३६ ते ६३


आदित्य आणि संयुक्ता पाठीला पाठ लावून जन्मलेले जुळी भावंडे. पाठीला पाठ लावून जन्मले म्हणूनच काय लहानपणापासूनच त्यांच्यात छत्तीसचा आकडा. आधी लहान होते तेंव्हा एकमेकांपासून वस्तू हिसकावून घ्यायचे.शाळेत त्या दोघांमध्ये सतत तुलना केली जायची त्यामुळे एकमेकांना स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनच बघायची त्यांना सवय झाली.

एकमेकांना भाऊ-बहिणीपेक्षा ते स्पर्धकच समजू लागलेत. संयुक्ताची अभ्यासात फारशी प्रगती नव्हति पण खेळ आणि ते हि टेनिस मध्ये तिचा कुणी हात नव्हता पकडू शकत, आणि आदित्य अगदी त्या उलट होता, तो अगदी पुस्तकी किडा होता.

लहानपणापासूनच्या स्पर्धेमुळे दोघांमध्ये एक अढी निर्माण झाली होती, भावंडातील प्रेम होते त्यांच्यातही पण खोल कुठे तरी दडलेले, प्रकट व्हायचे ते फ़क़्त एकमेकांबद्धलचे हेवे-दावे.

आदित्याची आजी जुन्या वळणाची होती, त्या मुळे ती आदित्य मुलगा नि संयुक्त मुलगी म्हणून दोघांमध्ये सारखी भेद-भाव करायची. संयुक्ताला ती सतत सूचना करायची कि असे बस असे उठ हे कर ते नको करूस आणि आदित्यचे मात्र सारखे लाड करायची. हे बघून संयुक्ता अधिकच चिडायची आणि मग ती जे नाही करायचे ते अजूनच करायची.

आदित्य मुलगा असून हि किती शामळू आहे आणि मी किती बिनधास्त आहे असे दाखवण्याकरिता तिने वेग-वेगळे खेळ खेळायला सुरुवात केली. वयाच्या २० वर्षापर्यंत अशी कुठलीही गाडी सोडली नाही जी ती चालवू नव्हति शकत. कराटे मध्ये च्याम्पियन झाली, घरी आई-आजीला फारसे तिचे वागणे पटत नसे पण बाबांची मात्र लाडकी होती संयुक्ता.

आदित्य हुशार होता, शिक्षण करता करता कॉम्पुटर वर काहीबाही करत असायचा, बर्यापैकी पैसा हि कमवायला लागला. त्याच्याच कॉलेज मधल्या एका मुलीने(सोनिया) त्याला गटवला, संयुक्ताला ती मुलगी मुळीच नाही आवडायची, तिने आदित्यला सांगून हि पहिले पण आदित्य काही ऐकायला तयार नव्हता.

मुळात संयुक्ताला समाजाची कुठलीही चौकट मान्य नव्हति.आदित्य मात्र समाजाचे नियम पळून जगणारा होता.

बाबाच तेवढे संयुक्ताची बाजू घ्यायचे बाकी तिच्या वागण्यामुळे आई-आजी आणि आदित्य तिच्याशी बोलणे टाळयचे. खरेतर तीचे ते बिनधास्त जगणे, स्वतःचे म्हणणेच खरे करणे, स्वतःला हवे तसे जगणे ह्याचे आदित्यला फार आकर्षण होते पण मी एक चांगला मुलगा आहे आणि संयुक्ता पेक्षा जास्त संस्कारी आहे हे दाखवण्याच्या नादात तो आई-बाबा म्हणतील तसाच करायचा.

त्याने स्वतःचे विचार करणे सोडूनच दिले होते आणि आता त्याला ती सवय हि राहिली नव्हति.

काही वर्षांनी आजी गेली आणि आदित्यचा एकमेव आधार उरला तो म्हणजे आई.

आईला आदित्यचे खूप कौतुक होते. कॉलेज संपले, आदित्यला एका चांगल्या software कंपनीत नौकरी मिळाली, संयुक्ता ने मात्र देशोदेशी फिरण्याचा पत्रकार म्हणून कामाची निवड केली.आईला अर्थातच तिची निवड नाही आवडली.त्यावरून तिचे आणि आईचे चांगलेच वाजले आणि संयुक्ताने घर सोडले. बाबा नेहमी प्रमाणे फार काही बोलू शकले नाही. संयुक्ता शहरात असली कि बाबांना आवर्जून भेटायची, आई आणि आदित्य बद्धल विचारपूस करायची. पण बाबांनी किती हि आग्रह केला तरी घरी नाही यायची. आईला हि संयुक्ताची काळजी वाटायचीच, तिची काळजी बडबड करून ती व्यक्त करायची.

