सौम्या


नाही मला शेखर शी लग्न नाही करायचे...,

सौम्या आईबाबांसमोर आणि शेखर समोर बोलत होती.....(समाज काय म्हणेल)

काय होईल माझे....????

ऐन ४-५ दिवसांवर लग्न येऊन ठेपलेलं,अन हि मुलगी आत्त्ता लग्नाला नाही म्हणतेय म्हटल्यावर शेखर तर अक्षरशः रडायलाच लागला.

ए अमृता सांग ना गं मी काय करू??? सौम्या अमृता ला म्हणाली,,,,,,," अमृता" सौम्याची २५ वर्षांची मुलगी.

मम्मा तुला जे योग्य वाटेल ना ते कर,i am always with you.

मग सौम्या थोडी आपल्या विचारात- भूतकाळात डोकावते....(आणि चालू होतो तो खडतर प्रवास)

सौम्या एक साधारण पण सुसंस्कृत घरातील छान,सुंदर,डोळस,आणि अत्यंत देखणी असलेली आणि वयाची १७ वर्षे पूर्ण केलेली मुलगी....

घरातील आईवडिलांची पहिली मुलगी अन तिच्या पाठी आणखी ६ बहिणी.

घरातील मोठी मुलगी म्हटल्यावर आणि आणखी सहा मुली असल्यावर साहजिकच आईवडिलांना मोठ्या मुलीच्या लग्नाची घाई...सौम्याला जर चांगले स्थळ आले तर बघू कि लग्नाचं...(सौम्याचे आईवडील)

आणि बघता बघता खरंच एक स्थळ सौम्यासाठी चालून आलेलं...नाव "विजय"-मुलगा सरकारी नौकरी करतो,चांगला गोरागोमटा,पगार पण चांगलाआणि सौम्याला शोभेल असा असल्यामुळे घरच्यांना हे स्थळ आवडले,आणि एकाच शहरात सासर-माहेर असल्यामुळे तर योग्यच वाटले....

मग काय सौम्याचे साक्षगंध झाले,अन आईवडीलही खुश झाले..(चला एकदाचे सौम्याचे लग्न जुळले-सौम्याचे आईवडील)

मग काय सौम्याला तिची लहान भावंडं चिडवू लागली,ये दीदी आम्हाला जीजू मिळणार आता...बिचारी लाजून आतमध्ये घरात जाते..

"पण खरंच हि वेळ होती का लग्नाची??? मुलीची जरी १८ वर्ष हि लग्नाला योग्य समजली जात असली तरी ती मनाने,शरीराने आणि मानसिकदृष्ट्या,आणि मुळात तिची इच्छा असायला हवी लग्न करायची"

पण समाज ...??? आणि घरी आणखी सहा मुली या सगळ्याचा विचार करता आईवडिलांनी सौम्याच्या लग्नाचा निर्णय घेतला.

मग काही महिने असेच निघून गेले,साक्षगंधाच्या ५-६ महिन्यांनी सौम्याचे विजयशी धुमधडाक्यात लग्न झाले.


ते म्हणतात ना.... नऊ दिवस नवरीचे..असे १ दीड वर्ष लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले.

सौम्याच्या वडिलांनी लग्नाची जरा जास्तच घाई केली होती, आपल्या जवळच्या नातेवाईकाचे नातलग म्हणून नवऱ्यामुलाचे नातलग न बघता लग्न जुळवून टाकले..

सासर आणि माहेर एकाच शहरात असल्यामुळे सौम्याचे नेहमीच आपल्या माहेरी जाणे-येणे असायचे..विजय तिला ड्युटीवर जातांना माहेरी सोडून द्यायचा..आणि संध्याकाळी परत घ्यायला यायचा.

पण काहीतरी विपरीत घडावे असे घडू लागले..त्यांच्या सुखी संसाराला कुणाचीतरी नजर लागली...

मग विजय सौम्याला रोजच तिच्या माहेरी सोडायला लागला..सुरुवातीला तो घ्यायला यायचा पण नंतर तेही बंद झाले...

बघता बघता लग्नाला दोन वर्ष झाली आणि बाळराजाची चाहूल लागली..

सौम्याने एका छान सुंदर गोंडस अश्या मुलीला जन्म दिला..बघता बघता मुलगी तीन महिन्याची झाली,,छान नामकरण सोहळा पार पडला...

पण घराला मुलगाच वंश म्हणून हवा या कारणाने तिची सासू बाळाला बघायला सुद्धा आली नाही.....

पण वेळ हे औषध असते असे म्हणतात,,त्याप्रमाणे सौम्याच्या सासूचा राग निवळला (पण तो काही दिवसांपुरताच) आणि बाळाला घेऊन आपल्या घरी आल्या..


