नागमणी २...


 

..आता ती खुनाची केस private detective जय कडे आली होती..जय ऐन २५शीतला उंच पुरा देखणा रुबाबदार...लांब पण personality ला साजेशे कुरळे केस..डोळ्यावर लहान काड्याचा चष्मा...चष्म्याच्या आत सतेज डोळे...आपल्या office मध्ये त्या खुनाची फाईल चाळत बसला होता..जयचे office म्हणजेच एक पुरातन खोली सगळीकडे सामान आस्ताव्यस्त पडलेले...ते पेपर चे गठ्ठे,खुप सारी रहस्यमय पुस्तके..एक लाकडी टेबल...समोर लाकडी खूर्ची...त्या खुर्चीवर बसून jacket आणि jeans घातलेल्या जयनी लाईटरने सिगारेट पेटवली व ती फाईल चाळत होता..त्याने एकदा घड्याळ पाहील रात्री चे सात वाजत आले होते..बाहेर थंड हवा चालत होती म्हणूनच कदाचित जयने jacket घातला असावा...सिगारेट चा एक झुरका घेत जयने त्या फाईलच पहीला पान उघडले...detective जय ची एक खास गोष्ट म्हणजे तो जे काही वाचतो तेच हूबहूब imagine करतो..हिच एका detective ची ओळख असते...सिगारेट चा धूर त्याच्या खोलीत वलय निर्माण करुण बाहेरच्या हवेत विलूप्त होत होता....
पान क्रमांक १-जयच्या नजरेतून...
श्रीरंगपूर तालूक्यातील एक गाव नवापूर...अगदी नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला...गावाच्या चारही बाजूला हिरवी गार डोंगर त्या डोंगराच्या मधोमध वाहणारी नदी..एखाद्या धबधब्यालाही लाजवेल अशी...त्या नदीमुळेच कदाचित त्या गावाने हिरवा शालू पांघरला असावा...नदीच्या किनारी एक हेमाडपंती महादेवाच मंदिर..त्या मंदीरावर काढलेली ओबडधोबड नागदेवतेची चित्र..मंदिरावर चढलेला तो वेल मंदिर दुर्लक्षीत झाल्याचा पूराव देत होता....मंदीराला लागूनच एक भल मोठ्ठ वडाच झाड..जणू आकाशाला गवसणी घालण्यात मग्न असाव..झाडाखाली एक दगडाचा नंदी...नवापूर गावाच्या लोकांचा समज होता की दर १० वर्षांनी त्या मंदीरातून एक नाग व नागीन त्या नंदीसमोर प्रकट होतात...व रासलीला व एकमेकांना विळखा घालून प्रणय करतात...संभोगाच्या वेळी तो नाग आपल्या डोक्यावरील नागमणी बाहेर काढून ठेवायचा..हिरा पण फिका पडावा एवढा चमकदार नागमणी..जेव्हा नाग व नागीन तृप्त होतात तेव्हा तो नागमणी घेऊन गायब होतात..आपण प्रकटल्याची एक पुरावा म्हणजे ते दोघ आपल्या अंगावरील कात त्या नंदीवर सोडतात..व त्याच कातीची पूजा करुण नवापूर ला जत्रा भरायची दर दहा वर्षांनी..पण गेल्या २ वेळची नवापूरची जत्रा भरलीच नव्हती..गावकरी परेशान होऊन भितीने एका मांत्रीकाकडे पण गेले होते...मांत्रीकाने गावक-याना सांगितलं होता..की आता नागदेवता कधीच येणार नाही...नागदेवतेचा नागमणी कोणीतरी चोरलाय..तो परत मिळवा व मंदिरात स्थापना करा अन्यथा गावावर महादेवाचा कोप होईल..वगैरे वगैरे....
"interesting "अस स्वताशीच detective जय पुटपुटला व हातातील सिगारेट संपवत तो जमेल त्या पद्धतीने फाईल च imagination करत होता...बोटाला थूंकी लाऊन त्यांनी त्या फाईलच पान पलटला...
