निर्णय...

संध्याकाळची वेळ होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. रेडिओ वर गाणं लागल होत. मी खिडकी पाशी बसलो होतो. खिडकीवर पावसाचे थेंब येऊन आदळत होते. मी मजा म्हणुन ते थेंब आणि गाण्याचे बिट्स यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत होतो. पण प्रयत्न फसत होता. आईला बाहेर जायचे होते. पाऊस खुप असल्यामुळे ती थांबली होती. जरा पाऊस कमी झाला तशी ती बाहेर पडली पण जाऊन 2 मिनिटे झाली नसतील तोच पावसाने पुन्हा बरसायला सुरवात केली आणि तो काय थांबला नाही. मी गॅस जवळ गेलो कॉफी करायला...भांड ठेवलं..दुध गरम केलं..कपामध्ये कॉफी आणि साखर घातली आणि मग ते गरम झालेलं दुध कपामध्ये ओतलं. कॉफी चा सुगधं काही क्षण घरामध्ये दरवळत होता... मी टेबलपाशी आलो रेडिओ बंद केला..समोरच मला पेन आणि वही दिसली. मनात विचार केला की काहीतरी लिहू म्हणून पेन घेतलं वही उघडली आणि लिहायला सुरवात केली..आजची तारीख घातली..पेनाचा पॉइंट पेपर वर ठेवला..पण काही सुचत नव्हतं. सुरवात कुठून करावी हाच प्रश्न.
विचार करता करता मन खुप दुरवर गेलं. मन ताळ्यावर आलं मग समजल की काही सुचत नाही आहे. पेन बंद केलं आणि कॉफी संपवून मी खुर्चीत विसावलो. तोच दाराची बेल वाजली. आई अली असेल म्हणुन मी दार उघडलं पाऊस पडतच होता म्हणुन वाऱ्याबरोबर पाणी आत येत होतं. समोर एक light pink color ची छत्री घेऊन कोणीतरी उभं होत. पाठमोरी असल्यामुळे आधी कोण आहे ते कळालं नाही. पायच दिसत होते..पायात black legins होती..त्यावर तिने डार्क गुलाबी कलर चा one piece घातला होता..काहीसा ओळखीचा पोशाख होता म्हणुन मी हाक दिली...

"कोण आपण? कोण हवाय आपल्याला?"

असं म्हणताच ती मुलगी मागे वळली आणि तिला बघताच माझ्या हृदयाचे ठोके वाढले पावसाचा आवाज येईनासा झाला..अंग शहारून गेलं..घशाला कोरड पडली..'आत ये' अस बोलण्यासाठी पण शब्द बाहेर येत नव्हते... कारण ती 'रितिका' होती..ही तीच होति जीने मला लग्नाचं वचन दिल होत..आणि नकार सुद्धा दिला होता तो पण काही कारण न देता. मी विचारून थकलो..तीच्या घरी जाऊन थकलो..तिच्या घरा बाहेर मुर्खा सारखा बसायचो..ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती..मग फोन पण बंद केला तिने..नंबर चेंज केला..आणि आता 5 वर्षां नंतर ती माझ्या समोर येऊन उभी होती.....मग मी स्वतःला सावरलं आणि तिला आत येण्यास संगितले. औपचारिकता म्हणुन विचारले
"काय घेणार? चहा? कॉफी?"
तिने नकारार्थी मान हलवली आणि माझ्या कडे पाहु लागली. मी समोरच्या खुर्चीमध्ये बसलो. पुढची 15 मिनिटे फक्त बाहेर घरांवर,गाड्यांवर,खिडकीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज येत होता. काही वेळात पाऊस पण थांबला. घरात पुर्ण शांतता होती. कोण बोलणार होत हे दोघांनाही माहित नव्हतं. ती बोलायला सुरुवात करू पाहत होती पण तोंडुन काहीच बाहेर येत नव्हतं. मनामध्ये वादळ आलं होतं. मनामधून आलेले शब्द हे ओठांवर येऊन मागे परतत होते. शेवटी मग वातावरणातील तो awkwardness घालवण्यासाठी मीच बोलायला सुरुवात केली.
"कशी आहेस?"
ती थोडीशी दचकली..मग सावरली..डोळ्यात टचकन पाणी आलं तिच्या..तिने लपवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या नजरेतून ते सुटलं नाही..आणि ती उत्तरली...
"मी बरी आहे. तु कसा आहेस?"
"मी...! मी पण बरा आहे."