२-३ वर्षे निघून गेली, आदित्य त्याच्या कॉलेज च्या मैत्रिणीसोबत (सोनिया) विवाहबद्ध झाला, लग्नाचे आमंत्रण संयुक्ताला दिले होते आणि ती आलीही होती पण सोनिया बद्धल तिचे काही चांगले मत नव्हते,तिने आदित्यला बजावले होते कि हि मुलगी फ़क़्त पैश्या साठी आदित्यशी लग्न करतेय, पण प्रेम आंधळे असते आदित्य ने संयुक्ता चे काहीही ऐकून घेतले नाही.संयुक्ता आल्या पावली निघून गेली. अजून २-३ वर्षे निघून गेलीत. बाबांनी त्यांचे मृत्युपत्र बनवले,त्यात त्यांनी आदित्य आणि संयुक्ता दोघांचे हि नावे अर्धी अर्धी संपत्ती केली होती. आदित्यला ह्या बद्धल काहीही तक्रार नव्हति आणि संयुक्ताला तर काही घेणे-देणे हि नव्हते. ती जगाच्या कुठल्या तरी कोपर्यात आपल्या आयुष्यात मग्न होती. सोनियाला मात्र हे मान्य नव्हते, ती सारखी आदित्यच्या पाठी लागायची कि बाबांना सांग आपले मृत्युपत्र बदलायला, पण आदित्यला बाबांचे संयुक्ता बद्धलचे प्रेम माहिती होते, आणि संयुक्ताला हिस्सा मिळावा असे त्याला हि वाटत होते.त्याने सोनियाला साफ नाही म्हंटले.

आता सोनिया रोज घरात तमाशे करू लागली. रोजंच भांडणे होवू लागली. आणि एक दिवस तर तिने कहरच केला, तिने पोलीस बोलावून आदित्य आणि आई-बाबांना हुंद्याविरोधी कायद्यांतर्गत जेल मध्ये पाठवले, आणि धमकी दिली कि सर्व संपत्ती तिच्या नावावर करावी नाही तर ती तक्रार मागे घेणार नाही.

नेमक्या त्याच दिवशी संयुक्ता शहरात आलेली असते, तीला वर्तमानपत्रात हि बातमी दिसते आणि तिला धक्काच बसतो. ती लगेच शहरातील सर्वात नामांकित वकिलाला पाचारण करते आणि कसे हि करून आदित्य आणि आई-बाबांना बेल मिळवून देते. उलट ती सोनिया बद्धल तक्रार देते.

आदित्यला संयुक्ताचे सोनिया बद्धल केलेले विधान आठवते, त्याला वाटते संयुक्ता आता त्याला खूप सुनावेल, पण तसे काहीही होत नाही. संयुक्ता त्या तिघांना घेवून घरी येते. सोनिया घरी पार्टी करत असते, आदित्य आणि आई-बाबांना रूम मध्ये जायला सांगून संयुक्ता आपला मोर्चा सोनिया कडे वळवते, सर्वात आधी ती तिच्या मित्र-मैत्रीणीना बाहेर काढते. सोनिया खवळते, पण संयुक्ता मोबाईल काढून त्यातले काही फोटो सोनियाला दाखवते, ते बघून सोनियाला धक्काच बसतो.

संयुक्ता: मला माहिती होते कि हा दिवस तू आम्हाला नक्की दाखवणार म्हणूनच मी हे सर्व पुरावे गोळा करून ठेवले होते. आता तू लवकरात लवकर इथून बाहेर निघ नाही तर मी आत्ताच पोलीस आणि प्रेस बोलावून खरे काय ते जगासमोर आणेल.

सोनियाचे लग्न झाल्यावरही तिच्या काही मित्रांसोबतचे अनैतिक संबंध असतात आणि ते सर्व संयुक्ताच्या मोबाईल मध्ये कैद असते.

सोनिया घाबरून निघून जाते. आदित्य, आई-बाबा सर्वच सोनियाच्या वागण्यामुळे दुखी असतात.

संयुक्ता साधेसेच पण चविष्ट जेवण बनवून सर्वांना जेवायला बोलावते. आदित्य त्याच्या खोलीतून बाहेर येत नाही. आई-बाबांचे जेवण उरकून ती स्वतः ताट घेवून आदित्यच्या खोलीत जाते.

आदित्यला वाटते ती आता बोलेल कि मी तुला आधीच सांगितले होते सोनिया चांगली मुलगी नाही आहे पण संयुक्ता असे काही हि बोलत नाही.

संयुक्ता: जेवण करून घे थोडंसं.

आदित्य: मला भूक नाही आहे.

संयुक्ता: असल्या नालायक मुलीसाठी उपाशी राहण्यात काहीही अर्थ नाही आहे.

आदित्य: माझ्यामुळे आई-बाबांना आज हा दिवस बघावा लागलाय ह्याचाच दुखं वाटतंय.

संयुक्ता: जे झाले ते झाले, आता त्याचा विचार नको करूस, सोनिया पासून घटस्फोट घेवून नवीन आयुष्य सुरु कर.

आता मात्र आदित्यचा बांध फुटतो, तो आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो.

आदित्य: माझी चूक झाली गं, तू बोलली होतीस, मी तुझे ऐकायला हवे होते, आपले ते आपलेच असतात.

संयुक्ता आदित्यला कुशीत घेवून त्याला शांत करायचा प्रयत्न करते.

आज प्रथमच ते दोघे भावू-बहिण म्हणून भेटत असतात, स्पर्धक म्हणून नव्हे.

दोघांचे अश्रू त्यांचातील स्पर्धा,द्वंद्व सर्व धून काढत असतात.

आणि उरतं ते फ़क़्त प्रेम.

सोनिया पासून घटस्फोट मिळवून देण्यात संयुक्ता आदित्याची चांगलीच मदत करते, आईला हि आता हि हाताबाहेर गेलेली लेक लाडकी वाटू लागते. बाबांची तर ती नेहमीच लाडकी होती.

आणि पाठीला पाठ लावून आलेली हि भावंडे आता ३६ चा आकडा सोडून ६३ चा आकडा होतात.marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.