पान क्रमांक २----जयच्या नजरेतून..
नवापूरची ती प्रसन्न सकाळ...सुर्यानी आपली कोवळी किरणे गावावर टाकली होती..नदीवरील पक्षांच्या किलकिलाटन व नदीच्या पाण्यानी एकच सुर धरला होतास.सुर्याच्या कोमल प्रकाशाने महादेवाच मंदिर पण चमकत होता..गावातल्या काही बायका पानवट्याच्या दिशेने जात होत्या..गावातील प्रत्येक घराची एक विशिष्ट रचना होती..सगळे घरे शेनामातीची..काही पत्राची तर काही कौलारु टूमदार..गावात ४थी पर्यंत ची शाळा लहान सहान मुले शाळेची घंटी वाजण्याच्या प्रतीक्षेत तयार होऊन बसली होती..काही लोकांचा गराडा दौलत पाटलाच्या वाड्याच्या दिशेनं निघाली होती..पाटील नावाप्रमाणे गर्भ श्रीमंत होता त्याचा वाडा गावाच्या मधोमध होता...ह्या सर्वांच्या गडबडीत शिवा गारुड्याची रुपमती अंघोळ करीत होती..शिवा गारुडी हा गावात सापांचे खेळ करायचा..त्याला मरुण आज बरोबर एक वर्षे झाला होता...त्याच श्राद्ध होता आज..शिवाची पत्नी रुपमतीच्या जन्मावेळीच वारली होती..आपल्या म्हाताऱ्या मायला व तरण्याबांड पोरीला मागे टाकून शिवा परलोकात आपल्या पत्नीकडे गेला होता..रुपमती नावाप्रमाणेच रुपवान ऐन तारुण्य ठासून भरलेली २०वर्षाची अनाथ पोर..देखणी,आरसणी,लावण्यखणी,डोक्यावरील काळेभोर मोकळे केस नितंबापर्यंत खेळायचे..एखादी मुक्त नागीन रानात खेळावी..छे!!छे..नागीनीलाही तिच्या केसांचा हेवा वाटावा..तिचा तो गोल चेहरा..गोरपान अंग..सतेज कांती..अंगोळ करतानाचे टाकलेले पाणी पण क्षणभर तिच्या अंगावर मूद्दाम रेंगाळायचे..आत्ताच्या भाषेत सांगायचं तर..सर्व नट्या तीच्यापुढे फिक्या पडाव्यात..३६-२४-३६ ची शरीर रचना..अगदी अप्सरा की मस्तानी..गावातील तरुण काय म्हातारे पण फिदा पण ही संस्कारी आणि स्वज्वळ पोरं आपल्या आजीचा व आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावातल्या कोळसा खाणीत काम  करायची...रुपमती अंघोळ व वेणी फणी आटपून आजीला म्हणाली..
"आजी म्या जरा खाणीतल्या साहेबांना आजच आवतान (आमंत्रण )देऊन आलेच"
"लवकर ये ग पोरी आत्ता गावातील ४ लोक घरी जेवायला येतील" म्हातारी स्वयंपाक करत करत आतून ओरडली..
रुपमती घराबाहेर पडली चप्पल घालून निघाली तिच दर्शन घेण्यासाठी साठी गावातील काही जण पारावर टपूनच बसली होती..ह्याची रुपमतीला सवय झाली होती..आपल्या देशाला तो रोगच झालाय वडील व भाऊ नसलेल्या तरुणीला वाईट नजरेने बघायची असो,
रुपमती त्या पोरांना भाव न देता वारा वेगाने नागमोडी चालत खाणीच्या दिशेने निघाली..तिच्या शरीराचा मंद सुगंध वारा ही अनुभवत होता..
detective जय च्या हातातील सिगारेट संपली होती..त्याने आपले दोन्ही पाय बुटासहीत  टेबलावर ठेवले..आणि रुपमती च्या सौंदर्य बाबतीत कुठे तरी ऐकलेल एक वाक्य त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडला
"जो करे पराजीत कांती कोटी रती काम की..."
पान पलटला..
