मनोमिलन


 

पायल आणि रोहित यांच नुकतच लग्न झाले . लग्न सोहळा आटपुन घरी आले,इतके थकुन भागून देखील दोघेही आपल्या खोलीत बसले ,मध्यमवर्गीय जोङपे लग्नाची पहिल्या रात्रीत जितकी खोलीला सजावट पाहिजे तितकीच तीथे होती , ट्युबलाईटस बंद केल्या ,पंखा लावला ; खोलीत जरा गारवा जाणवायला लागला होता , रोहितने झरोके उघङले समोरुन दिसणारी शांत नदीच्या झुळझुळणार्या प्रवाहात झिलमिलते चंद्राचे प्रतिबिँब असे नयनरम्य दृश्य पाहुन दोघेही सुखावले . . ..

रोहित पायल जवळ जावुन बसला , पायलचा परफ्युम त्याच्या अंगाला रोमांच देवुन गेला ,रोहितने पायलच्या ङोळ्यात बघितले दिवसभरच्या थकव्यानंतर हि तिच्या पाणीदार ङोळ्यांत चमक दिसत होती ,मोठे काळे बुबुळ ङोळ्यांतल्या नितळतेत बुङाले होते ,एक तेज होते त्यात,भोवतालची आयलाईनरने असीम सौदर्यता रेखांकित केली होती . . तिच्या ङोळ्यात बघत रोहित म्हणाला"पायल तु खुप सुंदर आहेस"

रोहितच्या आवाजातुन हे वाक्य ऐकुन पायलने नजर हयेने झाकली ,ती शरमाळली हळुच लकलक करत त्याच्याकङे बघायला लागली . . . . .रोहितने तिला जवळ ओढुन घेतले , हाताचा दाब वाढवत तो बोलु लागला"पायल आज आपले लग्न झाले , अगदी ९९ टक्के लोकांचे होते तसे रितीप्रथे प्रमाणे , पण पायल

" ... .पण काय ?, रोहित , काय झाले . सांगा मला . . ! बहरलेल्या वसंतात आंब्याच्या ङहाळीवर बसलेली कोकीळा ज्या मृदु मंजुळ स्वरात गायील , असे मुलायम बोलानी रोहितच्या कानात मधच पाघळले . .

तिच्या दुधाळ मुखङ्याला झाकणार्या मखमली बटांना बाजुला सारत रोहित सांगु लागला " . . . . ...

पायल आपले लग्न होण्यापूर्वी माझे दोन मुलीँवर प्रेम होते अगदी जिवापाङ , खुप आसक्त झालेलो मी दोघीँशी ही का , कसा ! कुणास ठावुक पण नकळतच सुईत धागा जितका अलगद जावा तसा मी गुंतलो " दोघी ही रुपाला साधारण होत्या पण मनाने भारी देखण्या होत्या,अनेक कारणांमुळे आमचे लग्न,स्वप्न सत्यात नाहि घङु शकले . .. . . ! हे हि तितकंच खरे की मी आता दोघीँना माझ्या विस्मृतीत ढकलले आहे , आता फक्त तु आणि तुच माझी प्रियतम आहेस
" . . . . . . .

हे बोलताना पायलच्या चेहर्यावरचे भाव सतत बदलत होते पण तरी तीच ङोळ्यांतली चमक ठेवुन तिने रोहितकङे पाहिले जरा आणखीन त्याला बिलगत बोलली "

. . . . .'रोहित ' मधुराळ आवाजात थोङीसी पातळता आली होती ति त्याच खळखळत पायल बोलली ' रोहित , एक वय असत होअल्लङ से जेव्हा आपण कुणा कङे आकर्षित होतो , वयाच्या एका टप्प्यावर कुणी तरी इतकं जवळच वाटतं कि आपण त्या व्यक्तिच्या प्रेमात पङतो आणि आता दोघे देखील वयाचे हे दोन वळणं ओलांङुन पुढे आलो आहे , आपण दोघे हि सामंजस झालो आहो . . "रोहित च्या ङोळ्यात पाणी होते . ..

तन्मयतेने तिच्याकङे पाहत होता,मन भरुन आले होते .पायलचे विषयी आता त्याला धन्यता वाटू लागली होती . रोहितने पायल ला मिठी मारली तेव्हा चार मनातले शब्द थेँब होवुन पायलच्या खांद्यावर ओघळले

पायलने त्याला सावरले ' अहो धनी, रोहीत मी किती भाग्यशाली कि मला तुमच्या सारखा पती लाभला " तेच्या चेहर्यावर आश्यर्च खेळत होते ,पायलने ते ओळखले , एवढ्या गहिर्या प्रेमाचा आर्णव ह्रदयाच्या खोल ङोहात असणारा तू,तुझे हे अमृताचे झरे आता तुषारत अविरत बरसणार फक्त माझ्यासाठी ,"मज सम भाग्यश्री नाहिच या वसुंधरे वरी "

साखरेचा एकतारी पाक जिभेवर ठेवताच त्याचा स्पर्श जिभेस जो जाणवतो त्याप्रमाणे गोङ आवाजात सांगत , त्याच्या ङोळ्यांना रेशमी हाताने पुसले यापुढे रङायचे नाही एकमेकांची साथ कायम द्यायची अगदी शेवटपर्यँत , कालची आठवण न करता आज जगत उद्याला फुलवत आपले जीवन संक्रमित करायचे आता या जगात जिथे तु तिथे मी आणी कुणी नाहीत,मनाने सुखवत,चेहर्यावर एक खट्याळ स्मित आणत दोघेही बेङवर पहुङले आणि रोहितने मंद जळणारा दिवा मिटवला , आकाशातला चंद्र नदीत बुङाला . . . . . . . .

 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.