अरेंज मॅरेज


 

आज लग्नाचा दहावा वाढदिवस...
> बायकोला साड़ी गिफ्ट दिली.. आणि जस काही कर्त्याव्यातुन मुक्त झालेला आहिरभाव दाखवत मी... " आवडली का??कशी आहे..."
> छान आहे...खुप आवडली....तिने निरागस उत्तर दिल...मी पण तुमच्यासाठी काही आनलय..एक मिनीट ह.... हात पुढे करा...
> हे काय घडयाळ.... याची काय गरज होती
> अशी कशी गरज नाही मी पाहिलय तुमच ते एंटीक घड्याळ मधुनच कस बंद पडत ते...म्हणून हे..
> सुमन...तू ग्रेट आहेस किती दमतेस तरी चेहऱ्यावर कधी तस दाखवत नाहीस..तू खरच सुमनासराखीच आहेस...
> हो हो.....बस आता डायबेटिस होईल मला... तुमच आपल काहीतरीच..
> अस म्हणून ती गेली तिथून पण माझ मन मात्र भूतकाळात गेलेल...
> बाबा मला आत्ताच लग्न नाही करायचय..
> मग कधी म्हातारा झाल्यावर करणार का?
> अरे  मी वचन दिलय राम ला की  तुझी लेक सुमन हीच माझी सुन होणार म्हणून.. त्याच काय तो बिचारा तर हे जग सोडून गेला जर मी आता जर माझ वचन नाही पाळल तर वर गेल्यावर काय उत्तर देऊ  त्याला??
> बाबा!!मला विचारुन तुम्ही वचन दिलेल का??
> ते काही नाही तुला सुमनशीच लग्न कराव लागेल नाहीतर तू माझ मेलेल तोंड पाहशील..
> बाबा ही जबरदस्ती आहे ह....
> मी एवढा शिकलेला..शहरात राहणारा
> मला शोभेल अशी बायको हवीय !
> ती कोण सुमन ती फ़क्त १०वी पास आहे कस जमणार आमच???
> हे बग बाळा..एखाद्याच्या शिक्षणावरुण त्याची पात्रता ठरवन चुकीच आहे..
> तुझी आई फक्त चौथी पास होती पण तुला तिच्यापेक्षा चांगल कुणीच शिकवू शकत नव्हत ना...मग।
> पण..मी त्या सुमन ला पाहिल पण नाही आणि अस कस संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत काढणार??
> अरे एवढच ना... मग आत्ता बघ ना मी उदयाच त्यांना कळवतो तू येतोय ते..
> नाही तुम्ही काही कळवू नका.. मी स्वताच जाईन आणि बघेन आणि जर मला आवडल तरच हो..... म्हनेन मी..चालेल
> बर बर तुझ्यामनाप्रमाने होवू दे..मला खात्री आहे तुला सुमन नक्कीच आवडेल...
> बघू ते पुढे...मी मनात ठरवूनच गेलो की तिला नकार दयायचा!!!!
> दुसऱ्यादिवशी मी सकाळीच निघलो...
> एखाद्या चित्रपटातल दुष्काळी वाटाव अस ते गाव..कशी राहतात ही लोक...
> काय सुविधा नाही,इंटरनेट नाही महत्वाच म्हणजे लाइट नसते बारा बारा तास तर बाकीच काय बोलणार...
> ऐ...एक मिनिट...हा पत्ता सांगता का जरा..
> अस विचारताच तो मानुस मला खालून वर पर्यंत बघू लागला
> सांगताय ना पत्ता
> आ....हा..पावन नवीन हायसा का गावात..??
> हो नवीनच आहे
> हा तरीच म्हणल..कोण एडपाट घराच्या समोर उभ राहून त्याच घराचा पत्ता इचारल ना!!!हा हा हा.. दया टाळी
> काय.???
> आव ...हेच की घर समोर काय ते..दिसल का??
> हा हा..दिसल..थैंक यू...
> काय ते???
> अ....धन्यवाद
> हा हा मग ठीक आहे मला वाटल...
> काय वाटल???
> काय नाय तुम्ही जा सरळ तेच घर...
> हा..
> घर...तस बर दिसतय म्हणजे  मोठ  आहे... चला मिळाल एकदाच!!!
> गेलो घरात... दारात पाय ठेवला तेवढ्यात आतून आवाज आला..
> ओं..आत या.!!!किती वेळ वाट पाहतेय मी..इतका उशीर करतात का??