पान क्रमांक ३---
गावापासून १ किलोमीटर वर एक सरकारी कोळसा खाण होती..त्या खाणीत बरेचसे गावातील लोक काम करायचे..शिवा गारुडी पण तेथे काही दिवस काम करायचा..आणि आता रुपमती तिथे लोकांची हजेरी घेण्याच काम पाहायची..ती खाणीजवळ पोहचली व चपराशी रामूला विचारल
"साहेब आहेत का"
चपराशीने तंबाखू चोळत चोळत होकारार्थी मान हलवली..
संजय परांजपे हा त्या खाणीचा व्यवस्थापक..देखणा..रुबाबदार,राजबिंडा,गोरागोमटा लहान पण मागे ओढलेले केस..personality ला शोभेल असा dressing sense कोणतीही तरुणी पाहून त्याच्यावर भाळावी असा २५शीतला युवक..रुपमती पण त्याला अपवाद नव्हती..तिला पण तो आवडायचा..पण कधी तिने व्यक्त केला नाही स्वताला त्याच्यापूढे..रुपमती त्याच्या office कडे गेली..सरळ आत गेली..आपल्या wheel chair वर संजय समोर बसलेल्या राज वर जोरजोरात ओरडत होता..
राज त्या खाणीत विक्री चा व्यवहार पाहायचा..बुटका व नाक बसक काळा सावळा जवळजवळ संजयच्या वयाचा..
संजय ,राज दोघेही तालूक्याला रहाणारे खाणीत बदली झालेली सरकारी माणसं होती..
"....जर काम जमेत नसेल तर माणसांनी ते करु नये...उगीच government च्या पैश्याला जड होऊन जगण्यात काही मजा नाही..."तावातावात हातातील कसली तरी फाईल आपटत संजय बोलत होता...
"संजय बाबू...सरकारी कामात ऊणे दुणे चालणारच.."राज ती फाईल व्यवस्थित तयार ठेवत व खूनस देतच म्हणाला...
अचानक संजय ची नजर रुपमती वर पडली...
रुपमती ने दोघांना पण जेवणाच आमंत्रण देऊन घराकडे निघाली..दोघातला तणाव कदाचित तिच्यामुळे कमी झाला...रुपमती चा शरीरगंध काही काळ संजय भोवतीच घूटमळत होता...
पान क्रमांक ४---
रात्रीचे ८ वाजत आले होते खाणीतल काम आटपून गावकरी घराच्या दिशेने निघाले होते..संजय,राज,चपराशी रामूला घेऊन रुपमती च्या दिशेने निघाले होते..इकडे गावकरी जेऊन गेले होते..रुपमती व म्हातारी संजय ची वाट पाहात बसले होते..बराच वेळ होऊन गेला ते आजून आलेच नव्हते..
"पोरी मला नाय वाटत तुझा मास्तर येईल..अग ती मोठी माणसं त्यांना हे जेवण सोडून बक्कळ कामे राहत्यात..चल पूजा मांडू.."
काही वेळाने साधारण ९ वाजता संजय ची कार त्या दोघांना घेऊन गावाच्या जवळ पोहचली..संजय कार चालवत होता..रामू बाजूच्या सीट वर बसून रस्ता दाखवत होता..राज मागच्या सीटवर रेलून बसला होता..
मागील office मधील राग संजयने राजच्या चेहऱ्यावरुन आरशातून टिपला आणि उगीच कायतरी बोलायचं म्हणून बोलला..
"राजराव तुमचा education कशात झाल"
"मानसशास्त्र,पुढे शासनाच्या उत्खनन विभागात जागा निघाल्या,आईच्या म्हणण्यावरुण exam दिली आणि भरती झालो..लोकांच्या शिव्या खाण्यासाठी"..लोकांच्या शिव्या या शब्दावर जरा जास्तच जोर देत..व कारच्या मागच्या सीट व पाय रेलून ठेवत एकाच वाक्यात पूर्ण उत्तर दिल...
"तुमचे वडील काय करतात.."
अजून एक प्रश्न स्टरींग फिरवत व ४था gear टाकत संजय नी विचारला..
