हॅव अ ब्रंच: # ‘व्हॉइस ऑफ सायलेन्स

प्रांजलला ती कॉलेजला जायला लागल्यापासूनच कळलं होतं की, पप्पांच त्यांच्याच सेक्रेटरीबरोबर अफेअर आहे. मम्मीचां, माझा राग राग करतात, दोन-दोन दिवस घरी येत नाहीत, आमच्याशी नीट बोलत नाहीत... आज ती तीन वर्षे त्यांची एकमेकांशी भांडणं, मारामारी पहात होती.. तिला आठवलं की, एकदा तर मम्मी रागाने बोलली देखील होती... “मुलीच्या वयाची आहे, तुमची सेक्रेटरी!! यु डोन्टॅ हॅव सम शेम!...” पप्पाने मम्मीला बेदम मारलं होतं... काळंनीळं अंग, सुजरा चेह-याने प्रांजलला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली होती. तीन पोलीस त्या मायलेकींकडे विचित्र नजरेने बघत होते. एका हवालदाराने तिला पाणी देताना ओठांवरून जीभ फिरवली होती. ममीची कम्प्लेंट लिहून घेतली, तेव्हा मम्मीने उजव्या हाताच्या काळ्या-निळ्या बोटांनी पाच हजार दिले होते. “हो... जा तुम्ही, आम्ही त्याला बघून घेतो” असं म्हटले पोलीस, पण पुढे काय झालं त्या कम्प्लेंटचं, ते काही कळलं नाही...

लहानपणी, प्रांजल खूप बडबडी होती, अवखळ होती, मस्तीखोर होती. सगळं तसं छान चाललेलं होतं. मम्मी नोकरी करायची, पण तिने व्हीआरएस घेतली. त्या पैशांची मम्मीने, मग पप्पांचं नाव पहिलं लिहून दोघांच्या नावावर, एफडी केली. त्यानंतर पप्पा मॉलीच्या प्रेमात पडले. आणि मम्मीचा छळ सुरु झाला. वीस लाखांची एफडी, पप्पांनी ब्लॉक केली. ते सही तर करतच नव्हते, पण त्यांनी नॉमिनी म्हणून प्रांजलचं नाव काढून मॉलीचं नाव टाकलं. घर तर पप्पांच्याच नावावर होतं, ते भांडणात मम्मीला घराबाहेरही काढून टाकण्याच्या धमक्या द्यायचे. प्रांजल हे सतत तीन वर्षे पाहत होती. बडबडी प्रांजल हळूहळू शांत होत गेली. ती घाबरायची, आणि तिच्या खोलीतून बाहेर यायची नाही. तिने दोन-तीनदा खाल्लेल्या मारावरून तिला कळले होते, आपल्या बापाला आपण नकोय... तो कधीही आपल्याला आणि मम्मीला मारून टाकेल... मम्मी घर सोडून आता, कोर्टाची पायरी चढू शकत नाही, मुलीचं लग्नाचं बघायच सोडून, बापाला काय अवदसा सुचतेय... याने मम्मी खंगत चाललेली होती. पण तिला तिच्या कष्टाचे एफडीचे पैसे पाहिजे होते... घरात तिचा हिस्सा हवा होता... तिला तिचा नवरा परत हवा होता... तिला पप्पाना डायव्होर्स द्यायचा नव्हता... प्रांजलला कळायचं नाही आता काय करायचं?...

काल पप्पा घरी आले, हातात कसली तरी फाईल होती, वाकून त्यांनी ती टेबलावर ठेवली, आणि तिच्याकडे पाहून म्हणाले,”कुठे चाललीयेस, तुझी आई आहे का घरात?”

“मी ... जरा मैत्रीणीकडे...” तिने चाचरत उत्तर दिले.

“तुझ्या आईला ही फाईल पाहून सांग, गप-गुमान सही करायची यावर... नाहीतर मला घेता येईल, कोणत्याही प्रकारे... डोन्ट प्रोलॉन्ग धिस!... सांगायचं तिला... काय?” डोळ्यात प्रचंड राग होता.

