अनाहूत भीति  

ए आदित्य दादा तू रोज रोज माझ्या पायाला अश्या गुदगुल्या का करतो रे????

१२ वर्षांची "संयुक्ता" तिचा सक्खा चुलत भाऊ असलेल्या "आदित्य" ला म्हणाली,,

आणि आदित्य जवळपास २५-२६ वर्षांचा असेल..तो संयुक्ताच्या वडिलांच्या मोठ्या भावाचा मुलगा....आता सक्खे चुलत बहीण भावंडं त्यांच्या खेळण्याकडे कुणी इतके लक्ष नाही द्यायचे....

सावरखेड्यातल्या धर्मराव निम्बाळकरांचे ते नात-नातू... आता धर्मराव निंबाळकर म्हणजे गावचे पोलीस पाटील....त्यांचा वाडा पण टोलेजंग...

त्यामुळे खेळण्यास भरपूर अशी जागा...तर असो ....

"आदित्य" हा जरी नात्याने संयुक्ताचा चुलत भाऊ असला तरी,ऐन तारुण्यात ज्या चुका घडायला नको असतात त्या चुका हा आदित्य करत होता...असमंजस पण म्हणा किंवा आणखी काही..पण तो चुकत होता..आणि जाणीवपूर्वक तो चुका करत होता...त्याला माहिती होते कि संयुक्ता आपली लहान बहीण आहे तरी सुद्धा....

धर्मराव निंबाळकरांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली एवढी संपत्ती आणि नाव कमावले होते...

तर "आदित्य" हा ऐन तारुण्यात होता..पण तो चांगल्या प्रवृत्तीचा नव्हता...तो आसुसलेला होता एका अनाहूत स्पर्शासाठी...आणि त्याने भक्ष्य बनविले होते "संयुक्ता"ला....

त्यांच्याकडे एक किराणा दुकान होते..आदित्य रोज थोडा वेळ त्या किराणा दुकानात बसायचा..म्हणजे दुकान बघायचा..शिक्षणाच्या नावाने बोंब असल्यामुळे तो कधीकधी शेती आणि दुकानाकडे लक्ष द्यायचा.. ,,,त्याच्या वडिलांनी तशी तंबीच दिली होती त्याला...

मग ह्याच गोष्टीचा तो वापर करायला लागला...संयुक्ताचे लचके तोडण्यासाठी...

तो रोज संयुक्ताला चॉकलेट च्या बहाण्याने दुकानात बोलवायचा आणि त्याचे इच्छित काम तो उरकून टाकायचा..

आधी संयुक्ताला कळायचे नाही तो काय करतोय ते...किंबहुना तिला तो स्पर्श हा एका भावासारखा वाटायचा..पण जशी संयुक्ता मोठी होत गेली तसा तसा तो स्पर्श तिला एक अनाहूत भीतीदायकआणि त्रासदायक वाटायला लागला ....आदित्य तिला रोज तसा स्पर्श करायचा...एकदा तिने त्याला विचारले सुद्धा कि तो असे का करतो?? पण तो म्हणायचं अग वेडे मी तुझा लाड करतो कि...मी तुझा मोठा भाऊ ना...मग दादा जसे सांगतो तसे करायचे...समजलं..संयुक्ताने मान डोलावली.

आदित्य हा खूप विचित्र आणि घाणेरड्या स्वभावाचा मुलगा होता...आपल्या बहिणीला सुद्धा त्याने त्याच्या कचाट्यातून सोडले नव्हते...

असेच काही दिवस गेले..गावात ७ वि पर्यंतच शाळा असल्यामुळे संयुक्ताला तिच्या वडिलांनी तिला तालुक्याला शाळेत घातले आणि संयुक्ता तालुक्याच्या ठिकाणी राहायला निघून गेली तिच्या आईसोबत...(आणि संयुक्ताची सुटका झाली या सगळ्यातून)

आता मात्र आदित्यला काही करमेना...मग त्याने गावातील इतर मुलींना आपले भक्ष्य बनवायला सुरुवात केली...

काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी एक छानशी मुलगी बघून आदित्यचे लग्न लावून दिले..

..पण म्हणतात ना "कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे"..ह्या उक्तीप्रमाणे आदित्य मध्ये काही बदल घडला नाही...

घरात एवढी सुंदर बायको असताना सुद्धा हा दुसऱ्या कोवळ्या मुलीना भक्ष्य बनवायचा..

कालांतराने संयुक्ताला सुद्धा कळले कि आदित्य हा तिच्या सोबत काय करायचा ते...पण आता सांगून आणि समजून काही उपयोग नव्हता,कारण एक तर त्याचे लग्न झाले होते आणि दुसरे म्हणजे घरच्यांना सांगितले तर कुणी विश्वास ठेवणार नाही आणि परत तिच्याही लग्नाचा बट्याबोळ झाला असता...आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन वाहिनी तर खूप दुखावून गेल्या असत्या...

म्हणून संयुक्ताने चूप राहणेच पसंद केले..आणि आदित्यशी बोलणे टाळले..

मग" संयुक्ता" खूप विचार करत बसायची कि आदित्य दादाने एवढा मोठा धोका केला आपल्याशी आणि आता वाहिनीसोबत पण तो तसाच करत होता...संयुक्ताला वाटले कि काही दिवस गेल्यावर "आदित्य" दादा सुधारेल पण त्याच्यात काही बदल झाला नाही ..आणि एक दिवस वाहिनीला सुद्धा कळले कि तो दुसऱ्या मुलींसोबत वाह्यात चाळे करतो...खरं तर त्या मुली सुद्धा लहानच... समज नसलेल्या..आणि अश्या लहान मुली असल्या घाणेरड्या लोकांच्या बळी पडतात,याचा विचार करूनच संयुक्ता थक्क व्हायची, कारण कोणता स्पर्श कसा आहे,हे जाणायला त्या लहान मुली तेवढ्या समजदार झालेल्या नसतात.....

(आदित्यने निंबाळकरांच्या घराण्याला पुरते नामुष्कीचा आणले होते)

संयुक्ताच्या वहिनींना जेंव्हा कळले कि आदित्य दादा चांगल्या विचारांचा नाही तेंव्हा त्या खूप हतबल झाल्या...पण सांगणार कुणाला..एक दिवस अतित्रास झाल्यामुळे त्या घर सोडून निघून गेल्या...

तरीसुद्धा आदित्यच्या वागण्यात काहीएक फरक पडलेला नव्हता...मुळात त्याला व्यसन कुठलेच नव्हते...पण हे व्यसन त्या सर्वां पेक्षा भारी होते,,,

मग एकदा संयुक्तानेच वाहिनीला समजावून पुन्हा घरी आणले..तिला वाटले कदाचित आत तरी तो सुधारेल.....पण????? तो आदित्य होता...

असेच काही दिवस गेले..आदित्यच्या बायकोने छान गोंडस अश्या मुलीला जन्म दिला....सगळे खूप खुश झाले...बर्फी पेढे गावभर वाटल्या गेले...संयुक्ताही खूप खुश झाली ...कारण ती तर आत्या बनली होती बाळाची...पण पुढच्याच क्षणी तिला एक "अनाहूत भीति" जाणवली... ती म्हणजे....

आदित्यला मुलगी झाली होती....आणि त्याने जर तिलाही आपले भक्ष्य बनवले तर...........???????

( एका सत्यकथेवर आधारित)

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.