अमृता अडीच तीन वर्षांची असेल, तेंव्हा एकदा सौम्याच्या सासूने अमृता ला पायऱ्यांवरून ढकलून दिले, थोडाफार मुका मार लागला अमृताला ...तेंव्हा सौम्याने अमृता ला विचारले,"बाळा कशी पडली तू"?? तेंव्हा आपल्या तोडक्या मोडक्या आवाजात अमृताने सांगितले,"मम्मा आजीने मला ढकलून दिले....छोट्याश्या अमृता ला जरी घटनेचे गांभीर्य लक्षात आले नसेल पण सौम्या मात्र जे समजायचे ते समजली आणि आपल्या माहेरी तडक निघून आली....

दोष देत बसली आपल्या नशिबाला आणि आपल्या आईवडिलांना कि एवढ्या लवकर तिचे लग्न का करून दिले??? समोर शिकण्याची इच्छा असताना तिचे लग्न लावून दिले याबद्दल ती आईवडिलाना जाब विचारत होती...

मग नेहमीप्रमाणे रूढी-रीतीप्रमाणे सर्व नातेवाईकांच्या घरी बैठक बसू लागल्या,,सौम्याला तिच्या सासरी परत पाठवण्याचे सगळे प्रयत्न झाले, पण सगळे निष्फळ ठरले,,सौम्याला तिच्या पेक्षा अमृताची जास्त काळजी होती,म्हणून तिने सासरी परत न जाण्याचा निर्णय घेतला....

मग काही दिवस असेच गेले,घरी कधीतरी आईवडील सासरी परत जाण्याचा विषय काढायचे,बोलायचे,पण याचा सौम्यावर काही परिणाम झाला नाही.

मध्ये २-३ वर्ष असेच गेले असतील,आता सौम्या घडलेल्या घटनेतून बऱ्यापैकी सावरली होती,त्यामुळे तिने आता आपल्या शिक्षण आणि नौकरी बद्दल घरच्यांना सांगितले,कि ती नौकरी करू इच्छिते,घरच्यांनी पण लगेच होकार दिला....

तिने तिचे शिक्षण पूर्ण करून नौकरी साठी अर्ज दाखल केले,आणि एक दिवस तिला चांगल्या पगाराची नौकरी लागली.मग छोट्या अमृता ला आपल्या आईकडे सोडून ती नौकरी करू लागली...काही दिवसांनी सौम्याने तिच्या पतीकडून कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन घेतला,,,,

एकदा नौकरीच्या निमित्ताने सौम्याला बाहेरगावी जावे लागले,तिथे एकदा काम करताना एक व्यक्ती येऊन म्हणाली,"कि इथे मी नौकरीसाठी अर्ज केला होता आणि मी सिलेक्ट पण झालो होतो पण मला त्यांनी अजून नौकरीवर घेतले नाही,,अशाप्रकारची तक्रार तो करत होता...
मग सौम्याने ते प्रकरण मोठ्या साहेबांकडे सुपूर्द केले...आणि काही दिवसांनी त्याला नौकरीवर ठेवले...मग ती व्यक्ती आणि सौम्या सोबत नौकरी करायला लागले...तर अशी झाली शेखर आणि सौम्याची ओळख..


कधीकधी थोडेफार सौम्याचे शेखरशी बोलणे होई...पण सौम्या आधी टाळायची शेखरला...उगाचच जास्त ओळख नको म्हणून...

पण नंतर थोडी थोडी बोलायला लागली..कारण कुणीतरी होते बोलायला तेवढेच हायसे वाटायचे सौम्याला...शेखरही तसाच अगदी कमी बोलणारा,जसे शब्द विकत घ्यावे लागायचे बोलायसाठी....थोडे थोडे का होईना पण नंतर चांगली ओळख झाली या दोघांची...मग सौम्या पण त्याला प्रत्येक गोष्ट सांगायची..मग जेवणाचा डबा एकत्र खाणे वगैरे चालायचे...

खरंतर शेखर पहिल्या भेटीतच सौम्याच्या प्रेमात पडला होता पण त्याने थोडी वाट बघणे ठरविले...

त्या ठिकाणचे काम संपल्यामुळे सौम्या परत आपल्या नेहमीच्या नौकरीच्या ठिकाणी आली...असेच काही दिवस गेले..तिकडे शेखरला काही करमेना तिच्याशिवाय..मग त्याने एकदा असेच नौकरीच्या काही कामानिमित्त फोन केला ...आणि सांगितले कि तो तिकडे येणार आहे..सौम्याला पण चांगले वाटले..कि खूप दिवसांनी तिची शेखरशी भेट होईल म्हणून..