"diamond business in africa "मोठ्या फुशारकीने राज नी सांगीतल शेवटी मानसशास्त्र...
detective जय ला आत्ता थंडी वाजत असावी फाईल हातातच ठेऊन तो खिडकी बंद करत होता पण नजर फाईलवरच अगदी गरुड नजर...
पान क्रमांक ५----
धूरळा उडवीत ती गाडी रुपमती च्या घरासमोर येऊन थांबली..घर तरी कसला..छप्पर..शेनामातीने सारवलेल्या भिंती..त्या आक्राळ विक्राळ नागनक्षी काढण्याचा केविलवाणा प्रयत्न..दरवाज्याला बोराटी झापड..पण प्रशस्त अंगान..संध्याकाळचे १०वाजले..अंगनाला आकाश्यातील चंद्रानी शितलता बाहल केली होती..तिघेही गाडीच्या खाली उतरले..दरवाज्यातून आत पाहील..घरात लाईट नव्हती पण म्हातारीने पूजा करताना हातात धरलेला तो खडा घरभर लख्ख प्रकाश देत होता..अंधाराच्या अधिष्ठानाला भेदून एक चमत्कारिक प्रकाश वलय त्यातून बाहेर फेकत होता...तिघेही अगदी थक्क होऊन त्याकडे पहात होते..अद्भुत..असंभव...चमत्कारिक...हिरा तर नसवा..छे..हिरा असता तर ह्याची परिस्थिती अशी नसतीच..
"interesting "अस म्हणत detective जय पान बदलत होता..
पान क्रमांक ६---
म्हातारीशी गाव गप्पा उरकून तिघांनीही जेवण पूर्ण केला..म्हातारी भांडी धूवायला अंगणात गेली..राज आणि रामू बिडी काडी घेण्यासाठी गावातील पाराकडे दुकानावर निघाले..रुपमती घरात कपडे बदलत होती..संजय bathroom शोधत होता..तेवढयात त्याची नजर घरात कपडे बदलत असलेल्या रुपमती वर पडली व तिची उघडी पाठ पाहून त्याच्या ह्दय संदनात वाढ झाली काही कळायच्या आत त्याची पाऊले त्या सौंदर्यवती च्या दिशेने चालू लागली आणि अगदी तिच्या पाठीमागे उभे राहून तो नयन सुख घेत होता..रुपमती ला चाहूल लागली आणि वारा वेगाने ती पलटली पण पदर निसटला आणि तिचे उर संजय च्या पुढे सताड उघडे पडले..काही कळायच्या आत त्याने तिला आपल्या बाहूपाशात ओढले..रूपमतीला संजय पहील्या पासून आवडायचा पण कधी व्यक्त होण्याची संधी नाही मिळाली हि संधी तिला घालवायची नव्हती तिने पण त्याला घट्ट मिठ्ठी मारली..व संजय नी आपले ओठ कपाळापासून घरंगळत तिच्या ओठावर टेकवले अविरत चूंबनाचा वर्षाव झाला..बाहेरची थंडी वाढलेली असताना हे मात्र एकमेकांना ऊब देऊ पाहात होते..जय चा हात तिच्या उरोजा पर्यंत खाली टेकला होता..तेवढयात त्यांना बाहेर राज आल्याची चाहूल लागली व त्यानी एकमेकांना सावरल..
detective जय जमेल तस शब्द न शब्द imagine करत होता...
आणि घाईघाईने पान पलटत होता..
पान क्रमांक ७---
रूपमती संजय प्रेम 
पान क्रमांक ८--
खाणीतला रोजचा व्यवहार व काम
पान क्रमांक ९--
संजय च रुपमतीच्या सतत घरी जाणे..म्हातारी ला पण संजय आवडला कारण संजय सारखा नात जावाई शोधून सापडणारा नव्हता
पान क्रमांक १०--गावाकरी लोकांचा ह्या गोष्टीला विरोध व प्रेमाला खूनस..
