धक्का 
लहांनपणा पासूनच ती सर्वांमध्ये चुणचुणित म्हणुन प्रसिद्द होती..
अभिनय , नाच इतर सर्वच क्षेत्रात हिरिरिने पुढे असायची, अभ्यासात फार हुशार नव्हती अगदीच ढ सुद्धा नव्हती ...घरात तिच्या वावरानेच गरीब पण खाऊन सुखी असणाऱ्या आईबापाला स्वर्गसुख देऊन जायचे...पोरगी मोठे होवून चांगले नाव काढ़णार याबाबतीत कोणाचेच दुमत नव्हते.. दहावी झाल्यावर, कॉलेज सुरु झाले आणि या वयात जी बाकीच्या साठी नार्मल असते तशाच तारुण्यसुलभ भावना हिच्या असल्याने एका समीर नावाच्या मुलाचा आयुष्यात प्रवेश झाल..मुलगा दिसायला अतिशय देखणा ,त्याच्या घरची परिस्थिती त्या मनाने खुपच चांगली..त्यामुळे चैनीत वाढलेला......

दिवसेदिवस यांचे प्रेम फुलू लागले..आणि अर्थात घरी याची वार्ता लागलीच..इतर ठिकाणी होतो तसा तमाशा झालांच..आई बापाने,
जवळच्या नातेवाइकाने समजून सांगितले,पण आता हि ऐकायाच्या तयारीत नव्हती..त्या मुलाशीच् लग्न करण्यावर ठाम होती,आईबापाने त्या मुलाच्या घराच्यांची भेट घेतली पण साहजिकच आर्थिक परिस्थिती हे कारण सांगता येत नसल्याने त्याच्या वडिलांनी " वेगळी जात " हे कारण सांगून स्थळ नाकारले..मुलाने सुद्धा बापाच्या संपत्ती वर लाथ मारायची हिंमत नसल्याने हिच्याशी नाते तोडून टाकले ...आता मात्र हि खचली..
सर्व कलागुण जात्यात गुंडाळून ठेऊन फक्त रोजच्या पाट्या टाकू लागली.
आत्मविश्वास प्रचंड कमी झाला होता..लग्नाचे नाव सुद्धा कोणाला घेऊ देत नव्हती..पण टाळणार तरी किती दिवस ?? कधी तरी लग्न करायचे होते ...

तशातच नात्यात कोणाच्या तरी ओळखीने महेश चे स्थळ आले..
बऱ्यापैकी नोकरी, स्वताचे घर आणि एकलुता एक ..असे लग्नाचे बऱ्यापैकी प्रोडक्ट असलेला तो हिच्या घरच्याना लगेच आवडला आणि अजिबात वेळ न दवड़ता ह्याच्याशी लग्न सुद्धा उरकुन टाकले..
लग्नाला उभी असलेली ती मात्र एक जीवंत प्रेत होती..चेहऱ्यावर जरी हांसू असले तरी मनात समीर बरोबर व्यतीत केलेले क्षण आठवत
होती..लग्नानंतर हळू हळू रुळत जाणे तिला भाग होते म्हणून नाहीं पण अतिशय मोकळ्या आणि हसतमुख स्वभावाच्या महेश मुळे सहज शक्य झाले..काही दिवसातच जुने सर्व विसरून ती संसारात रमली..
एका मुलीच्या जन्मानंतर तर आयुष्य स्वर्गच झाले त्यांचे..हळू हळू मोठी होणारया तनया मध्ये स्वताचे बालपण शोधु लागली..महेश तर बाबा म्हणून सुद्धा किती मोठा आहे हे अनुभवु लागली..पण दैवाला हे सुद्धा मान्य नव्हते.अचानक महेश ला ब्रेन ट्यूमर झाला आणि आनंदी कुटुंब परत एकदा जुन्या वळणावर येऊन थांबले..पैशाची काहिं कमी नव्हती पण नाशिबाची कमतरता होती..काही दिवसातच न विसरत्या येणाऱ्या आठवणी देऊन महेश कायमचा निघुन गेला!

पुन्हा एकदा दुखाच्या गर्तेत आलेली ती आता मात्र तनयासाठी खंबीर पणे उभी राहिली..दोघी जणी महेशच्या आठवणीना उजाळा देत एकमेकाला धरून जगु लागल्या..आर्थिक तजवीज महेश ने सर्व केलेली असल्याने तेवढे मात्र टेंशन नव्हते..तनया आता चौथी ला गेली होती..घरचे दूसरे लग्न कर म्हणून मागे लागले पण आता मात्र हिची इच्छा मेली होती..

त्यातच एक दिवस पुन्हा समीर भेटला..घरी आला हिला भेटायला!

तू सोडून गेल्यापासून मी तसाच आहे ग ! लग्न सुद्धा नाही केल !
काय करू ? चुकले माझे पण बाबांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकलो..
तुझे लग्न होवून तू सुखी असल्याचे तरी मला समाधान होते..काही दिवसात आई,बाबा गेले आणि मी एकटाच पडलो...
तुझ्या नवरा गेल्याच समजले आणि वाइट वाटले..तुला भेटाव वाटत होत पण धीर होत नव्हता, आज आलो मनाची तयारी करुन !
चल निघतो तुझ्यापाशी मन मोकळ करुन तुझी माफी सुद्धा मागायची होती !
एक शेवटचे विचारतो आता - लग्न करशील माझ्याशी ?त्या वेळेस माघार घेतलेला मी आता काही झाल तरी तुला सुखात ठेवेल..तुझ्या मुलीला सुद्धा बाबांची कमी नाही जाणवू देणार कधी..बघ विचार कर आणि फोन कर मला ! हे माझे कार्ड...अस म्हणून निघुन सुद्धा गेला !