बोलुन झाल्यावर पुन्हा 2 मिनिटे शांतता..
"कुठे असतेस?" मी विचारलं
"मी मुंबई लाच असते.तिथेच रहातो आम्ही..घर नाही shift केलंय.."
"Ok. मग आज अचानक येण केलस. काही विशेष करण?" मी तसं मुद्दामंच विचारलं.
"हा तस विशेषच आहे." अस बोलुन तिने माझ्या डोळ्यात पहिलं..आणि पाहता पाहता पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने नजर चुकवली..मान खाली घातली..काही क्षण ती तशीच राहिली.
तेवढ्यात माझा फोन वाजला तशी ती दचकली तिने डोळे पुसले. फोन आईचा होता.
तिला यायला उशीर होणार होता.
वातावरण पुन्हा नीट व्हावं म्हणुन मी बोललो
"आईचा होता फोन. यायला उशीर होईल म्हणाली."
क्षणाचाही विलंब न करता चटकन ती पुटपुटली "बरं झालं उशीर होणार आहे ते."
"काही म्हणालीस का?" मी म्हणालो.
"नाही काही नाही." ती म्हणाली
"Ok"
"तु काय करतोस?"
"एका कंपनीत मॅनेजर आहे."
"Ok"
"आणि तु काय करतेस?"
"मी पण बँकेत कामला आहे."
"Good."
मी मधेच विचारलं
"काय काम होत. अशी अचानक आलीस ते."
"हा बोलुयात आपण. फक्त कामाचंच बोलणार आहेस का? General काही बोलणार नाही आहेस का?"
ती हे थोड्या रागात..थोड्या राडक्या स्वरात..माझ्याशी बोलण्याचा भुकेने बोलली. ते मी जाणलं.
मी एक smile दिल आणि म्हणालो.
"बोल..बोल"
"तु बोल ना!" माझं वाक्य पुर्ण होता होता ती म्हणाली
"सवय अजुन गेली नाही वाटत..." अस म्हणून मी हसलो.
"हो नाही गेली."
"बर." अस म्हणत मी खुर्चीतून उठलो..चालत जाऊन fan च बटण दाबलं..हवेत गारवा होता म्हणुन fan बंद केला..आणि तिच्याकडे पाठ करून तिला विचारले
"काय मग लग्न वैगरे केलस की नाही?"


माझ्या समोरच आरसा होता त्या आरश्यातून मला ती स्पष्टपणे दिसत होती. मी असे बोलल्यावर तिने माझ्याकडे पाहिलं..औंढा गिळली आणि म्हणाली
"नाही अजुन. तु केलं असशीलच."अस म्हणुन ती भिंतीवर इकडे तिकडे बघु लागली.
"आमच्या लग्नाचा फोटो शोधते आहेस का? नको शोधुस. नाही लावलाय अजुन." मी मुद्दाम बोललो
"का नाही लावला अजुन?"
"करण लग्ना आधी आमच्यात फोटो नाही लावत." अस म्हणुन मी हसलो.
"म्हणजे!" ती आश्चर्या च्या स्वरात म्हणाली.
"नाही केलाय मी अजुन लग्न."
"Ok"
"तु का नाही केलस लग्न? काही विशेष करण?"
"हा.."
"काय?"
"तु.." ती हळुच पुटपुटली.
ह्या वेळेस मी तीच पुतपुटणं दुर्लक्षित नाही केलं
"मी?"
"हो"
"पण मी कस काय तुझ्या लग्न न करण्याचा करण असु शकतो?"
ती उठुन उभी राहिली आणि म्हणाली
"अस का बोलतोयस? वचन दिल होत मी तुला."
"कसलं वचन?"
"अरे.."
"कसलं वचन सांग ना मला आठवत नाही."
"लग्नाचं...!"
"कोणाच्या लग्नाचं?"
"अरे...."अस बोलुन ती शांत झाली. 2 मिनिटे शांतता.
अचानक मला पाठीमागून तिने मिठी मारली आणि रडू लागली. आणि रडत रडत फक्त sorry म्हणत होती. डोळ्यातुन गंगा वाहत होती तिच्या. माझं शर्ट थोडा ओला झाला हे मला जाणवलं. मी एक smile देत तिचे दोन्ही हात मी बाजुला करू लागलो. तशी ती अजुन घट्ट पकडू लागली 'sorry' तर चालुच होत. त्याला भर म्हणुन 'नको ना अस करुस..'हे सुद्धां चालु होत.