सगळी पान जय झपाझप चाळत व imagine करत होता त्यानी एकदा वेळ पाहीला रात्रीचे २ वाजत आले होते व घड्याळीची टिकटिक जय ला अनाहूत पार्श्वसंगीत देत होती..
पान क्रमांक ११--जय च्या नजरेतून
आज संजय चा २६ वा वाढदिवस राजच्या घरी अंधाऱ्या खोलीत तब्बल ३ तास दारु पिऊन..गप्पा करुन..वैगरे वैगरे..व राज नी दिलेला मोबाईल गिफ्ट घेऊन प्रियशी रुपमती च्या घरी जेवण व वाढदिवस साजरा करायला निघाला..रुपमती च  घराच १२ किलोमिटर च अंतर कापत तो तिच्या घरी पोहचला..राजनी gift दिलेल्या मोबाईल वर head phones कानात टाकून..व आपला मोबाईल car मध्ये charging ला लाऊन गाणे ऐकत त्या तंद्रीत किंवा दारु च्या नशेत रुपमती च्या घरी पोहचला..म्हातारी त्या चमत्कारिक खड्यासमोर पूजा मांडून माळ जपण्यात मग्न होती..रुपमती संजयसाठी रुम सजवत होती व मेणबत्ती पेटवून बसली होती..पण त्या मेणबत्ती पेक्षा त्या चमत्कारिक खड्याचा प्रकाश लख्ख व चमत्कारिक..हिरा पण जीव असता तर मान झूकवेल असा..संजय रुपमती जवळ पोहचतो न पोहचतो तोच राजनी gift दिलेल्या मोबाईल वर एक call आला..
त्यावेळच प्रसिद्ध गाण जे भरपूर लोकांनी आपली ringtones ठेवली होती ते गाणं वाजल headphones अजून कानात होते..
"संमदर तू हो किनारा मी होईल सजनी.."
अशी ती ringtone
संजय नी call receive केला..रुपमती ने संजयला पाहील व धावत जाऊन मिठी मारली व आनंदाने म्हणाली 
"happy birthday "
तिने संजय च्या डोळ्यांत पाहील व ती दचकलीच कारण त्याचे डोळे आग ओकत होते जणू..सूर्या प्रमाणे..चेहऱ्यावरील हावभाव बद्दलले होते..अगदी रागीट दिसत होता तिचा तो मास्तर...
ती काही विचारण्याच्या आत संजयनी तिला अशी दूर ढकलली की ती खाटावर जोरात आदळली व डोक्याला जब्बर धक्का लागून बेशूद्ध झाली...संजयनी आपला मोर्चा म्हातारी कडे वळवला..व घरातली विळी ऊचलली..व माळ जपण्यात मग्न असलेल्या म्हातारी च्या गळ्यावर अशी फिरवली व एका झटक्यात तिचा गळा चिरला व म्हातारी क्षणात होत्याची नव्हती...रक्ताच्या थारोळ्यात..
संजयनी तो समोर पडलेला चमत्कारिक खडा उचलून खिशात घातला..
घराच्या बाहेर ऊभी असलेली एक बूटकी काळी आकृती ह्या हलचाली टिपत होती संजय नी ते पाहीला व विळा उचलून आपला मोर्चा त्या बूटक्या काळ्या आकृती कडे वळवला..
"thriller "असा एकच शब्द बोलून detective जय नी अजून एक सिगारेट पेटवली...व भरभर पान पलटत होता..
पान क्रमांक १२--
म्हातारीचा खुन करुण संजय हत्यारानीशी अंगणातच बसलेला..
पान क्रमांक १३---
PSI माने कडून त्याला अटक
पान क्रमांक १४---
गावकरी लोकांन कडून म्हातारीचा विधी व रुपमतीला hospital मध्ये दाखल
पान क्रमांक १५---
मांत्रीकाचा तो शाप खरा होतोय अशी गावात भिती..
पान क्रमांक १६---
पूरावे आणि गावकरी बयाना वरुन संजय ला उम्रकैद खुनाचा आरोप..