> बाबांनी फोन केला वाटत तरी सांगितलेल नका करू... आता काय चला।।
> ओं...याना पटकन...एक तर उशीर त्यात पण असा वेळ काढताय..
> मी आत गेलो तर एक मुलगी होती,लांब केस,पानीदार डोळे.....एक क्षण मी तसाच थांबलो....पण त्या पानीदार डोळ्यात मला आता एक धारदार नजर दिसली..तसा मी सावरलो...ती एका शेळीला गोंजरत होती...
> या लवकर बघा हिला सकाळ पासून हिने काही खाल्ल पण नाहीं??रात्री पर्यंत बरी होती...सकाळी बघितल तर जागेवरून उटत पण नवती...काय झाल असल तिला??बरी तरी व्हईल ना सगुना????
> सगुना???कोण
> हिच!!
> अहो पण मी......
> अहो आपण नंतर बोलूया की आधी तिला बर करा ना तुम्ही!!
> अहो तेच सांगतोय की मी नाही....
> तुम्ही वाटल्यास जास्त पैसे घ्या पण करा ना काहीतरी...
> आईशप्पथ....ही तर एकयालाच तयार नाहीये..कुठे फसलोय???
> अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही समजताय तो नाहीये..
> म्हणजे....तुम्हाला वैद्य काकांनी ,नाय पाठवल...
> नाही।।।
> ओह....चुकलच माझ एवढ बोलले तुम्हाला..मला वाटल तुम्ही...मी पण ना
> खरच माफ़ करा अ मला..
> पण आता.....???
> अहो..अहो तुम्ही रडू नका होईल बरी ती!!म्हणजे सगुना..नका काळजी करु
> काय चाललय यार..आलोय कशासाठी आणि करतोय काय???
> तुम्ही एक मदत कराल का ती रडतच बोलली
> काय???
> मी जावून येते वैध्य काकानंकडे..तुम्ही तोपर्यंत तुम्ही सगुनापाशी राहाल का??खुप एकटी आहे हो ती खुप मदत होईल तुमची
> नाही म्हनन्याचा चांसच दिला नाय तिने..
> हम्म...!!!
> बर मी आले लगेच ह.. अस म्हणून गेली ती...
> गेली ती गेली अर्धा तास पत्ताच नाही ओळख नाही काही नाही तरी ही अशी कशी गेली....आता काय फायदा जेव्हा बोलायला हव तेव्हा नाही.... शट यार शी काय चाललय हे...आता काय या बकरिशी बोलत बसु...हे करायला आलोय का मी ईथे.....हा...
> अजुन हिचा पत्ता नाही एक तास होईल आता पण मला हे कळत नाहीये....मला नव्हत थांबयच तर मी का आहे अजुन ईथे....ओह....अजुन थोडा वेळ थांबलो नक्की पागल होशील विवेक....चल यिथुन...बाहेर पडणार तेवढ्यात मैडम हजर....
> धापा टाकत....कशी आहे सगुना...
> काय खाल्ल का तिन???
> आ.....नाही खाल्ल काही!!!
> आता खाईल...हे अौषध  दिलय ना काकांनी....आता आमची सगुना खेळनार..माझी गुनी बाय ती...आपण त्या माळावरल्या शेतात पण जवुया तुला आवडत ना तिकड.....
> ती तिच्याशी अशी बोलत होती जस काय तिचच कोण जवळच आजारी आहे...मी तिथे आहे याच पण भान नवत तिला...
> मी.....ते
> आ..हा मी विसरलेच तुम्ही कोणाला भेटायला आलाय का..??पण घरात कुणीच नाहीये सगलेजन... यात्रा आहे शेजारच्या गावात तिकडे गेलेत....
> तुमचा काय निरोप असेल तर दया मी देईन काकांना??
> अ.....ह.. मी ते....ते मला
> मी सुमन....
> काय???
> हो सुमन... काय झाल
> ह.....नाही काह़ी नाही...जातो मी..
> अहो जातो नाय येतो म्हणाव...आणि तुमच नाव काय??काकांना सांगव लागेल ना...
> आ.. हा...विवेक..बर तुम्ही एकट्याच का नाय गेला मग यात्रेला???
> मी...एकटी कुठे!!!सगुना पण आहे की..
> ठीक आहे येतो मी....
> बर....तुमची खुप मदत झाली....
