एकत्र / विभक्त काळ बदलला तसा एकत्र कुटुंब पद्धती लोप पावल्या..एकत्र म्हणण्यापेक्षा सर्व समावेशक कुटुंब पद्धती म्हटले तर वागावे ठरणार नाही..सर्व समावेशक अशा अर्थाने की त्यावेळी संपूर्ण चाळ, शेजारी पाजारी सुद्धा कुटुंबाप्रमाणेच वावरत होते..एकमेकांच्या सहाय्याला धावून जात होते..सुख दुखाःत सहभागी होत होते..

पण हळू हळू हे सर्व बदलत गेले..समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा शिरकाव झाला..ह्याचे मुख्य कारण म्हणजे..एक तर जागेचा अभाव आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..तुम्ही म्हणाल जागेचा अभाव पूर्वी सुद्धा होता तरी १५ माणसांच कुटुंब १८० चौरस फुटाच्या खोलीत रहात होते.. तुमच म्हणण सुद्धा बरोबर आहे..त्यावेळी जागा जरी छोटी असली तरी माणसाचं मन आणि हृदय विशाल होते..त्यामुळेच सर्व गुण्यागोविंदाने नांदत होते..

काळानुरूप माणसाचं मन कोत बनलं..मग घर ते काय हो ते सुद्धा सहाजिक छोट बनलं..आणि हि लागण फक्त शहारापुरती मर्यादित नाही तर अगदी खेड्या पाड्यात गाव कुसा पर्यंत पोहचली आहे...गावातली विशाल घरे सुद्धा आज विभक्त होऊन कोंबड्याची खुराडी बनली आहेत व मनाने विखुरली गेली आहेत..सर्वच कुटुंबात स्वार्थाचा शिरकाव झाला अस मी म्हणणार नाही काही अपवाद सुद्धा आहेत..तर काहींनी सामंजस पणाने निर्णय घेवून विभक्त पण मनाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला..आणि तो स्तुत्य आहे..अस मी म्हणेन..

आता आपण दुस-या कारणाकडे वळू तो म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..मी आणि माझ त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब ह्या पलीकडे कसलाच विचार..ह्या वैयक्तिक स्वार्थ पाहणा-या व्यक्ती करत नाही..अशा कुटुंबाचा प्रवास खरे तर उजेडाकडून अंधाराकडे चालू आहे म्हंटल तर वागवे ठरणार नाही..कारण स्वतःच्या चार भिंतीत ह्यांच संपूर्ण जग सामावलेलं असत..ह्यांच्या शेजारी कोण राहतो ह्याचा सुद्धा त्यांना पत्ता नसतो..फ्लैट पद्धत सुरु झाल्याने सताड उघडे असणारे दरवाजे आता कायमचे बंद झाले..त्याच बरोबर मनाची कवाडं सुद्धा आपसूक बंद झाली..

आता तुम्ही म्हणाल विभक्त राहण्यात कसला आलाय स्वार्थ..?? तर त्याच अस आहे..सामंजसपणे घेतलेले निर्णय वेगळे..पण अट्टाहासाने नाहक कुरापती काढून निर्णयाप्रत येणे हे वेगळे..अशा निर्णयात मागाहून पच्छाताप करून घेण्याची पाळी येते..आणि सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते..त्यासाठीच इथे एक उदाहरण देऊ इच्छितो.. जे मी पाहिलं आहे..

दोन भाऊ आपल्या आई वडिलांसमवेत आणि त्याच्या अपत्यासह अगदी गुण्या गोविंदाने नांदत होते..पण आई वडील गेले आणि कुठून तरी स्वार्थी किडा एका भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनात शिरला..क्षणात होत्याचे नव्हते झाले..दोन्ही भाऊ विभक्त झाले..सहाजिक सुरवातीला दोघांनाही बरे वाटले..पण नंतर त्याना एकत्र राहण्याचे फायदे समजून आले तो पर्यंत उशीर झाला होता..ज्या कारणासाठी विभक्त झाले तेच कारण मुळावर आले.. कारण तस शुल्लक होत..म्हणे त्यांना एकांत मिळत नव्हता..तोच एकांत आज आकांत करतो आहे..माणसं जोडण्यासाठी अजूनही धडपतो आहे..माणसं जोडण्यासाठी अजूनही धडपडतो आहे...

सरते शेवटी इतकेच सांगेन शरीराने भले विभक्त रहा पण मनाने कायम एकत्र या..एकत्र रहा..
धन्यवाद... 

 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.