सहावी संवेदना

माझी साईबाबांवर नितांत श्रध्दा आहे त्यांच्या कृपेनेच मला वाटतं माझी ती संवेदना तिव्र असावी....

बऱ्याच वर्षापुर्वी आम्ही 7...8 जणांनी महालक्ष्मीच्या जत्रेला जायचं ठरवलं . एका तासाचाच प्रवास होता. पण दोन गाड्यातून जाण्यापेक्षा एकच भाड्याची जीप करून जायचे ठरले. आमच्या बरोबर सचिन राऊत ची फॅमिलीही होती . आदल्या दिवशी ठरवलं की उद्या दुपारी जेऊन निघू. पण दुसऱ्या दिवशी मला आज 'जाऊच नये' असे खुप तिव्रतेने वाटू लागलं. मी घरच्याना तसं सांगितलं आणि सचिनलाही फोन केला आज नको जाऊया म्हणून . मग त्यांनी त्या जिप वाल्याला फोन केला की आमचं जाणं रद्द झालयं .आणि दुर्दैवाने तीच जिप, तीचा तोच ड्रायव्हर, दुपारचीच वेळ आणि महालक्ष्मीच्याच जत्रेला जाताना तीचा खुप मोठा अपघात झाला. आमच्याच गावातली ती फॅमिली होती. आभाळच कोसळलं त्यांच्यावर.

किन्नरी 3..4 महिन्याची असेल तेंव्हाची ही गोष्ट . तीला आमच्या बेडरूम मधे पलंगावर ठेऊन मी किचन मधे काम करत होते. काम आटपून मी तिला पलंगावरून उचलून घेऊन बाहेर आले आणि जोरात आवाज झाला. मी मागे वळून पाहिले तर सिलिंग फॅनचा हुक तुटून फॅन जोरात पलंगावर आपटून खाली पडला होता. बापरे ....देवाच्याच कृपेने मला किन्नरीला उचलून हॉलमधे न्यावसं वाटलं. जर मला दहा बारा सेकंद उशीर झाला असता तर .....

हल्लीचीच गोष्ट आहे. तीन चार वर्षापुर्वीची. आम्ही नेहेमी प्रमाणे होळीला सफाळ्याला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी मुंबई ला यायला निघालो . तांदुळवाडी च्या घाटा पासून वरईला highway लागे पर्यंत दोरीने रस्ता अडवून पोस्त (पैसे) मागणारे गावकरी उभे असतात. सगळ्याच गाड्या अडवतात. 5....10 रूपये दिल्यावर सोडतात. पारगाव ब्रीजवर एका गृपला 50 रूपयेच हवे होते. ते सगळे दारू प्यायलेले होते. आमचं त्यांच्याशी थोडं भांडण झालं . त्यांनी रागानी त्यांच्या कडचे 10 रूपये गाडीत फेकले. मग आमच्या ड्रायव्हरने त्यांना नजुमानता गाडी तिथून काढली. त्यांच्या शिव्या शापांमुळे असेल, मला काहीतरी वाईट होणार असं जाणवू लागलं. आम्ही विरार फाटा क्रॉस केला तेंव्हा 120 च्या स्पिडनी आमची फॉर्च्यूनर होती आणि विरूध्द दिशेला गुजरात कडे जाणार्या रस्त्यावरून एक मारूती सुझुकी डिव्हायडर तोडून आमच्या समोर गोलांट्या खात आली. आमच्या ड्रायव्हर ने कशी गाडी सावरली मला आठवत नाही अक्षरशः देवानीच आम्हाला वाचवलं. आम्हीतर वाचलोच पण त्या गाडीतले लोक पण आमची टक्कर न झाल्यामुळे वाचले. त्यातली माणसं जखमी झाली होती. पण त्यावरच निभावलं. त्यांना बाहेर काढलं आणि ती गाडी पेटली. किती भयानक अपघात झाला असता...

नास्तिक याला योगायोग म्हणतील पण मी देवाचीच कृपा म्हणते.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.