> बर येतो मी....काय माहिती पण मन तिथून जायलाच तयार नवत....
> विवेक अरे काय झालय....कधी सांगणार आहे तुझा निर्णय..काय सांगु मी त्या लोकांना??? काय ठरवलस की नाही अजुन..कशी वाटली सुमन तुला??
> बाबा मला अजुन थोडा वेळ हवाय..
> अजुन किती???
> मला नाही महिती कधी!!!
> मला काय झलाय हे..बुद्धी बोलतेय ती तुला शोभणारी नाहिये....तुझ्या स्टेटस ची नाहिये...पण मन मात्र गोंधळलेल आहे...
> शेवटी बाबांच्या मनासारखच झाल..ठरल लग्न तिच्यासोबतच..पण मी तितकासा खुश नव्हतो...
> पहिल्याच रात्री मी तिला माझ्या मनाची अवस्था सांगितली.... पत्नी म्हणून स्वीकारायाला मला थोडा वेळ लागेल... तुला काहीच बोलायचय का?
> यावर तीच मार्मिक उत्तर हे होत की
> माझी आजी म्हणते की नवरा हा मंदिरातल्या प्रसादा सारखा असतो जेवढा पदरात पडेल तेवढा गोड मानून घ्यायचा!!
> पण हा तर कुठल्यातरी फिल्मचा डायलॉग आहे ना??
> हा,...असेल....पण माझी आजी पण म्हणायची ना!! आणि तसही आयुष्यभर साथ दयायच वचन दिलय तर मग तुमच्या या निर्णयात पण साथ दयाविच लागेल ना!!
> अशी कशी ही??हिला स्वताच अस काही मत नाहिये का??
> लग्नासाठी महिन्याची सुट्टी काढलेली पण मी ती फक्त आठवड्याचीच घेतली
> यावर वर पण मैडम ना काहीच प्रोब्लेम नाहिये?? "साध तुम्ही जरा सुट्टी वाढवा आपल नविनच लग्न झालय!" अस पण म्हणत नाहीये!!कस होणार हिच?
> जाऊदे...
> चल मी जातोे...
> अहो.. जातो नाही.......
> हो..कळाल येतो म्हनाव ते...
> एवढ बर येत म्हणता सारख!!(मनात)
> अहो थांबा ५ मिनिट फक्त झालय सगळ डबा भरते लगेच... तुम्ही तोपर्यंत नास्ता करा ना मी आनते लगेच!!
> डबा!! का केलात?कुणी सांगितलेल का करायला?
> नाही कोणी नाय सांगीतल मीच केला.. मला वाटल तुम्ही जात असाल घेउन म्हणून....
> पण मला विचारल का ??
> ते मी... आपल असच .. बर तुम्ही नास्ता तरी करा ना मी आनते ह..पोहे केलेत मी!!
> देवा!!...... रामुकाका ईकडे या!!
> तुम्ही सांगीतल नाही का? की मी पोहे नाही खात ते!!
> नाही मालक....ते ताईसाहेबांनी मला काही करुच दिल नाही त्याच करत होत्या सगळ...
> काय चाललय सगळ??? रामुकाका जा ब्रेडबटर घेउन या पटकन.
> आणि तुम्ही काही करायच्या आधी विचारत चला जरा..
> विवेक चल जेवायला.... हा जस्ट मिनिट एक  फाईल सेंड करतो बॉस ला  आ हा झाली .... चल आता
> यार रोज रोज कैंटीन च खाऊन पण कंटाला आलाय.... विवेक तुझ बर आहे आता काय वहिनी रोज रोज नविन पदार्थ देणार बाबा...
> त्या वेळी मला तिची आठवण आली..
> सकाळी खुपच बोललो का मी?? तिला थोड्च माहिती होत की मला काय आवडत आणि काय नाय ते!!!उगाच एवढा ओरडलो मी तिला!! जेवली असेल का ती?? फोन करू का तिला?
> पण मोबाईल नंबर तरी कुठे घेतलाय तिचा!!!शट.... घरी फोन करतो...
> अरे विवेक कुठे हरवलायस का वहिनींची आठवण येतय की काय?
> आ ....हो म्हणजे नाही ..मी आलो ह एक मिनट प्लीज..
> हॅलो....अ हा रामुकाका सुमन ला दया फोन...
> पण मालक..ताई साहेब तर...
> तर काय??  
> काय नाय त्या सकाळपासुन खोलीतून बाहेरच नाय आल्यात!!
