वेडे मन हे...

वेध जीवाला ना जाणो...? का तुझेच लागले. मन हे वेडे माझे, स्वप्नवत अवकाशी, बेधुंद तुझियाकडेच, धाव घेत राहिले.

मनाचं पण काही असचं असत. कधी इथे तर कधी तिथे. सारखे उधाण वा-यासारखे भिरभिरत राहते. कधी गोड आठवणीत रमते. तर कधी वाईट प्रसंगांशी मनोमन झुंजते. कधी कावरे-बावरे होते, कधी ओढ प्रियाची घेते. कधी ना जाणो ? कुणावर भुलते, स्वप्नी अनोखीच दुनिया बघते. कधी रागावते, कधी रुसते, तर कधी हसते. वेडे मन हे.

प्रियाच्या आठवात तल्लीन मन हे स्वप्नाच्या रुपेरी दुनियेत शिरते. कधी उंच आशांच्या झोक्याने आनंदी क्षण मनी भरते. वेडे मन हे. प्रिया मिलनाच्या विरहाने कधी झुरते तर कधी आशारुपी स्वप्नं मनी धरते. प्रियाच्या येण्याने कधी हर्षोल्हासाने भरते. प्रीतीच्या गोड क्षणातच जणू विरते. वेडे मन हे. खरोखर मन उधाण वा-यासम उंच आशांची भरारी घेते, कधी-कधी तुफानी वेगात, आयुष्यात संकटाची चाहूल देते. वेडे मन हे.

मन माझे गीत मधुर, हृदयी जणू सप्तसूर. काळजात कधी-कधी हूरहूर, मनात माजतो मग काहूर.

वेदनेच्या झळा जेव्हा जिव्हारी लागतात. अश्रुने नयन दाटतात. मग सोबतीच्या जीवलगांचा आधार मनीचा मागतात. स्पर्श मायेचा होता, मन भरुनी येते, जणू दुखाच्या वेदनांना भुलूनी मायेची सावली मनाला देते. वेडे मन हे.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.