आता मात्र अजुन हि धक्यातून सावरली नाही,एवढ्या फटाफट बोलून तो निघुन गेला कि हिला सुचलेच नाही..कसा विश्वास ठेवू याच्यावर ??
आताच का आला परत ?? जेव्हा पाहिजे तेव्हा पळून गेला..

दुसऱ्या दिवशी तनया शाळेत गेल्यावर पुन्हा विचार सुरु झाले,पण लग्न नाही केल अजुन म्हणतोय म्हणजे खरच पश्चाताप झाला असेल?..मला मुलगी असून सुद्धा लग्न करायला तयार आहे हां.एकटी तरी किती दिवस राहणार मी समाजात आणि तनयाला सुद्धा बाबांचा आधार लागेलच..कोणत्या तरी नविन माणसा बरोबर लग्न करण्यापेक्षा ह्याला तर ओळखते मी ..असे अनेक विचार मनात आले..आई बाबांना तरी आता काय विचारु ? असेही ते लग्न कर म्हणून मागे लागलेच आहेत !..पण ह्याचाशी करू का नको हां निर्णय मात्र माझाच असणार आहे..तोहि एवढ्या पटकन निघुन गेला क़ि मला काही बोलताच आले नाही..जाताना दिलेले कार्ड मात्र आहे जवळ,पण फोन करण्यापेक्षा ह्याच्याशी जाउंन समोरासमोर बोलावे परत एकदा अस वाटू लागले !

तनयाला यायला अजुन वेळ आहे हे पाहुन हिने त्याच्या घरी जाऊन बोलायचे ठरविले..घर माहित होतेच पण हयाने कधी त्याच्या वडिलांमुळे आत नव्हते नेले,आज त्याच घरी हि निघाली होती त्याला भेटायला..
नशिबाने पुन्हा एकदा वेगळ्यां वळणावर आणून उभे केले महेशच्या अकाली निधनाने ! आणि विचार करता करता त्याच्या घराच्या दारात येऊन उभी राहिली..बेल वाजवू का नको ? असा विचार करत खुप वेळ अलीकडेच थांबली पण धीर करुन गेली एकदाची पुढे ....

बेल वाजविणार तितक्यात दरवाजा उघडाच दिसला , आणि आतून जोराचा हसण्याचा आवाज आला....बोल रे ! तुलाच कॉल करणार होतो तेव्हढ़यात तुझा फोन आला...
कालचे काय झाले काय विचारतोस ? एकदम भारी एक्टिंग करुन आलोय काल..तिला फुल्टू भावनिक केल आणि तिच्यासाठी अजुन लग्न नाही केल अशा बाता पण मारल्या ..पण पटेल रे ती नक्की , कुठे जाणारे! माझे लग्न अजून नाही झाले हा लै प्लस पॉइंट ठरणार बघ माझ्यासाठी!
मला माहीत आहे , अशा situation ला तीला मी बेस्ट option वाटून ती येणार माझ्याकडेच..आणि तिला तरी कुठे idea आहे कि कर्जबाजारी झालेला मी,तिच्या नवरयाने हिला मागे ठेवलेल्या पैशाच्या साठी हिला जाळ्यात ओढतोय ते ...साला बाप होता तोवर पैशाला कमी नाही पडली काय, पण आता मात्र त्यांचे पैसे सुद्धा आपल्या शौकांपायी संपून गेले..
बापाने मागे ठेवलेला बिजनेस पण झोपल्यात जमा आहे ! हिचा नवरा मेलेला कळले आणि नवर्याने मागे ठेवलेले घरदार आणि पैसा पण आहे समजले..आयतेच घबाड़ लागल हाताला...आपली पैशाची लफडी मिटेल आणि बायको म्हणून पण कायमची " सोय" होईल यार ! किती दिवस बाहेर काढायाचे ...अस म्हणून जोरजोरात हसु लागला....

जोराचा झटका लागल्याने जागेवर स्तब्ध झालेल्या हिने, बेल न वाजवताच मागे वळून चालण्यास सुरवात केली..चालता चालता विचार करू लागली..देवा काय रे हे ?अजुन किती धक्के देणार आहेस आयुष्यात...पण या आता दिलेल्या धक्क्याने मात्र तुझे आभार मानते,आयुष्याची अजुन राखरांगोळी होण्या पासून वाचविलेस.जर आज दरवाजा उघडा नसता तर समीरचे हे रूप मला कधीच कळले नसते...आणि माझे तर झालेच असते पण तनयाचे सुद्धा आयुष्य बरबाद झाले असते या नराधमा पायी ! 

मला आणि तनया ला जगायला महेश च्या आठवणी पुरेशा आहेत , असा विचार करुन तनयाला शाळेतुन आणायला निघाली सुद्धा !! 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.