> का??
> काय माहिती पण तुम्ही गेल्यापासून तर त्या रूम मधेच आहेत. जेवायला पण मी गेलेलो बोलवायला पण भुक नाहीये अस बोलल्या!!
> बर असुद्या!!ठेवतो मी फोन!!
> मी बोलल्यामुळे तर नाही ना झाल हे सगळ!!
> अरे विवेक येना लवकर जेवायला किती वेळ??
> आ....हा यार तुम्ही जेवून घ्या मला नाहीये भुक जेवा तुम्ही!!
> अरे असा काय हा???
> काय करु??परत एकदा लावू का फोन? आली असेल का बाहेर ती?
> नाही नको... रात्रीच बोलतो...
> ह्ह....थकलो यार...रामुकाका एक हॉट कॉफ़ी आना..लवकर
> कॉफ़ी.... तु आनलीस रामुकाका नाहीत का?
> आहेत पण ते दुसर काम करतायत म्हनुन मी आणली पण कॉफ़ी त्यांनीच केलीय....
> अ....दुपारी मी फोन केला होता पण रामुकाका बोलले की तू रूम मधुन बाहेर पण नाही आलीस म्हणुन!!!
> हम्म.....ते मला जरा बर नव्हत वाटत...
> का काय झालय??जेवलीस का तु....
> डॉक्टर कड़े जवुया का?
> नको...आहे आता ठीक... तुम्ही जेवुन घ्या..काका वाढतील तुम्हाला!!
> तु....जेवलीस ??
> नाही....मला आत्ता भुक नाहीये मी नंतर जेवते..
> का आत्ता जेव ना थोड।।।
> नको..
> खुप मनाला लागलय वाटत हिच्या मी बोललेल...(मनात)
> झाल जेवण...
> हो...गोळी वैगेरे हवीय का तुला?
> नाही नको ठीक आहे मी.. झोपा तुम्ही.
> कुठे गेली ही.... एवढ्या रात्री??मी झोपेतुन उठून बाहेर आलो तर बाहेर पण दिसत नव्हती ती..
> ती एका रूमच्या खिडकीतुन बाहेर बघत होती.  तु ईथे काय करतेय....
> तिने मानेनेच काही नाही अस केल!!
> आणि तू रड़तेस काय?? हे बघ मला माहितेय तु माझ्यामुळे रड़तेय मी सकाळी जरा बोललो...
> (अस बोलल्यावर तर ती अजुन जास्तच रडू लागली) अग जरा नाही जास्तच बोललो पण तु रडू नको ना आता... आय एम सॉरी...(तरी ती  रडतच होती)अग खरच सॉरी... तु शांत हो ग...कुणी रडताना ऐकल तर काय म्हणतील (तस तिथ कुणीच नव्हत ) अग बोललो ना सॉरी आता काय करू
> अहो तस काही नाहीये..मला आठवण येतेय ....
> कुणाची??ओह लेट मी गेस... अम्म तुझ्या काकांची?
> नाही...
> ओके ओके मग....आई बाबांची??
> नाही..
> मग आता कोण काकी,ताई, आजी??
> ओह्ह आठवल ....कुणाची आठवण येतेय ती....मिस सगुना मैडम ची बरोबर ना......
> हो....(रडतच)
> एवढच ना.. पण तिची काय काळजी करायची आता??
> (ती डोळे पुसत) तुम्हाला नाही कळायच...
> बर मग आता काय करायच.... एक मिनिट....नो नो तू जर तस म्हणत असशील तर तस शक्य नाही नेव्हर...
> पण मी काय म्हनालेच नाहीये...
> पण मला तुझ्या मनात काय चाललय ते कळतय मला...
> तुम्हाला कळत का मन माझ??
> म्हणजे?
> काही नाही.. आणि माझ्या मनात अस काही चाललेल नाहिये...
> नशीब!!मला वाटल आता म्हणतेय तु की तिला ईथे आणा म्हणुन..
> मीच जाणार आहे तिच्याकडे..
> का??म्हणजे कधी?किती दिवस?
> माहिती नाही...अस पण इथे राहून न राहून माझा काय उपयोग... मी उदयाच जाते..
> काय म्हणायचेय तुला? बर  मी येवु का सोडायला..
> नको मी काकांना बोलावलय ते येतायत उदया..अस पण खुप काम असेल तुम्हाला ऑफिस मधे
> जाईन मी...