“हो सांगते...” ती हळूच म्हणाली. मम्मी बाजारात गेली होती, ती आली... तिला पाणी दिल्यावर, प्रांजलने ती फाईल दाखवली. मम्मीचा चेहरा आक्रसला, ती त्या फाईलकडे पाहून म्हणाली, “मी देत नाही सही... काय करतोस कर!... का देऊ मी डायव्होर्स?”

तेवढ्यात पप्पा आले, “काय बोललीस?” असं म्हणून त्यांनी फाटकन तिच्या थोबाडीत मारली. त्यांच्या माराचा तडाखा इतका होता, की, मम्मी भेलकांडून खाली पडली, तिने सावरता सावरता टेबलाची कड पकडली. तीच्या ओठाच्या कडेतून रक्त येऊ लागले. तिने सावरले स्वत:ला, आणि पप्पांच्या नजरेला सरळ नजर देऊन म्हणाली, मी नाही करत सही, जा काय करायचं ते कर!... मारशील मला, मार, मारून टाकशील, मारून टाक... पण मी मेले तर तू लटकशील, माझी मुलगी सांगेल, ती काय काय बघतेय ते... मार मार मला...” भाजीची पिशवी कलंडली होती, दोन टॉमेटो त्यातून बाहेर येऊन घरंगळलेले होते, पप्पांनी ब्लेझर सोफ्यावर भिरकावला.आणि ते तडक प्रांजलकडे आले, प्रांजळ थरथर कापत होती... तिचे खांदे पडले होते, ओठ सुकले होते, हातपाय गळाले होते... त्यांनी तिचा कुडता पकडला, आणि खसकन खेचला. प्रांजळ मनातून खूप घाबरली. तिला वाटलं आता तो फाटणारच... कुडता हाताखालच्या कमरेवरच्या शिलाईमधून उस्कटलाच, त्यांनी तिच्या दंडाला घट्ट पकडले, मम्मी धडपडत तिच्यापर्यंत पोहचली.

जोरात किंचाळून म्हणाली, “ काय करतोय? कपडे का फाडतोय तिचे?... सोड तिला, तिला का मध्ये घेतोय... सोड म्हणते नं तिला. “ /

ते तिच्या अंगावर वसकन ओरडले,” एक गप बस... गप बस एकदम!!... ती बोलेल न तुझ्याबाजूने, येस राईट... बघ तिचं काय करतो ते... त्यांनी तिला स्वत:च्या अंगावर खेचली, प्रांजलच्या मानेला जोराचा हिसका बसला, मम्मीने प्रांजलचा दुसरा हात पकडला आणि तिच्या अंगावर ती तिला ओढू लागली. तिची ताकद कमी पडत होती, प्रांजलच्या दोन्ही बगलेतल्या शिरा ताणल्या गेल्या, सळसळून वेदना डोक्यात गेली. पप्पानी मम्मीला एका हाताने जोरात ढकलून दिलं... ती कोलमडली. पप्पा प्रांजलला घेऊन फरफटत आतल्या खोलीत गेले, त्यांनी तिच्याकडे भयानक किळसवाण्या नजरेने पाहीलं. आणि तिच्या पोटात लाथ मारून आत ढकललं... ती कळवळली. खाली कोसळली. त्यांनी बाहेरून खोलीचं दार लावलं...”साली...आता मर आत... जस्ट वेट... आता तुला कळणार नाही, तुझ्या आईचं काय होतं!!...” मम्मी धावत आली, “अरे, काय करताय? लीव्ह हर... तिला का कोंडून ठेवतोयेस तू? तिला सोड...” मम्मी कळवळून बोलत होती.” नाऊ यू!!!..चल, चल... तुझ्याकडे बघतो, मी...चल...” बंद खोलीतून बाहेरचा आवाज, क्षीण होत गेला. प्रांजल जमिनीवर पडलेली होती... अर्धमेली... पोटात कळा येत होत्या. तिला दूरवरून “अरे... नको, नको... आईग!... शी... आईग!!... “ असा मम्मीचा आवाज येत होता... प्रांजल त्याही अवस्थेत विचार करत राहिली...‘काय झालं असेल? पप्पा, मम्मीला मारून टाकणार नाहीत... मग सही कशी होईल?... मम्मी... सॉरी, आय कान्ट हेल्प यू.. मम्मी... मम्मी.’ ती कळवळत उठली. आणि दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत राहिली. मम्मीचा आईग!... आईग... असाच आवाज येत होता. तिला तिच्या मम्मीची खूप काळजी वाटली. तहान लागली, पण बेडरुममध्ये पाणी नव्हतं... तिने दाराचं लॉक उघडतंय का पाहिलं... पण नाही. तिला कळत नव्हतं बाहेर काय झालंय... मम्मी ठीक असेल नं?... ती एका कोप-यात गुडघ्याशी पाय घेऊन बसून राहिली. असाच किती वेळ गेला, ते कळले नाही.

