shhhh... तिथे काहीतरी आहे

गाडीचे हेडलाईट चालू करत विजयने गावातला रस्ता पकडला...तस पाहिलं तर 8 म्हणजे काही फार अंधार पडण्यासारखी वेळ नक्कीच न्हवती...पण गावाकडे पथदिव्यांची बोंबाबोंब असल्याने आणि रस्त्याचा नीटसा अंदाज नसल्याने विजयचा नाईलाज होता..गाडीचे कल्च दाबून दाबून विजयच्या पायाची नुसती हालत झाली होती...तस उंच,शरीरयष्टीने मध्यम असलेला पंचवीशीतला तरुण होता विजय....knowledge आणि हुशारी या जोरावर त्याने त्याच्या कंपनीत कमी वेळात बरीच प्रगती केली होती..थंड हवेची झुळूक घेत घेत गाडी चालवत तो निघाला होता..खर म्हणजे गावाकडचा झाडा-झुडपंचा रस्ता आणि मस्त हवेची झुळूक या सारखा मस्त मौसम त्याला शहरात शोधून नसता सापडला..शहरातलं busy schedule ला कंटाळून तर तो आला होता गावी 2 आठवड्याची सुट्टी काढून..स्वतःला मुक्त कऱयायला..पण इकडे गावात त्याला जगातून मुक्त करण्यासाठी कोणीतरी बैचेन आहे याची कल्पना ही त्याला न्हवती..कदाचित नशिबात लिहलेल्या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळ आली होती...हो त्याची गोष्टी..ज्या नियतीने अर्धवट सोडलेल्या होत्या...अधुऱ्या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ....

काही अघटीत होन्याची चिन्ह गावात आधीच जाणवू लागली होती...कदाचित कोणतं तरी मोठं संकट!!! त्या संकटाची चाहूल जणू गावातल्या मोठ्या मंडळींना खुणावत होती...गावात माधवा च्या पारावर पुजारी व गावातले वयस्कर जण चिंतातुर होऊन बसले होते..कारण ही तसच होतं..भर दिवाळीच्या दिवशी माणसाचं उग्र वास मारणारं कच्च मांस गावातल्या वेशी पाशी असलेल्या मारुतीच्या मंदिरात सापडलं होत...या आधी पण एक दोन वेळेस माणसाच्या रक्ताचे डाग लोकांना दिसले होते पण कोणी लक्ष न्हवत दिलं ...आज एकदम दिवाळीच्या दिवशी माणसाचं कच्च मांस ते पण मारुतीच्या मंदिरात सापडणं म्हणजे फार मोठी अपशकुनी गोष्ट समजली जात होती..

"अहो हे काम कुण्या पोरा बिराचा भी असू शकल की कुण्या खालच्या जातीवाल्याने केलं असेल काम"गोपाळ शेट बोलला...

"नाही शेट.. हे काम कुण्या गावातल्या पोराचं न्हवं..तुम्ही पाहिलंत की ते मांस...खालच्या जातीवले एवढा माज नाय करायचे"रव्या आपलं मत रेटत बोलला.

"मग तुला काय म्हणयाचिये..तिथं ते माणसाचं मांस कुणी ठेवलं?काय पुलाखालच्याने आणून ठिवल काय?"गोपाळ शेट भडकत बोलला.

पुलाखालच्या च नाव ऐकताच गावातले लोक कुजबुज करायला लागले..पुलाखालच्या भुताच नाव पंचक्रीशीत प्रसिद्ध होत..तिथे काय आहे किंवा नाहीं कोणास माहीत न्हवत पण तिथून गेलेला माणूस परत कधीच आला न्हवता..

"ही यळ आणि ताऱ्यांची स्थिती बघता ...तुम्ही दोघ म्हणता तसं काय बी वाटत न्हाय...ही यळ थोडी जास्तच खराब हाय" कोणत्यातरी जाड पुस्तकातून डोकं बाहेर काढत पुजारी बुआ चिंतातुर होत बोलले.

"खराब म्हंजी?"सरपंच भीत भीत बोलला..

"पुऱ्या गावावर संकट हाय या टायमाला...कोणीतरी जाणार...आणि नुसतं एक दोन जण न्हाय...बरीच जण मरणार ह्या यळेला.सैतानाचा इजय व्हणार..."पुजारी बाबा बोलले..