> म्हणजे ठरलय तर तुझ सगळ...
> हो.
> रामुकाका... हे संध्याकाळी आले की त्यांना हॉट कॉफ़ी दया...पण साखर कमी त्यांनी मागितली तरी देवू नका त्यांना त्रास होईल..आणि जास्त वेळ काम करत बसले रूम मधे तर कॉफ़ी देऊ नका जास्त...जेवण पण वेळेत दया आणि रोज सकाळी फक्त ब्रेड बटरच नका देऊ... उपमा, शिरा,आणखी काहीतरी अस दया.फक्त पोहे सोडून.. आणि घराची काळजी घ्या आणि तुमची पण...बाहेरच्या चाफ्याच्या रोपाला रोज पाणी दया...सुकून देवु नका त्याला..
> ताई साहेब तुम्ही कधी येणार परत..
> हम्म...माहिती नाही..कदाचित कधीच नाही..
> रामुकाका एक फक्कड़ गरमा गरम कॉफ़ी आणा...
> घ्या मालक..
> अम्म....हे काय कॉफ़ी आहे का गरम पाणी...रोजच्या सारखी का नाहिये..
> ते मालक...
> काय ते..जाऊदया आता...
> मालक जेवण तयार आहे...येताय ना जेवायला.. हो आलो... सुमन कुठेय
> पण मालक....
> ओह्ह...हम्म मीच विसरलो की ती नाहीये ना.....
> आज जेवणात पण मन लागत नाहीये....
> मालक एक बोलु का??
> हम्म...बोला काय हवय.....
> नाय मला काही नको..पण....
> पण काय..... बोला की??
> तुम्ही ताईसाहेबंना... परत घेउन या...
> पण काका मी कुठे पाठवलय तीच गेलीय की...तिला वाटल की येईल की परत....
> पण मालक....मला वाटतय की त्यांना तुमची गरज आहे...आणि त्या जश्या रितीन गेल्यात ना त्या खुप दुखावलेल्या वाटत होत्या...
> मग...मी काय करु अस वाटतय तुम्हाला ..... ती गेलीय तीच येईल आणि हा विषय यिथेच संपला...
> सगळ्यांना वाटतय माझीच चुकी आहे...मीच जस हकलवलय तिला बाबा पण फोन वरून मलाच ओरडतायत...त्यांना कुठे माहितेय
> ईथे काय सिचुएशन आहे ती...  सगळ्यांना मीच दोषी वाटतोय.... उलट गेल्यापासून एक फोन तरी कुठे केलाय का तिने??तिचा ईगो कुणाला नाही  दिसत....
> हॅलो...अरे विवेक आज आठवडा झाला तु केलास का सुमन ला फोन??
> नाही..बाबा..पण तिने तरी कुठे केलाय??
> अरे पण आता काय अस एकमेकांची फोन ची वाट बघत बसायच का??तिने नाही केला तर तुला तरी डोक आहे ना की फोन करवा म्हणुन...
> नाही बाबा... ती स्वताहुन गेलीय तर स्वताच फोन करेल आणि स्वताच येईल...
> अवघड आहे....सगळ आता... देवच तुम्हाला सदबुद्धि देओ....
> तुम्ही नका काळजी करू बाबा..
> हॅलो.... हा बोल विवेक
> काका...मी समीर बोलतोय..
> समीर..अरे पण हा तर विवेक चा नंबर आहे न... काय रे काय झालय? विवेक कुठाय??
> काका एवढ काळजीच कारण नाहीए पण??????
> पण काय?
> काका.... रात्री आम्ही ऑफिस मधून येताना विवेक च्या कारचा एक्सीडंट झालाय..
> काय...आणी तु आत्ता फोन करतोयस कसा आहे विवेक???कुठेय
> आता आहे ठीक पण त्याच्या पायाला लागलय ...
> अरे देवा...हे काय चाललय सगळ..
> तु मला हॉस्पिटल च नाव आणि पत्ता कळव मी येतोय आत्ता...
> हो काका कळवतो....
> हॅलो....सुमन
> हा...हॅलो बाबा बोला कशे आहात तुम्ही?
> मी ठीक आहे बाळा....पण विवेक ???
> काय झाल?? ते कशे आहेत..कुठे
> आहेत..
> अग...त्याचा एक्सीडंट झालय.....
> काय???कधी आता कशे आहेत ते??