खिडकीतून बाहेर अंधार पडला ते प्रांजलने पाहिलं, वॉचमन पाण्याच्या टाकीचा नॉब उघडायला चालला असणार, आठ वाजले असतील, अंडी-पाव घेऊन येणा-याची सायकलची बेल ऐकायला आली. म्हणजे साडेसात-आठ नक्कीच... बाहेरच्या खोलीतून काहीच आवाज येत नव्हता. काय झालंय बाहेर? प्रांजल खूप अस्वस्थ झाली...

अगदी बारीक लॉकचा आवाज आला, आणि दार उघडलं गेलं... समोर मम्मी होती... चेहरा सुजला होता, डोळ्यांमधलं पाणी सुकलं होतं, कमरेतून वाकली होती, हात थरथरत होते... प्रांजल तिच्याकडे पहात राहिली, बाजारात गेली तेव्हा किती सुंदर दिसत होती!... “मम्मी”... तिने धाडकन तिला मिठी मारली. मम्मीच्या शरीराचा चिरपरिचित सुगंध तिच्या नाकात शिरला, तिला जरा बरे वाटले. तिने अगदी हलक्या आवाजात विचारले,”खूप मारलं का गं?” “नाही गं...” मम्मी हळूच पुटपुटली आणि तिने खाली पाहिलं... “खरं सांग मम्मी...प्लीज, टेल मी ट्रुथ!...” प्रांजलने मम्मीचा चेहरा अलगद वर केला. मम्मीने मान फिरवली, आणि म्हणाली, ”प्रांजू, कसं सांगू मी तुला? बट यु कॅन अंडरस्टँन्ड... ही रेप्ड मी... ट्वाईस... आय कान्ट टेल यू... हाऊ हॉरीबल इट वॉज !!... तो म्हणाला, रोज होईल असं, सही होत नाही तोपर्यंत!!... बोलव तुझ्या मुलीला, आणि दाखव... ऑर प्रुव्ह इट!!... खूप हॉरिबल आहे गं...” प्रांजलच्या अठरा-एकोणीस वयाला जे काही कळलं, ते खूप जीवघेणं होतं... फॉर सम बीच, माय फादर रेप्ड माय मदर!!... तिच्या पोटात आत आत तुटत गेलं... तिने मम्मीला पाठमोरं पाहिलं, ती कमरेत वाकली होती, पाय फरफटत जमिनीवरून कशीबशी चालत होती. पप्पा आले, आणि सरळ त्यांच्या बेडरुममध्ये निघून गेले. ते गेले पण त्यांच्या परफ्युमने प्रांजलचं डोकंच उठलं. तिने जरा वाकून पाहिलं, मम्मी, बाथरुममध्ये गेली होती... प्रांजलने काही मनाशी पक्कं ठरवलं.

