आयुष्याची लढाई..

 

संध्याकाळची वेळ होती... सुर्य पाण्यात बुडत होता,पक्षी घरट्यात परतत होते.रस्त्यावर माणसांची वर्दळ होती प्रत्येकाला घरी परतायची घाई होती.पण तिला मात्र घरी जावसच वाटत नव्हत .शाळेतच तिच मन रमायचं. मुल मुली बाई ...बाई.. म्हनत तिच्या अवतीभवती पिंगा घालायच्या .प्रत्येकाला बाई आपल्या वाटायच्या.. अगदी जवळच्या वाटायच्या ..किती तरी मुलांच्या परिक्षेची फी ति भरायची,घरची परीस्थिती बेताची असलेल्या मुलांची हौस व्हावी म्हनुन त्यांच्या शैक्षणिक सहलींची फी स्वतः भरायची...

मुख्याध्यापिका होती ती. आज तीचा आदर्श शिक्षिका म्हनुन गौरव झाला होता. सहशिक्षकांनी भरभरुन कौतुक केलं तिचं.. खुप भरुन आल होत तिला . डोळ्यातील आसव लपवण्याचा तिचा प्रयत्न निष्कफळ ठरत होता .. कार्यक्रम संपल्यावर तडक समुद्रकिनार्यावर निघुन आली ती.. ही तिची नेहमीची आवडती जागा... या जागेशी ,समुद्राशी तीच घट्ट नात होत.जेव्हा नवी नवरी बनुन या कोकणात आली तेव्हापासुन तीच आणी या समुद्रकिनार्याच नात जमल होत.. आज ही आठवतो तो दिवस जेव्हा पहिल्यांदा ती इथ आली.नवीन असताना तीच आणी नवर्याच भांडण झाल होत. तो दरू पिऊन तर्र झाला होता आणी लाडात येऊन हिच्याशी लगट करत होता त्या त्रासातुन सुटका करण्याकरता ती समुद्रकिनार्या कडे धावली.

सुरवातीचे दिवस ती काही बोलली नाही सहन करत राहीली.. आज सुधरेल उद्या सुधरेल म्हनुन वाट बघत राहीली.. ऐक दिवस गोड बातमी मिळाली नवरा सुद्धा ती बातमी एेकुन खुश झाला . संसारवेलीवर नवीन फुल उमलले त्याला न्हाऊमाखू घालन्यात हिचे दिवस आनंदात जाऊ लागले..नवरा सुद्धा लेकाला कुठे ठेऊ अन कुठे नको करु लागला..पन दारु काही सुटली नव्हती..घर ,लेक, नवरा सगळ सांभाळुन शाळा सुरू होती.. तिच्या नवनविन ओळखी होत होत्या.. समाजात मानमिळत होता....मोठ मोठया कार्यक्रमा मध्ये तिला पाहुणी म्हनुन बोलवल जायचे... पण नवर्याचा अहंकार दुखावत होता त्यान नोकरी सोडली , तीला त्रास देन्यासाठी तो घरी मुलासमोर बसुन पिऊ लागला त्याच व्यसन वाढत जात होत.. तीचा राग वाढत होता .वयात येनार्या मुला समोर भांडनं होत होती आणी याचा त्या मुलावर परिणाम होत होता.मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हनुन हिची धडपड सुरू होती..मुलाला धाकात ठेवत होती.

पण व्यर्थ......

पोराला वाईट संगत लागली.. मुलींच्या मागे लागने त्याना त्रास देने असे उपद्व्याप सुरू होते..एकदा तर तिच्या विद्यार्थिनीची तिच्या मुलाने छेड काढली होती.. सलग आठवडाभर शाळा चुकवली म्हनुन त्या मुलीला हिने जाब विचारला , ती मुलगी पण काही वेळ बोलली नाही ,शाळेतुन काढण्याचा धाक दाखवल्यावर ती म्हनाली "बाई शाळेला येताना पोर चिडवतात नट्यानच्या नावान. घानेरडी गाणी बोलतात ..मी आणी माझी मैत्रीन दोघीच असतो रस्त्यान. ४ दिवस शाळेला गेलो नाही तर ती पोर त्या रस्त्याला थांबनार नाहीत अस वाटल. म्हनुन आलो नाही..पन ती पोर आज पन होतीच....