"मरणार म्हंजी?आणि कौन जाणार ?"गोपाळ शेट चा पांढराफटक चेहरा सर्वांनाच दिसला..भीतीने गर्भगळीत होऊन त्याने विचारलं..

"त्य काय सांगता येणार न्हाय पण..कार्तिक महिना लई खराब हाय सर्वांसाठी...ग्रह काय गावाच्या बाजूनी न्हयाती...शैतानाचा नंगा नाच होणार हाय..कार्तिक महिन्यामधी...रक्ताचा पाऊस दिसतंय म्हयासनी"

पुजारीच हे बोलण ऐकून सर्व जण भीतीने हादरून गेले होते..

"काहीतरी इलाज असलं की पुजारी बुआ..तुम्ही एवढं मोठं भक्त माधावाचं.. काहीतरी इलाज सांगा की"गोपाळ शेट ने विचारलं

"माझी सर्व भक्ती भी म्हया पणाला लावलीया शेट... खरं सांगतु फार वंगाळ हाय ग्रह..एवढं वंगाळ ग्रह म्हया काय माझ्या बा न पण बघितलं नसलं कधी"पुजारी बुवा बोलले...

"आपलं महादेवच वाचवलं तर वाचवलं आपल्याला मग..."गोपाळ शेट बोलला..

"आता त्योच वाली हाय आपला"पुजारी बुआ बोलले..

कार्तिक महिना गावासाठी वंगाळ ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली...बघता बघता थोरली लहान सर्व भीतीने गाराठली..झुंजू मंजू झाल्यापासून ते रात्र होईपर्यंत सर्वच जण एकच विषय चघळत होते..कार्तिक महिना गावासाठी अपशकुनी...मारुतीच्या मंदिरात सापडलेलं माणसाचं कच्च मांस गावात एक भीतीदायक वातावरण तय्यार करून गेला..

अंधारपडण्याधिच गावातलं कट्टे ओसाड पडू लागले.. एकटी दुकटी रात्री शेतात फिरणारी माणसं आता 10 जणांच्या सोबतीने रात्री शेताकडे फिरकू लागली...बाया-पोरांनी रात्रीची शेताची काम तर बंदच केली..गावाचं वंगाळ होणार हा शब्दच गावकरी लोकांच्या हिमतीस पाणी पाजवून गेला...सर्व गावकरी कार्तिक महिन्यात आपलं मरण निश्चित हाच विश्वास घेऊन दिवस काढू लागले...

गावाकडच्या रस्त्याला लागूनही कोणी गावकरी किंवा पत्ते कुटणारी टवाळकी पोरं दिसत नाही हे पाहून विजय आश्चर्यचकित झाला...क्षणभर आपल्याला चकवा मारला नाही ना हा पोरकट विचार ही त्याचा मनात येऊन गेला...पुढच्याच क्षणाला स्वतःवर हसत..त्याने दूर दिसणाऱ्या आमराई वर नजर फिरवली आणि काही दिवसाकर्ता का होईना शहरातल्या धकाधकीतून मुक्त झालो या जाणीवने खुलून गेला..रस्त्याच्या दुतर्फा पळसाची झाडं, गावाकडील शेणाने सारवलेल्या मातीचा सुगंध दरवळला होता..मधूनच रातराणीचा सूगन्ध मनाला नवी तेजना देत होता...एव्हाना गाडीने गावाची वेश ओलांडली व महादेवाच्या पारापर्यंत आली ..

फक्त साडेआठ वाजता सर्वत्र सुतक पडल्यासारखी शांतता आणि निर्मनुष्य महादेवाचा पार विजय ला आश्चर्यचकित करण्यासारखा होता...आपण नक्की आपल्याच गावी आलो ना?की रस्ता चुकला आपला..विजय ही क्षणभर गोंधळून गेला..घराकडचा रस्ता छोटा असलयाने गाडी घरापर्यंत नेहणे शक्य न्हवते..विजयला गाडी मंदिराजवळच पार्क करणे भाग पडले. दोन मिनिटे इकडे तिकडे बघून काही अंदाज लावण्याचा निष्फळ प्रयत्न विजयने केला. शेवटी गाडी पार्क करून विजय घराकडे निघाला.

विजयला बघताच काकांनी विजयच्या हातातली बॅग घेत पाय धुवायला पाणी दिले.

