नारी

प्रत्येक रूपात ती वाटते निराळी,

दुर्गा-काली चे रूप आहे नारी.
कधी आई,कधी बहिण,कधी मुलगी बनून जाते,

प्रत्येक रूपात ती आपले कर्तव्यच निभावते..
आई बनून कधी अंगाई गाते,

बहिण बनून कधी हक्क गाजवते.
मुलगी बनून कधी माया करते

तर अर्धांगिनी बनून प्रेम दर्शवते.
स्वतः दु:ख सहन करून ती तुम्हाला ठेवते खुश सदैव,

तरी सुद्धा होतो तिचा अपमान हेच आहे मोठे दुदैव...
भारतासारख्या देशात देवीसमान पुजनिय आहे नारी,तरी सुद्धा होतो तिच्यावर अत्याचार

आणि तमाशा बघत बसते दुनिया सारी..
प्रत्येक पुरुषाच्या जीवनात नारीची असते साथ,

जो करत नाही तिचा मान त्याचा कसला आलाय सन्मान..
प्रत्येक दु :ख सहन करण्याची असते तिला दैवीशक्ती

लक्षात ठेवा तिच्याच मुळे निर्माण झाली ही सारी सृष्टी..

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.