> मी पण नाही पाहील अजुन त्याला..
> बाबा...मी येते आत्ता..
> बर बाळा....तु ये मी पण पोहचतो.
> डाॅक्टर....कसा आहे विवेक??
> आता काही काळजीच कारण नाहीये..पण त्यांच्या पायाला मार लागलाय त्यामुळे पुढील एक महिना तरी त्यांना आरामाची गरज आहे...
> तुम्ही या माझ्या सोबत मी काही अौषध लिहून देतो ती आणा...
> बर....सुमन तु थांब त्याच्याजवळ मी आलो..
> बर.....
> आ.... आई ग.....तु कधी आलीस?? आणि रडतेय का??
> तुम्ही उठु नका.... काही हवय का??
> पाणी????बाबा नाही आले का??
> आलेत..अौषध आणायला गेलीत..
> हे घ्या पाणी....
> कधी आलीस तु???
> थोडा वेळ झाला.. एक्सिडंट कसा झाला???
> ते मी ड्राइव करत होतो... खुप वेळ झालेला हाइवे वर...समोरून एक ट्रक येत होता.. त्याचा लाइट माझ्या डोळ्यावर पडला.. आणि माझा कंट्रोल सुटला आणि गाड़ी एका झाडाला धडकली...
> एक तर एवढ्या रात्री पर्यंत काम करायची काय गरज असते हो...
> वेळेत काम संपवून घरी लवकर यायला काय होत...हे थोडक्यात वाचल म्हणून अजुन काही झाल असत तर....काय झाल असत माझ आणि बाबांच.. आपली घरी कुणीतरी वाट बघतय अस जरा पण नाही का वाटत....
> अग पण...
> काही बोलू नका...तुम्ही कधीच कुनाच ऐकत नाही... हव तस वागायच, वेळेत जेवण नाही... झोप नाही...सतत चिडचिड..राग...जरा तरी काळज़ी घ्यायची ना स्वताची...
> अग....
> अग काय.... जरा स्वताचा नाही तर माझा तरी विचार करायचा ना...
> अग.....हळु सगळे बघतायत....
> बघुदे....मी माझ्या नवर्याला सांगतेय ..
> त्यांना काय फरक पडतोय...
> अग थांब थांब....किती बोलतेय मी आजारी आहे ग.... आणि आधी रड तरी किव्वा ओरड तरी... सगळे अस बघतायत की मी काहीतरी मोठा गुन्हा केलाय... आणि तुला तरी माझी कुठे काळजी आहे....जर असती तर अशी गेलीच नसती ना...
> हो का....मला काळज़ी नाहिये ना...
> आणि मी गेले पण तुम्ही तरी कुठे   थांब बोलला......
> जर मी बोललो असतो तर जशी तु
> थांबलीच असती...
> म्हणून तरी बघायच ना पण मी कोण आहे ना तुमच्यासाठी??
> अस काही नाहीये... पण तुला तरी कुठे माझी काळज़ी आहे साधा एक फोन पण केला का?? मी कसा आहे? जेवला काय? काय  करतोय?
> पण आता आलेय न मी... आता महिनाभर जागेवरून उठू पण देणार नाही..... माझच चुकल एवढ्या छोट्या कारना वरून मी अस अचानक जायला नको होत....मझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय....मला माफ़ करा...
> अग तुझ नाही माझच चुकलय.... एक पती म्हणुन मी कमी पडलो....तु  सगळ सोडून माझ्यावर विश्वास ठेवुन आलीस पण मी तो विश्वास नाही जपु शकलो.... मी खरच तुझा दोषी आहे मला माफ़ करशील.... आणि मी म्हंटल होत ना की पत्नी म्हणुन स्विकरायला मला वेळ लागेल म्हणुन.... पण मी ते माझ मत माघारी घेतो.... मला खरच तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायचय.... देशील ना मला साथ....
> मी कायम तुमच्या सोबतच आहे.....
> तु निघून गेल्यावर मला कळल की मी अपूर्ण आहे तुझ्या शिवाय... पण आता नाही जावून देणार तुला....
> अगदी तुला आठवण आली तर तुझ्या त्या सगुनाला ईथेच आणतो....
> चला..... तुमच आपल काहीतरीच
> अग खरच बोलतोय मी.... तुझी शप्पथ
> हम्म...,माहितेय मला... ,
> देवा.....सगळी काळज़ी तुलाच रे.... (बाबा )


 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.