मी हात सोडवले..तिला खुर्चीत बसवले..पाणी दिल. पाण्याचा ग्लास तिने संपूर्ण संपवला. डोळे पुसायला रुमाल दिला. ति माझं हात तसाच पकडुन त्यावर डोकं ठेऊन पुन्हा रडु लागली.
"अग शांत हो राडतेयस कशाला." मी म्हणालो.
त्यावर ती अजुन हुंदके देऊन रडायला लागली.
ऊठून मिठी मारली पुन्हा. अश्रू थांबत नव्हते..जणु सगळे पावसाचे ढग तीच्या डोळ्यात उतरले होते. पण माझे दोन्हीं हात पाठी मागे होते.. तिला जवळ घ्यावंसं वाटत नव्हतं..शेवटी मग एक हात तिच्या डोक्यावर ठेवला एक हात पाठीवर फिरवत मी तिला शांत करत बोललो
"ए अग शांत हो..कशाला रडतेयस."
तशी ती थोडी शांत झाली..तिला मी खुर्चीत बसवलं..तिचे डोळे पुसले.
काही वेळ तिला मी शांत होऊ दिल. मग विषय काढला
"अग वाजले बघ किती." 7:30 वाजले होते
"हा.."
"तस नाही उगाच तुला उशीर होईल जायला म्हणुन आठवण करुन दिली."
"हा होऊदेत उशीर. तु सोडशील ना?"
मी smile दिल "बरं बरं सोडेन मी."
"Thanks"

8:15 झाले तस मी तिला म्हटलं
"जेऊनच जा आता."
"हा.."
मी दोघांसाठी जेवण गरम केलं. दुपारच्या चपट्या होत्याच.. फक्त मी भात लावला..भाजी आणि आमटी गरम केली. आणि जेवायला बसलो. Dinning table वर समोर समोर बसलो होतो..ती नुसती बघत होती माझ्याकडे.
"काय बघतेयस? जेव.."
"हा..." अस बोलुन तिने ताट उचललं आणि माझ्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसली. मी काहीही न बोलता जेवत राहिलो.
अचानक तिने माझ्याकडुन एक प्रांजळ अपेक्षा केली "भरव ना रे तुझ्या हाताने मला..."
तिच्या डोळ्यात अन्नाची नाही तर प्रेमाची भूक दिसत होती. आसुसलेल्या नजरेने पाहत होती माझ्याकडे.
"मी..? मी भरवु?" मी खोट्या आश्चर्यने तिला विचारले.
मी स्वतःच्या भावनांना control मध्ये ठेऊन तिच्याशी बोलत होतो. ती खुप प्रयत्न करत होती जेणेकरुन माझ्या भावनांना घातलेला बांध फुटेल..मी रडेन..तिला जवळ घेईन..मिठीमध्ये रडेन..पण तस काहीच होत नव्हतं.
"हो तुच..please ना..for me...please"
मी हसुन बोललो "तुझ्यासाठी!"
"हो माझ्यासाठी..otherwise I'll not eat this food."
"बरं बरं.." अस म्हणुन मी एक घास भरवला तिला. डोळयातून पाणी आलं तिच्या.. मग मी काही न बोलता माझं जेवण सुरू केलं.
जेवण आटोपलं..मी सगळं आवरायला लागलो..ती सुद्धा मदत करत होती..मी नकार नाही दिल..8:50 झाले. तस मी तिला म्हटलं
"चल निघुयात."
"एवढ्या लवकर?" ती म्हणाली
"Its not too early..its too late..see your watch.. Its 8:51 now"
तिने घड्याळात पाहिलं आणि म्हणाली
"Mumbai आहे ही..12 नंतर पण चालू असते."
"हो..पण आता उशीर होईल तुला.. मी सोडतो चल आलो मी बाहेर." तीच काही न ऐकता मी तिला बाहेर जायला सांगितलं..मी gघर लॉक केल..गाडी काढली..highway पकडला आणि निघालो. मी ठाण्याला राहत होतो..सो जास्त वेळ लागणार नव्हता. गाडीत ती मला म्हणाली
"उद्या पुन्हा येईन मी."
"घरी नको भेटुयात बाहेरच भेटू कुठे तरी."मी म्हणालो
"Ok..चालेल. मग आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटुयात.."
"तुला आठवते का अजुन ती जागा?" मी टोमणा मारला.
"हो ती जागा कशी विसरेन..तिथेच तर propose केला होतास ना मला."
