(पडदा उघडतो.. एक २५ - २८ वर्षाची तरुणी आरशा समोर उभी राहून केस विंचरत आहे.. गाणं गुणगुणत आहे.. "सजना है मुझे, सजना के लिये.. सजना है मुझे.. तेवढ्यात दाराची बेल वाजते. ती तरुणी दार उघडते तर दारात एक २७ - २९ वर्षाचा तरुण उभा असतो)

 

प्रवेश १ ला


 

तरुणी     : कोण आपण? कोण हवंय आपल्याला?

 

तरुण      : मला तुमची जरा मदत हवी होती...

 

तरुणी     : हो बोला ना.. अहो पण घरी कुणीच नाहीये..

 

तरुण      : अरे व्वा.. मग बरंच झालं की (असं म्हणत घरात शिरतो)

 

तरुणी     : काय म्हणालात?.. आणि घरात कसे काय शिरता तुम्ही एकदम?

 

तरुण      : अहो मला जे बोलायचं आहे, ते बाहेर उभं राहून बोलण्यासरखं नाही ना..

 

तरुणी     : म्हणजे? हे पहा माझे "हे" आता येतीलच.. तुम्ही आधी बाहेर व्हा पाहू..

 

तरुण      : हे म्हणजे तुमचे मिस्टर का? म्हणजे तुमचं लग्न झालंय? वाटत नाही..

 

तरुणी     : तुम्हाला काय करायचंय? तुम्ही निघा आधी..

 

तरुण      : आणि मी नाही गेलो तर..

 

तरुणी     : तर मी ओरडेन...

 

तरुण      : बरं.. कॅरी ऑन..

 

तरुणी     : तुम्हाला लाज नाही वाटत, एका परस्त्रीशी अशाप्रकारे वागायला?

 

तरुण      : परस्त्री??? (असं म्हणत तो तिला जवळ ओढतो. ती स्वतःला सोडवण्याचा लाडीक प्रयत्न करते..)

 

तरुणी     : सोड ना.. काय करतोयस? सोड ना रे...

 

तरुण      : नाही सोडणार.. काय आहे.. आजकाल मला परस्त्रीयां फार आवडतात..

 

तरुणी     : अच्छा.. फटके हवेत?

 

तरुण      : अअअं.. बरंच काही हवंय..

 

तरुणी     : चल चावट.. सोड ना प्लीझ.. आणि आज उशीर कसा झाला यायला?

 

तरुण      : (मिठी सोडत) अगं आज पुष्कळ काम होतं ऑफिसमध्ये.. इयर एंडिंग आहे ना? हा महिना थोडा टफच जाणार..

 

तरुणी     : ह्ह्ह्ह्हं... पण मी एकटी खुप बोअर होते रे घरी. तु सकाळी जातोस ते संध्याकाळी येतोस.. कामं आटोपली की मला काहीच नसतं. टीव्ही बघून तरी किती बघणार?

 

तरुण      : यस डार्लिंग.. बट.. हा महिना तरी मी पॅक आहे.

 

तरुणी     : ओके.. तसंही हा एकटेपणा फार काळ टिकणार नाही..

 

तरुण      : म्हणजे?

 

तरुणी     : म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, उंटाची मान आणि सश्याचे कान (त्याचा हात धरुन)

 

तरुण      : अगं काय झालंय एवढं.. सांग ना..

 

तरुणी     : सांगते सांगते.. आधी फ्रेश तर होऊन घे..

 

तरुण      : अगं पण आताच सांग ना

 

तरुणी     : सब्र का फल मीठा होता है..

 

तरुण      : बापरे.. बाईसाहेब आज चक्क आनंदात आहेत. म्हणजे काहीतरी खुपच चांगलं घडलेलं दिसतंय.

 

तरुणी     : म्हणजे? तुला काय म्हणायचंय?

 

तरुण      : काही नाही.. जराशी भंकस....

 

तरुणी     : श्श्शी वास मारतोय अंगातून. चल जा फ्रेश होऊन ये. 

 

तरुण      : ह्ह्ह्ह.. आलोच. लव यु.. (असं म्हणत फ्रेश व्हायला जातो)

 

तरुणी     : लव यु टू..

 

 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.