सांजवात

                          सांजवात
पश्चिमेला सुर्याची लालबुंद लाली पसरली,जणु तांबड्या- लाल रंगाची गोधडीच आसमंताने न्याली होती.
प्राजक्ताच्या फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला होता.नारळाची शहाळी त्या माडाला गुदगुल्या करत होती.
ऊन सावलीचा खेळ अजुनच रंगात आला होता हळुच दरवाजा आडुन त्या कानोसा घेत होत्या .ओसरीतला झोका त्याच्याच नादात झुलत होता.परसातला जास्वंदही खदखदून खिदळत होता.सुवासिक अगरबत्त्यांचा घमघमाट सगळ्या वाड्यात पसरला होता मंद धुंद सुगंध अगदी ह्रदयातल्या स्पंदनाला स्पर्श करीत होता.
           वाड्यातील देवघरात आजी सांजवात करण्यात मग्न होती .पण दिवा काही तेवना वार्याची झुळुक वाकुल्या दाखवत यायची अन त्या दिव्याला छेडायची आजी पुन्हा वात तेवायची  असं बर्‍याच वेळ सुरू होतं . दिव्याच्या ज्योतीकडे पाहत आजी नकळत भूतकाळात शिरली .
                 तेरा वर्षांची असतांना आजी देशमुखांच्या घरात  सुन होउन आली आणी  तेव्हापासुन आजपर्यंत ती ही तेवतच होती त्या ज्योतीप्रमाणे..आयुष्याच्या पाऊलवाटेवर अनेक ऊन पावसाळे  सोसत आनंदाने जीवनप्रवास सुरू होता..तो दिवस तर अविस्मरणीय देशमुखांच्या घराचा कुलदीपक जन्माला आला होता.किती ते कौतुक ,किती ते सोहळे!!स्त्री जन्माचं सार्थकच झाले होते.सगळीकडे आनंदी आनंद होता चिमुकला बाळकृष्ण घरभर रांगत होता..पण ऐकाऐकी आयुष्यातला सहप्रवासी गेला हे जातांना फक्त ईतकेच बोलले,आपला प्रवास फक्त इतकाच होता.जप स्वतःला अन आपल्या माधवालाही.......अन तो स्थितप्रज्ञ दिपक विझला.....
               परंतु  टिमटिमती चांदणी  ही प्रकाशाची द्योतकच असते म्हणून उठले दुःख सावरून खंबीर झाले,आता पुढचा प्रवास फक्त माधवासाठीच होता.माधवचं शिक्षण पुर्ण होऊन तो ईंजीनीअर झाला . नोकरीही मिळाली.
देशमुखांच्या घराण्यातील पहिला इंजिनिअर होता माझा माधव.दृष्ट लागेल असं सगळ छान सुरू होतं अन एक दिवस लेटर आलं माधवाची बदली अमेरिकेत झाली .सुवर्णयोग म्हणजे हाच बहुतेक.
पोराची स्वप्न पूर्ण होणार म्हणुन त्याला अमेरिकेत जाण्यासाठी होकार दिला.त्याच्या आवडीच्या खरवसीच्या वड्या करतांना डोळे कधी पाण्याने डबडबले तेही कळलं नाही..
त्याची फ्लाईट होती संध्याकाळी,मला एरव्ही संध्याकाळ फार आवडते पण त्या दिवशी संध्याकाळ होऊच नये असं माझ्यातल्या आईमनाला वाटत होतं.पण का कुणास ठाऊक त्या दिवशी वेळ ही जोरात पळत होती.
माधवला निरोप देण्याचा क्षण आला लेकरू उदास होऊ नये म्हणून डोळ्यातलं पाणी  आतच झिरपवलं होतं मी...
ओ कमाॅन म्म्मा...जस्ट चिल असं माधव म्हणाला अन् क्षणातच मायदेशावर आक्रमण झाले की काय असे वाटुन गेले.
तेवढ्यात अनांऊसमेंट झाली न माधव ची फ्लाईट  जातांना दिसली..उत्तुंग आभाळाकडे टक लावून पाहीले न दाटलेल्या हुंदक्याला वाट मोकळी करून दिली.........
       घरी आल्यावर घर नुसतंच भक्कास भासत होतं. दिवेलागण झाली न माधवचा भास व्हायचा ,ए
आई भुक लागली जेवायला वाढ”......
    बघता बघता दोन महीने झाली .आता हळुहळु सवय  झाली एकटेपणाची .ऐकटेपणाशीच आता नातं अधिक गहिरं होत होतं...दर  रविवारीच माधवचा फोन यायचा “आई तुझ्या अकाऊंटवर पैसै टाकले काढून घे”
हे सांगण्यासाठी..लेकरू कामात असतं नसेल वेळ मिळत बोलायला,अशी मीच माझ्या मनाची समजूत घालुन माझी वेळ मारून न्यायची...असेच दिवसामागुन दिवस   जात होते आता तर ते काय मॅसेज म्हणता ना तेच यायचं ते
पण फक्त पैसे पाठविल्याचा...पण खरं  सांगू तो मॅसेज पण मी पुन्हा पुन्हा वाचायचे.आणी डोळे भरुन यायचे.....
        दिवस यायचा अन मावळायचा,सांजवात करण्यासाठीही माझे हात आता थरथर करीत .निस्तेज निस्तबध डोळ्यात फक्त प्राण शिल्लक होता माधवाला पाहण्यासाठीच......
   पण माधवा काही आला नाही किंवा फोनही नाही...!
दिवाळी आली होती ,आकाशात लक्ष दिप ऊजळले होते रांगोळ्यांनी अंगणे सजली होती,सुगंधी उटण्याचा
घमघमाट दाही दिशांनी ऊधळत होता...
   आणि अचानक आज  एक वर्षानंतर घराचे दार वाजले होते,माधवा???????????
          होय माझा माधवाच आला होता,मला शोधत पण कदाचित मी त्याला दिसली नसावी,माधवा बघ रे बाळा जरा इकडे,ही बघ देवाला सांजवात करत होते.....
माधवाने आवाज दिला हे माॅम लुक अॅट ,सरप्राईझड,,,,,,,,,
माधवाने जवळ येऊन पाहीले ,तिथे होता सांगाडा...
           मुलाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या ऐका सांजवातीचा ....................!!!!!!!
                     नाव-श्रध्दा  शिवाजी काळे.
                              वेरुळ.जिल्हा-औरंगाबाद.

         
    

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.