"बरं ठीक आहे. तू time सांग मला call करून मग time adjust करून भेटू आपण. आहे ना माझा number की delete केलास."
"आहेच..आणि mobile मधून जरी delete केलं तरी डोक्यातून नाही होत." ती पटकन म्हणाली.
मी हसलो "बर बर.."
तिला तिच्या घराच्या खाली सोडलं घरी यायला मला उशीर झाला..आई-बाबा वाट पाहत बसले होते. मित्र आला होता घरी त्यालाच सोडायला गेलो होतो अशी थाप मारली मी..'जेवण झालाय माझं मगाशीच' अस्स बोललो आणि झोपी गेलो.


रविवार असल्यामुळे मी उशिरा उठायचा प्लॅन केला होता पण आज तिने भेटायचं ठरवलं होतं म्हणुन मला आधीच रात्रभर झोप नव्हती..ती काय सांगणार होती ते मला माहित होतं..पण त्यावर मी काय react होणार याचा मी विचार करत होतो. सकाळी 6 ला उठलो. उठलो म्हणजे काय जागच अली स्वतःहुन.. झोप नव्हतीच. आईने पण आश्चर्याने विचारलं आज रविवार आहे तरी आज लवकर का उठलास 'रक्षित'. (तुम्हाला माझी ओळखच करून दिली नाही ना..Sorry...आईच्या तोंडुनच ओळख करून द्यायची होति..अस म्हटलात तरी चालेल)
"जरा बाहेर जायचं आहे म्हणुन उठलो."
"काय रे सुट्टीच्या दिवशी पण कसली रे काम तुझी."आईने काळजीने आणि वैतागून म्हटलं.
"हो ग..जरा महत्वाचं आहे काम म्हणुन जावं लागणार आहे. त्या व्यक्तीचा फोन आला की निघेन."
"बरं..जा काय ते. पण खाऊन जा."
"हो."
बरोब्बर 8 वाजता तिचा फोन आला. Number save नव्हता माझ्याकडे पण अजूनही आवाज मात्र डोक्यात save होता.
पहिल्याच Hello ला तीचा आवाज ओळखला.
"Hello."
"हा बोल रितिका."
"हा number save आहे तुझ्याकडे?" तिने आश्चर्याने विचारले.
"नाही पण आवाज save आहे अजुन."
ती अनुत्तरित झाली
"निघ तु. मी पण निघाले आहे आता. ये वेळेत उशीर नको करुस नेहमी सारखा."
"हा..bye."
मी गाडी काढली आणि निघालो.
ह्या वेळेस तीला उशीर झाला..जास्त नाही 10 मिनिटे.
"Sorry..Sorry" ती सॉरी बोलत..धावत..धापा टाकतच अली.
"अरे ट्रेन late झाली."
"Ok.. Ok. पाणी घे" मी bottle पुढे करत बोललो.
ती पाणी पियाली.
"तोंड लावुन पाणी प्यायची सवय गेली नाही अजुन." मी म्हणालो
"गेली.."
"मग?"
"मुद्दामच पियाले"
"Ok.."
"Sorry हा ते train late झाली म्हणून थोडा उशीर झाला. मीच बोलले तुला की वेळेत ये आणि स्वतःच उशिरा अली."
"Its ohk.. बोल मग.."
"हा..मुद्यालाच हात घालते. I love u... I really want you Rakshit."
"हा.."
"हा काय..मला तु हवा आहेस"
"माझं तुझ्यावर प्रेम आहे..मला तुझ्याझी लग्न करायचय..तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत..
अशी माझी सुद्धा मत होती..पण ती 5 वर्षांपुर्वी."
"अस का बोलतोयस.. मी आली आहे ना तुझ्यासाठी..खुप मिस केलय मी तुला..मला तु हवा आहेस माझ्या आयुश्यात परत."
"ते शक्य नाही..आणि तू माझ्यासाठी नाही..तु तुझ्यासाठी परत आली आहेस. तुला माझी गरज पुन्हा भासली म्हणुन तु माझ्याकडे आलीस..तुला एकट वाटू लागलं म्हणून आलीस"
"रक्षित नको ना अस बोलुस. मी तुला वचन दिल होत तुझ्याशिच लग्न करेन आणि त्याच साठी मी परत आली आहे."
बोलताना ती रडू लागली..तिचे अश्रू थांबत नव्हते..पण मी मात्र निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होतो..तिच्या अश्रूंचा माझ्या मनावर काडीमात्र देखील फरक पडत नव्हता.