मग तो बरेचदा सौम्याशी असेच फोनवर बोलायचा पण त्यांच्या मनात सौम्याविषयी जे प्रेम होते ते ते त्याला व्यक्त करायला चान्सच मिळत नव्हता...
पण मग एकदा त्याने ते बोलून दाखवले,सौम्याने त्याला सरळ नाही म्हटले,,कारण एकतर तेव्हा ती घटस्फोटीत होती आणि वरून एक मुलगीसुद्धा त्यामुळे तिने त्याला नकार दिला.. सोबत काम करत असताना सौम्याने थोडेफार तिच्याबद्दल शेखरला सांगितले होते त्यामुळे शेखर ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या तरीसुद्धा त्याला सौम्या आवडायची...त्याचे सौम्यावर खरे प्रेम होते..म्हणून तो बाकी सर्व गोष्टींना दुय्यम मानत होता....

...आणि परत आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती नको या कारणाने सौम्या शेखरशी जरा तोलून मोलूनच बोलायची...(इच्छा नसताना सुद्धा माणसाला काही बंधने हि जपावी लागतात ह्याचे हे उदाहरण)

पण म्हणतात ना प्रेम हे आंधळे असते,आणि खऱ्या प्रेमाला दुसऱ्या कुठल्याही कारणाची आवश्यकता हि मुळीच नसते.. तर असो,,,,

असेच काही दिवस गेले..मग सौम्याला सुद्धा शेखर आवडायला लागला..दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले...पण सौम्याला एक प्रश्न पडला होता कि घरी आईबाबांना आणि तिच्या मुलीला म्हणजेअमृता ला ह्याबाबतीत काय आणि कसे सांगायचे?? कारण आता अमृता हि जवळपास २५ वर्षांची होत आलेली....ह्यामुळे सौम्या खूप काळजीत पडलेली असायची...

मग एकदा सौम्याने शेखरला म्हटले नव्हे अटच टाकली कि जिथपर्यंत अमृताचे लग्न होत नाही तिथपर्यंत आपण लग्न करायचे नाही..आणि तोसुद्धा तयार झाला...आणि मग एकदा अमृता ला एक चांगले स्थळ आले लग्नाचे...अमृताचा होकार असल्यामुळे लगेच अमृताचे लग्न होऊन अमृता तिच्या सासरी निघून गेली....

आता शेखर लग्नासाठी सौम्याच्या मागे लागला...ए सौम्या आतातरी हो म्हण ना गं....बघ मी एवढे वर्ष तुझी वाट बघितली ना....

पण आता पुन्हा सौम्यसाठी तोच यक्षप्रश्न कि आता घरी काय सांगायचे??अमृताला काय सांगायचे??? आणि आपण आता ह्या फंद्यात का पडलो असे तिला नेहमीच वाटायचे...पण शेखर हा एक चांगला व्यक्ती होता..हे ती जाणून असल्यामुळे..म्हणून तिने याविषयी घरी सांगण्याचे ठरविले...

आणि सौम्याने सर्वात आधी अमृताला सांगितले..बाकी कुणी नाही पण अमृताला सांगणे अतिमहत्त्वाचे होते...

अमृता तर ऐकूनच तिच्या मम्माच्या लग्नाला तयार झाली होती कारण तिला वडील मिळणार होते..लहानपणी वडिलांच्या प्रेमाला मुकलेली ती..वडील काय असतात आपल्या मुलींवर त्यांचे प्रेम कसे असते ह्याचा अनुभव घ्यायला ती नक्कीच मनापासून तयार झाली होती.....

मग अमृताने तिच्या नवऱ्याला ह्याबाबतीत सांगितले..तो सुद्धा नवीन पुरोगामी विचारांचा असल्यामुळे तो लगेच तयार झाला..

आणि मुळात अमृता समजूतदार खूप होती त्यामुळे तिच्या मम्माच्या मनात काय घालमेल सुरु असणार हे तिने आधीच जाणून घेतले होते त्यामुळे एक नवीन अनुभव घ्यायला हि पोर तयार झाली होती.......

ए मम्मा...ए मम्मा....(अमृता सौम्याला तिच्या तंद्रीतून उठवत) ..कुठे हरवलीस गं...
चल पटकन खूप तयारी व्हायची आहे अजून लग्नाची.....
ए मम्मा मी काय घालू गं तुझ्या लग्नात ...साडी...घागरा ...सांग ना ..
आणि हो तुला मीच सजवणार आहे छान बघशील...हं....

आणि लग्नाच्या दिवशी सर्व चालीरीतींना फाटा देत अमृता आणि तिच्या नवऱ्याने अमृताच्या आईचे कन्यादान केले ...

शेवटी मुली ह्या मुलीच असतात...आपल्या मम्माला किती चांगल्या तह्रेने तिने सांभाळले..गुणांची पोर गं ..(सौम्याचे आईवडील)

आणि मग पुन्हा एकदा सौम्या आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करते शेखरसोबत...
आणि सगळे मग आनंदाने गुण्यागोविंदाने आपले जीवन जगायला लागतात....

==========================================================================================

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.