शिपायाच्या मदतीन हिने त्या मुलांचा शोध घेतला तर त्या मुलांमध्ये हिचा लेकही होता. पण म्हनुन तिने दया दाखवली नाही. लाकडी पट्टीन फोडुन काढल आणि परत छेड काढल्यास पोलीसांमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली.

त्या संध्याकाळी घरी येताना तिची पावल जड झाली होती .कितीही केल तरी ती एक आई होती.. मुलगा आपल्याला दुरावनार तर नाहीना ही भिती होती.. आणि तसच झाल मुलगा तिच्यावर तणतणला,"मित्रांसमोर मारलस मला , एवढी कोन होती ती तुझी म्हणाला".तिन त्याला स्त्रि दाक्षिण्याविषयी समजावल.पण व्यर्थ......तो दुरावला

तिन हे पण स्विकारल.सुरवाती पासुन ती सगळ स्विकारतच आली होती.. तिच्या माहेरी मुलगा हाच वंशाचा दिवा मुली लग्न करून दिल्या म्हनजे मेल्या हि विचारसरणी होती .भावाच्या पोळीवर चमचाभर तुप जेव्हा जास्त पडायच तेव्हा तिला आठवायच पुरन वाटताना कमी पडेल म्हनुन आई मुठभर पुरन पण खाऊ देत नाही.आणि तासभर खपुन पोळया लाटुन पन तुप तिच्या नशिबी नव्हत, तीला जाणवायच आपल्यावर अन्याय होतो. .. तिने हे पण न कुरकुरता स्विकारल...

तिच्या लग्नाच्या वेळी तिने परी कथेतल्या राजकुमारा सारख्या नवर्याचे स्वप्न बघितले होते पन आई वडिलांनी पसंत केलेला काळा नवरा तिने मुकाट स्विकारला होता ,कारन घरच्याना तिच्या बाकीच्या बहिणी उजवायच्या होत्या..दर वेळी ती परीस्थिती स्विकारत आली होती....

व्यसनामुळ नवरा अचानक गेला मुलगा सुद्धा बापाच्या वळनावर गेला .. नातेवाईकांनी ती नको म्हनत असताना सुद्ध तिच्या मुलाच्या लग्नाचा घाट घातला.. तिला ही वाटले जबाबदारी पडल्यावर मुलगा सुधरेल पण तीचा समज खोटा ठरला ६ महिन्यातच तीची सुन माहेरी परत गेली..

तिने मनावर दगड ठेवला होता.. मुलाची रवानगी तिने व्यसनमुक्ती केंद्रातकेली.आणी आपल उर्वरीत आयुष्य तिने शाळेतील मुलांसाठी दिले.. आयुष्यातील अनेक चढउतार पार करत ,खचत पुन्हा उभारी घेत ती आज इथवर आली होती.आजच्या सत्कार समारंभात तीला खुप एकटेपणा जाणवत होता. सगळे कौतुकाचा वर्षावकरत होते पण तिचं अस कुणी सोबत नव्हत. म्हनुन ती या समुद्राकडे धावत आली होती. बुडणार्या सुर्याकडे पाहत आसव गाळत होती.. ..आयुष्याच्या लढाईत आपन हारलो की जिंकलो याचा विचार करत होती आणि अचानक एका हाताने तिची आसव पुसली..... कुणाचा होता तो हात.. ति बघतच राहीली ६ फुट उंच भरदार अंगाचा पुरूष तिच्या समोर उभा होता..तो तिचा मुलागा होता....व्यसनमुक्तीकेंद्रातुन तो सुधारुन आला होता.. . "आई ,मी चुकलो परत आता तस वागणार नाही". त्याने ग्वाही दिली. ...त्याच्या कुशीत हिनी आपल्या आसवाना वाट मोकळी करून दिली.. आयुष्याची लढाई तिने जिंकली होती.......


 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.