"हो...मी सुद्धा दिल होत वचन तुला. पण 5 वर्षा पूर्वी माझ्या त्या दुःखाच्या नदीत मी ते विसर्जित केलं. त्या दुःखाच्या नदीत मी माझं मन धुवून स्वच्छ केलं..सगळ्या चांगल्या वाईट आठवणी धुवून टाकल्या..सर्व भावना सोडून दिल्या.." हे बोलताना माझे शब्द अजिबात अडखळत नव्हते..डोळ्यात अजिबात नाजूकपणा नव्हता..तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता माझा..एक तठस्ट भूमिका मी साकारली होति. मन खूप कठोर बनवलं होत मी ह्या 5 वर्षात..अगदी दगडा सारख..आणि त्या दगडाला पाझर फुटेल अस ह्या जन्मात तरी मला वाटत नव्हत...


सगळे येणारे जाणारे लोक आमच्या कडे पाहत होते. माझ्याकडे तर असे बघत होते की मी काहीतरी मोठा गुन्हा केला आहे. मी तिला शांत व्हायला बोललो..पाणी पुढे केलं..हुंदके देत ती पाणी पिऊ लागली..तिचे डोळे पुसत मी बोललो तिला
"बोल रितिका..रडू नकोस..जे सांगायला अली आहेस ते सांग."
"का अस वागतोयस रे तु? मान्य आहे मी चुकले पण माफी मागतेय ना मी..आणि अली आहे ना तुझ्याकडे परत."
"Sorry बोलुन माझ्या मनातल्या जखमा तू भरु शकणार आहेस का? Rather तू चुकलीसच नाहीस. चुकलो ते मी..तुझ्यावर प्रेम केलं..विश्वास ठेवला.. हीच माझी चूक."
"नाही..नको ना असं तोडून बोलुस.. please"
"तोडून नाही बोलत आहे मी..मी फक्त सत्य जे आहे ते बोलतोय.. बाकी काही नाही.."
"Sorry खरच sorry.. मला तू life मध्ये हवा आहेस पुन्हा.."
"सॉरी ते शक्य नाही. तुला हवं तेव्हा दूर केलस ते ही काही कारण न देता.. आणि तुला आता एकट वाटू लागलं म्हणून तू पुन्हा आलीस माझ्याकडे. पण त्यासाठी खूप उशीर झालाय रितिका..गेल्या 5 वर्षात खूप काही शिकवून गेलं आहे माझं आयुष्य मला. तु सोडून गेलीस त्या नंतर 2 वर्ष मी वाट पाहिली तू नाही आलीस. तेव्हा मी माझा मार्ग निवडला. पूर्णपणे विसरलो तुला. मी तुला प्रेम शिकवलं आणि तू मला द्वेष..पण माझं प्रेम कमी पडला असावं तेव्हा.."
"अस नको बोलुस..please.. "
"हेच सत्य आह. मी स्वीकारलाय ते. तू ही स्वीकार ह्यातच दोघाचं भलं आहे. तुझ्यासाठी आता मी नाही थांबू शकत आई बाबांनी एक मुलगी शोधली आहे..लग्न करतोय मी. कदाचित काही गोष्टी नसतील तिच्यात तुझ्या सारख्या पण हाताची पाचही बोट सारखी नसतातच ना..तसच आहे."
तिला रडू कोसळल..
"रडू नकोस रडून काही फायदा होणार नाही कारण आपल्या प्रेमच्या आठवणी मी एक कोपरयात बंद केल्या आहेत आणि दरवाज्याची चावी त्या दुःखाच्या नदीत फेकून दिली आहे. काळजी घे स्वतःची. या पुढे माझ्याशी contact नाही ठेवलास तर चांगल आहे."
ती फक्त तिच्या राडक्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात राहिली. माझ्यातला ते कठोर पण तिने कधीच पहिला नव्हता पण आता ती तो अनुभवत होती.
मी त्या bench वरून उठलो आणि चालायला लागलो..मागे वळून मी पाहिलं नाही..गाडीत जाऊन बसलो..2 मिनीटे मी शांत बसलो.. आणि माझ्या मनाचा बांध फुटला..मला रडू आलं..अश्रू थांबत नव्हते..गेली 5 वर्ष तिच्या आठवणी आणि ती गेल्याच जे दुःख माझ्या मनात मी ठेवलं होतं ते आज अचानक बाहेर आला होतं...

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.