PSI माने नी ही फाईल काळजीपूर्वक व एक एक गोष्ट स्पष्ट नमूद करुन..गावकरी,संजय,राज..ह्यांचा बयानावरुन..रुपमती बयान द्यायच्या काय बोलण्याच्या पण अवस्थेत नसावी कारण त्या फाईल मध्ये detective जय ला रुपमती चा statement कुठेच दिसला नव्हता..अजून एक सिगारेट पेटवत जय विचार करत आणि रहस्य सोडवत बसला होता त्याच्या मनाला संजय दोषी असावा अस वाटतच नव्हता किंवा मानायला तयार नव्हतं...ह्या फाईल मधील एक एक गोष्ट अगदी flash back प्रमाणे त्याच्या डोक्यात फिरत होती...
संजय खुनी असता तर तो खुन करुन फरार झाला असता..तो सकाळपर्यंत तिथे राहीलाच नसता..किंवा त्यांनी हत्यार लपवल असत...जर नागमणी साठी खुन करायचा असता तर तसाही तो रुपमती सोबत लग्न करुन मिळवता आला असता..संजय कडे खुनासाठी solid motive नव्हताच..असे अनेक विचार detective जय करत होता..
सकाळच्या ७ च्या प्रहरा पर्यंत detective जय विचार करत होता व सिगारेट वर सिगारेट संपवत होता आता त्याच्या office मध्ये सिगारेट buds चा पण पसारा झाला होता....अचानक काही तरी आठवल्या गत ऊठला व hat डोक्यावर घालून फाईल सोबत घेऊन office च्या बाहेर उभ्या असलेल्या कार मध्ये बसून सुसाट वेगाने हवेशी स्पर्धा करत तब्बल ३-४ तास driving करत श्रीरामपूर च्या police station ला पोहचला व सरळ आत गेला..आत PSI माने व आनंद परांजपे चहा घेत बसले होते आनंद परांजपे दिसायला उंचपुरे व डोक्यावर वयामूळे केस विरळ असलेले 60-65तील संजय चे वडील..त्यांनीच ही केस private detective जयला दिली होती..जय तिथे पोहचला व psi बोलण्याच्या आधीच म्हणाला..
"officer मला ताबोडतोब संजय ला भेटायच आणि खूना बाबतीत महत्त्वाचे प्रश्न उत्तरे करायचेत.."
"ya sure"PSI माने खांदे उडवीत व आनंद परांजपे कडे पाहात म्हणाले...
आनंद परांजपे,माने व detective जय,संजयच्या lock up कडे निघाले तिघांच्या पायांचा खाडखाड आवाज स्टेशनभर घुमला..
चांगला dressing sense असलेला व्यवस्थापन संजय परांजपे आज कैद्यांच्या पांढऱ्या कपड्यांना आपलस करुन बसला..त्याच्या चेहऱ्याला साजनारी दाढी खूप वाढली होती..सतेज डोळे निस्तेज झाले होते व फक्त शून्यात पाहात होते..
हवालदाराने lock उघडला आणि जय व संजय ची नजरानजर झाली..
PSI माने व वडील सोबतच होते..सकाळचे ११ वाजत होते..१२ चाललेल्या विचारपूस मध्ये फाईल मधी एक न एक घटना संजयनी तंतोतंत ऐकवली व आपल्या हातून हा गुन्हा हा का व कशासाठी घडला हे मात्र त्यालाच समजत नव्हते..
"फाईल मधील पान क्रमांक ११ वरील.....असा विचारणार तोच detective जयचा phone वाजला..
"समंदर तू हो........ही tune कानावर पडताच संजय पिसाळला व समोर बसलेल्या जय वर जोरदार attack केला..त्याचे डोळे पहील्यासारखेच आग ओकत होते..जय खाली कोसळला PSI मानेनी संजयला आवरल व हवालदाराच्या मदतीने धरुन दुसरीकडे नेले..
detective जय ला त्याच हे वागणे खटकल व त्याने घटनास्थळी मानेना सापडलेला phone व head phone मागवला व check करायला लागला व आलटून पालटून पाहू psi माने व आनंद परांजपे ला काही कळेना जय काय करतोय...
