठेच जायचं नव्हत. बापू मला नेहमी समजावी “पोरी सगळ्याना एक दिवस दुसऱ्याच अंगण सारवायला जावच लागत” मी बापूला नेहमी उत्तर देई “कशाला पाळायच्या ह्या चालीरीती तुमचे जसे वेगळे विचार आणि वागणूक आहे तसच मीही काहीतरी वेगळ नाही करू शकत का” ह्यावर बापू नेहमी हसून सोडून देई. भावांना तर काय बहिणीच्या लग्नात पण काम करण्याची घाई. ते म्हणत आम्ही म्हातारे व्हायच्या आत आम्हाला आमच कर्तव्य पार पाडू दे. असाच आमचा हसरा खेळता संसार होता. अगदी प्राणीच ते पण जीवात जीव ओतणारे त्यांची प्रत्येक भाषा आम्हाला समजे. आई-बापू च जस लग्न झाल तसं राम रहीम ह्या घराची सेवा करत होते. कुणीही याव आणि त्यांच्याकडून माणुसकी शिकावं असे होते ते दोघे....अगदी बापुची सावलीच जणू.

सुखाचे दिवस आम्ही जगात होतो . अचानक गावात जनावरांचा एक रोग पसरला. बघता बघता गावातली जनावर मरायला लागली. मी बापू ने सगळ्या कामाचा बोझा सांभाळला अगदी राम रहीम ची सगळी काम आम्ही करू लागलो पण त्या दोघांना घराच्या बाहेर पाय ठेऊ दिला नाही. दोघाना फार वाईट वाटे कि बापू आणि बहिण कष्ट करताय. दोघेही रोज आमच्यासाठी अश्रू गाळत. बाबा त्यांना समजावत, “पोरांनो थोडे दिवस फक्त मग तुम्हीच काम करा. मुलांची रक्षा कारण प्रत्येक आई वडिलांच काम असत त्यात वाईट वाटण्याच कारण नाही” बापूचे हे शब्द एकून तर आम्ही तिघे अश्रूंनी भिजायचो. खूप काळजी आणि मनात भीती होती आमच्या. सर्वतोपरी काळजी करून पण राम ला आजाराने घेरल. राम फार कमजोर झाला. त्याची सगळी ताकद संपली. बापु ने सगळे इलाज केले अगदि शेत गहाण टाकुन रामच दवा पाणी केल. नशीबाची साथ समजा की रामची पुण्याइ पण ह्या साथीच्या रोगातुन राम वाचला. पण राम च शरीर मात्र थकल. डॉक्टरानी राम ला कुठलच जड काम करायला नाहि सांगितल होत. रहिमला हि राम च आजारपण बघवेना. आता बापुही थकला होता पण रामच्या आजरपणात शेत गहाण टाकल म्हणुन मग रहिम ने एकट्यानेच शेतीचा गाडा ओढायला सुरु केला. मी आणि रहिम खुप कष्ट करु लागलो. राम आणि बापु ला माझी फार दया येइ खुप चिंता लागे कि कस होणार ह्या पोरिच. त्यांच मन त्याना खाइ.

ह्याच दिवसात आमच्या तालुक्याला नेहमी एक बैलांची शर्यत असे. जिंकणार्याला भरघोस बक्षिस मिळे. दरवर्षी तो बक्षिसाचा मान राम रहिम ला मिळे. या वर्षीही शर्यतीची घोषणा झाली. मोठं बक्षिस जाहीर झाल. राम रहिम ला फार वाईट वाटत होत. रामने तर बापुपुढे हट्टच धरला पण बापुने रामला साफ नकार दिला. रामचा जीव बापुला महत्वाचा होता. याच दरम्यान माझ्यासाठी तालुक्याच स्थळ चालून आल. बापूकडे आता पैसा शिल्लक नव्हता पण इतक चांगल स्थळ नाकारण बापुला पटत नव्हत. मुलाकडची मंडळी बापुला चांगली ओळखत होति. तिघेही फार चिंतातुर झाले काय कराव त्याना कळेना. मला तर लग्न तेही ह्या परिस्थितीत मान्यच नव्हत. शर्यातीला अजुन चार दिवस होते. रामने बाबाना फार विनवण्या केल्या. अगदि रामने जेवण पाणी सोडल. बाबाना राम पुढे हार मानावी लागली. शेवटी राम रहिम शर्यतीत उतरले.

तो शर्यातीचा दिवस उगवला. आम्ही तालुक्याच्या गावी पोहचलो. सगळ्यानी गळाभेट घेतली. रामने तर मला आशिर्वाद देउन मोकळ केल. आमच्या डोळ्यात अश्रू शिवाय काहिच नव्हत. शर्यत सुरु झाली. रामने माझ्याकडे बघितल. त्याच्या डोळ्यात बहिणीबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होत. एक प्राणी असुन या भावना आज जवळुन त्याच्या डोळ्यात बघितल्या. त्याने जणु खुणगाठ बांधली होती कि बहिणीसाठी जीव गेला तर चालेल पण जिंकायच जरुर. शर्यत सुरु झाली. राम ने अर्धी शर्यत पार केलि आणि अचानक जमिनीवर कोसळला. बापु आणि माझा तर हंबरडाच फुटला. आम्हाला इतक आक्रांत करताना बघुन राम पुन्हा उभा राहिला. रहिमने त्याला जरा धीर दिला. ते पुन्हा धावु लागले. बापु तर जागीच थबकला. बघता बघता दोघे सगळ्याना चिरुन पुढे जाउ लागले. राम रहिम ने नेहमी प्रमाणे बाजी मारलि. ह्यावर्षाच भरघोस बक्षीस पटकवल. बापु ने रामला घट्ट मिठी मारली. राम एकदम फणफणला होता. त्याने माझ्याकडे बघितले आणि बापुला सांगितके कि ह्या नकटीच आता लग्न करा. बापुला रामचा श्वास कळुन चुकला. बापु काहि बोलण्याच्या आतच राम पुन्हा जमिनीवर कोसळला तो परत न उठण्यासाठि. माय गेली पण माय गेल्याच दुख काय असत मला माहित नव्हत पण आज आपल्या जिवाभावाच्या माणसाला मुकल्यावर काय अवस्था होते ते कळल. बापु ने तर माय आणि राम दोघाना दुर जाताना बघितल काय म्हणत असेल त्याचा जीव. माणुस एकवेळ दगा देइल पण ह्या मुक्या भावाने आज त्याचा जीव देउन मला नविन आयुष्य देवु केल होत. देवाला हेच सांगेन कि एकवेळ मला घर संसार नाहि दिला तरि चालेल पण राम सारखा भाउ मला सात जन्म लाभु दे.

 कविता अमित महाजन


marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.