प्रांजल किचनमध्ये गेली. तिने कमरेवर हात ठेवले, आणि ओट्यावर फटाफट स्वत:चं जोरात डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली, दोन-तीन-चार... डोकं सुन्न झालं. पण ती थांबली नाही, पाच.... सहा.. डोक्यातून रक्त यायला लागलं. ती थांबली नाही, आणि ती खाली कोसळली.पण ती शुद्धीवर होती... मम्मी बाथरुममधून बाहेर आली. प्रांजलच्या कपाळावरचा रक्ताचा ओघळ पाहून ती घाबरली, ओट्यावर रक्त लागलेलं होतं... “प्रांजल, उठ बाळा...” ती जोरात ओरडली ,”मी आत्ता तुला सोडत नाही....” तिने तिचा चेह-यावर पाणी शिंपडले, तिचं डोकं हाताखाली घेऊन, ती तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.

प्रांजलने तिच्या मम्मीचा चेहरा पहिला, ती खूप चिंतेत होती... “मम्मी कॉल पुलिस... पप्पा.. पप्पा..” ती इतकंच बोलत राहिली. मम्मीने एक शून्य एकवर फोन केला, “माझ्या नव-याने, माझ्या मुलीला मारायचा प्रयत्न केलाय.. लवकर या... मला खूप भीती वाटतेय... प्लीज प्लीज... “ असं म्हणून तिने पुढे पत्ता सांगितला. मम्मीने घराचे दार उघडलं, सक्सेना आंटी, कोमलताई आल्या. पप्पा जोरात ओरडून बोलत होते...”अरे!... मी काहीच नाही केलं... आय, नॉट इव्हन टच हर!... कोणी त्यांचे काहीच ऐकायला तयार नव्हते. .प्रांजलने डोळे बंदच ठेवले. पोलीस ताबडतोब आले.

तिला मम्मीने उठवायचा प्रयत्न केला. तिने हळूवार डोळे उघडले. पोलीस तिच्या समोर गुडघ्यावर बसले होते. तिने त्यांना हळू आवाजात सांगायला सुरुवात केली. “पप्पा आले, तेव्हा मम्मी बाथरूममध्ये होती, पप्पानी माझी मान पकडली, आणि रागाने माझे डोकं ओट्यावर धडाधडा आपटलं...” पोलिसांनी विचारलं “का, पण?” ती नीट सांगू लागली, “पप्पा मम्मीला दुपारीच मारून गेले होते, ते नेहमीच तिला मारतात, ही इज हॅविंग फिजिकल रिलेशन विथ हिज सेक्रेटरी... ते मममीला आणि मला हॅरॅस करतात, खूप मारतात. आम्ही कम्प्लेंटही केली आहे. आज त्यांना मला मारायचंच होतं...” तिला दम लागला. लेडी कॉनस्टेबल पुढे आल्या त्यानी हात देऊन तिला उठवलं... जबाब नोंदवला गेला. “अहो मी नाही... काही केलं नाही”... पप्पा ओरडून बोलत होते... पोलिसांनी त्यांच्या एक मुस्कटात लगावली.

“पोरीचा जीव घेतोस का? ए चला रे... याला आत घ्या...एफआयआर टाका...” प्रांजलला त्या वेदनेने गुंगी आली, तिने डोळे मिटले. रात्री डॉक्टर येऊन गेले, औषधे दिली. दोघी मायलेकींच्या कुशीत घर शांत निजले...

-उर्मी

(प्रिय वाचक, इतकी मोठी वाचकसंख्या असूनही प्रतिलिपी आम्हा लेखकांना काहीच मानधन देत नाही, आमचे लिखाण निर्मितीक्षमतेतून जन्म घेते. त्याचा कोणताही मोबदला प्रतिलिपीकडून आम्हाला मिळत नाही, हे योग्य नाही. माझ्या सर्व वाचकांना, माझी अशी प्रेमळ विनंती आहे की, आपल्याला ही कथा आवडली तर माझ्या अकाउंटमध्ये फक्त रुपये ५ /- आपल्याकडून जमा करावे . ज्यायोगे वाचकांनी लेखकांच्या निर्मितीला सन्मान दिलयाचा आनंद मिळेल.)

(A/c. Detail:Name: Shilpa Sawant, Bank: State Bank of India, A/c. No: 10559794173 Saving,IFSC code: SBIN0005354)

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.