"माने मला तुमची व संजय ची मदत हवीय..संजय निर्दोष आहे im sure"तो phone,table वर ठेवत detective म्हणाला..त्याच्या डोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास झळकत होता..
आता दूपारचे २ वाजत आले होते..PSI माने व detective जय संजय ला घेऊन कुठेतरी निघाले..
आज खाणीला सुट्टी असल्यामुळे राज घरीच होता..व आपल्या घरांतील त्या अंधाऱ्या खोलीत beer चा एक एक घोट पित होता..वातावरण जस थंड होता आणि beer पण....तेवढयात त्या खोलीचा दरवाजा धाड कन लाथेने लोटला..त्या दरवाज्यातून एक काळी आकृती आत आली हातात विळा घेऊन..व राज कडे मारणाच्या प्रयत्नात येत होती...
"थांब,संजय तु अजून माझ्या कब्जात व माझ्या इशारा वर नाचणारा एक बाहूला आहेस...तू विसरलास तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी ह्याच अंधाऱ्या खोलीत माझ्या विदेने भिंती वर वलय  काढून चमकणार्या दोलकाच्या साह्याने...समंदर तू हो ह्या गाण्यावर संमोहीत केला(hypnotse)केलय मूर्खा...आणि तो मोबाईल gift देऊन त्यात ती ringtone सेट केली..व मला माहीत होत तू त्या रुपमती कडे जाणार होतास...ती रुपमती त्या दिवशी तू मला office मध्ये शिव्या घालताना हसत होती..बाईच्या हसण्यावरुन महाभारत घडला होता...मला पण महाभारत घडवून तुमचा घमंड उतरावयाचा होता...आणि त्या दिवशी त्या घमंडी रुपमती च्या बापाच्या श्राद्धदिवशी म्हातारी कडे तो चमत्कारिक खडा पाहीला..व बिडी काडीचा बहाणा करुण त्या चपराशी रामूकडून गावातील नागमणी कहाणी ऐकली ज्यामूळे नवापूर ची यात्रा बंद झाली..मला खात्री होती की म्हातारी कडे तो नागमणीच होता..कारण शिवा एक गारुडी होता..आणि एका गारुड्याशिवाय नागमणी कोण मिळवेल??? आणि ऐक मुर्खा africa मध्ये अशा नागमणी ला करोडोत किंमत होती...मला तो हवा होता आणि तूमच्या कडून बद्दला..म्हणून तूला संमोहीत करुण मी जशा सुचना call करुण दिल्या त्या headphone लावून तू ऐकल्या ते माझ luck कारण तो नागमणी माझ्या नशीबात होता...आणि पहाना माझ luck तुझी व्यवस्थापन खूर्ची मला मिळाली...मि केला सर्व..मी मारल....."
इतक्यात खोलीतला लाईट चालू झाला detective जय हातात recorder घेऊन राज जो बोलला तो record केला..PSI मानेनी संजय च्या जवळील विळा घेतला व राजला हातकड्या घातल्या..राजला काही कळेना..तो फक्त ऐकच वाक्य पूटपूटला..
"हे कस शक्य आहे..मूर्खपणा मी केला सगळच ओकल.."
हवालदारानी राज च्या घराची झडती घेतली..projector..संमोहीत करण्याची वलय,दोलक,drugs सगळ जप्त केला..
psi माने राजला घेऊन स्टेशनला गेले..detective जय पण त्यांच्या मागे निघाला.हवालदार संजय ला घेऊन hospital ला निघाले ह्या गडबडीत संजय चा हात खरचटला होता..संजय अजून शून्यातच पहात होता..
आता सायंकाळचे ४ वाजत आले detective जय..आनंद परांजपे व PSI माने स्टेशन बाहेरील टपरीवर चहात पीत होते..
"आम्हाला जे जमला नाही ते तूम्ही अगदी सहज केलत...कसा काय??"चहाचा झूरका मारत..psi ने जय ला विचारल..
सिगारेट पेटवत जय म्हणाला...
१)फाईल निट वाचली तर पान क्रमांक १-१० पर्यंत संजय चे सर्व statement detail मध्ये आहेत..पण ११ पासून खूप short आणि आठवेल तेवढच लिहला
२)म्हणून मी पान ११ पासून पूढील details काढायला संजय ला भेटायला आलो पण ती ringtone वाजताच त्याचा attack..आणि त्या घटनास्थळी राजनी दिलेल्या मोबाईल वर same ringtone..आणि हो inspector संजय नी आपला mobile खुनाच्या दिवशी charging ला लावला होता..संजय कडील मोबाईल मध्ये जे sim card होता ते निश्चितच राजच होता...
३)राजच education details पाहीले किंवा संजय च्या statement वरुण तो मानसशास्त्र चा अभ्यास असलेला म्हणून मी संमोहणाच्या दिशेने विचार केला कारण एक मानसशास्त्रीयच संमोहीत(हेपनोटाइज)चांगल्या प्रकारे करु शकतो...
४)संजयच्या statement वरुन खूनाच्या रात्री एक काळी आकृती ती पण बूटकी..ह्या केसमधील सगळ्यांची जेमतेम hight होती पण राज बूटका होता..आणि तो नागमणी घेण्यासाठी तो तिथे संमोहीत असलेल्या संजयनी तो त्याच रात्री त्याला दिला...
५)नागमणीची किंमत हिरा व्यापारात असलेली व्यक्तीच चांगल्या प्रकारे ओळखू शकते..आणि फाईल मधील राजच्या statement नूसार त्याचे वडील africa मध्ये हिरा व्यापार करतात...
so अशा link जोडल्या आणि मी मुद्दाम संजय समोर ते गाणं वाजवल आणि खात्री केली..
सिगारेट च्या एका दमात private detective जय नी सर्व खुनकथा ऊघडली..
PSI माने व आनंद परांजपे अवाक होऊन पहातच राहीले..
५वाजत आले हवालदार संजय ला घेऊन hospital मधून जात होते..तेवढ्यात संजयला रुपमती चा शरीरगंध आला..व धावत bed no १४ वर असलेल्या रुपमती कडे गेला आणि तिची अवस्था पाहून ढसाढसा रडत होता..त्याचा तो आवाज hospital च्या शांततेला भेदत होता..निरागस सौंदर्यवती फक्त डोळ्यांत जिवंत होती..संजयनी हे केला ह्या गोष्टीचा खूप मोठा परीणाम तिच्या मनावर झाला...अगदी अचेतन दगडाचा वार सचेतन फूलांवर ठेचून व्हावा...अभागी संजय पण तिला सत्य सांगणार पण दगड झाली रुपमती..रुप तेच पण फक्त डोळे जिवंत..ती किलकील्या डोळ्यांनी संजय कडे फक्त पहात होती..संजय रडतच होता..त्याचा तो प्रेमळ स्पर्श सुद्धा रुपमती ला जानवत नव्हता..
इकडे private detective जय नागमणी बद्दल माहीती जमवत होता..तो एक काल्पनिक खडा होता..आणि काल्पनिकतेवर त्याचा विश्वास नव्हता..तो नागमणी होता की शिवा गारुड्याला कोळसा खाणित काम करताना सापडलेला हिरा होता..कारण निसर्ग कालांतराने कोळसा हिरा बनवतो..असे अनेक विचारांचा काहूर त्याच्या मनात थैमान मांडून बसला समूद्राच्या लाटाप्रमाणे..त्यांनी ठरवलं की शिवा गारुड्याच्या वरील नागमणी चोरीचा आळ पूसून रुपमती ला न्याय द्यायचा..सिगारेट पेटवून ह्या कामाला लागला रात्रीचे ९ वाजले होते..थंड हवा..jacket with hat घातलेला कुरळ्या केसांचा imagine करणारा अवलीया...सिगारेटचा धूर रुमभर वलय निर्माण करत होता..
नागमणी २....detective जय च्या नजरेतून....????

=============================================================================================================
  (ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे)

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.