बाहेरची निर्मनुष्य शांतता विजयला घाम फोडणारी होती...त्या शांततेत आल्हाददायक अस काहीच न्हवतं.. होतं फक्त आणि फक्त भीतीदायक गारवा..अगदी थंडीतही नसेल एवढा गारवा..."गावकडे थंडी बरीच आहे की तात्या" विजयने टॉवेलने हात पाय पुसत वाक्य टाकलं..खरतर थंडीपेक्षा गावात एवढी शांतता का आहे हे विचारण्यात विजयला रस होता पण एकदम सरळ गावातले प्रश्न विचारणं विजयला चुकीचं वाटलं..

"इकड झाडं ज्यास्ती हाईत म्हणून लागत असल थंडी..तुम्हा शहरवासियासनी न्हाय जमायची.."तात्या हसत बोलले..

"इथे गावात पण शुकशुकाट आहेच की... ते पण रात्री आठ वाजताच!!!"विजयने मुद्द्याला हात घातला.

गावातल्या शुकशुकाटीचं नाव निघताच तात्यांचा चेहरा थोडा गंभीर झाला.दुसऱ्याच क्षणी सर्व ठीक असल्याचे अविर्भाव आणत तात्या निघून गेले..

तात्यांचे असे हावभाव बघून,कुठेतरी काहीतरी चुकतंय अस विजय ला वाटू लागलं.पण नेमकं काय चुकतंय हे विजयला कळेना..कदाचित आपणच विनाकारण चुकीच्या दिशेने विचार करतोय अस वाटून विजयने मनातला विचार झटकून टाकला..

रात्री जेवण करून झोप कधी लागली हे कळलंच नाही..सकाळी डोळा उघडला तेव्हा कसल्यातरी आवाजाने जाग आली...आवाज ओळखीचे होता पण शब्द थोडे भीतीने थरथरले होते... कोणीतरी ओरडत ओरडत सांगत होत

"म्हया तिकडं वंगाळ पाहिलं..त्या...त्या... शेटच... भूत!!!"

"काय?चल कुठे हाय.. दाव महायसनी"विजय बोलला.तेवढ्यातच विजयला पलीकडून एक भली मोठी काळी आकृती समोर येताना दिसली..दोन तीन मिनटं विजयला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना..आपण काहीतरी विचित्र बघत आहोत... असं वाटू लागलं..

ती विचित्र आकृती विजय जवळ येऊ लागली तसं तसं अंग एकदम गार पडल्यासारखं वाटू लागलं..ती आकृती जवळ येऊन गळा पकडणार तोच...विजय झोपेतून ताडकन उठून बसला...भीतीने एकदम पाय खालची जमीन हदरल्यासारखी वाटली क्षणभर...आणि अंग अजूनही तसच गार पडल्या सारख होतं..दोन मिनिटं तसच बाजेवर बसून राहिल्यावर..विजयने तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर निघतो तोच आणखीन एक आवाज आला..

"आव ह्या गरीब पोरासनी कशाला बोलावलं तुम्ही इथं...गावात काय चालुये माहीत आहे न व तुम्हांसनी..ह्याच काही झालं तर...आधीच गावात लै वंगाळ बघायला मिळतंय ह्या" रव्या बोलला..

"आरं म्हाला काय याड लागलय का?ह्यासनी इथं बोलवायला..ह्य स्वतः इथं आलंय.."तात्या बोलले

"काय!!! स्वतःसनी आलं म्हंजी? ह्यला काय सपान पडलंय व्हय" रव्या बोलला

"मग काय सांगतुया तुला ..आर किती टायमाला नग नग म्हणायचं..असं भी ह्यो वाडा.. ही जमीन ह्याचाच नावावर ह्या की..मला कस जास्त जमल न्हय म्हन्याया"तात्या बोलले..

"काय त्या महादेवाच्या मनात हाय न तेच समजना झालंय...ह्या पोरासनी काही झालं म्हंजी"रव्या काळजी पोटी बोलला

"त्यो महादेव च हाय..त्यो करील ह्याच रक्षण"तात्या बोलले..

विजय ने तात्या आणि रव्याच सर्व बोलणं

दरवाज्या मागून कानोसा घेत ऐकलं,म्हणजे गावात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे..त्याला आता कळून चुकलं होत की काल पर्यंत त्याला वाटणारी शंका ही फक्त शंका न्हवतीच...कसल्यातरी अज्ञात शक्तीने त्याला दिलेला एक संदेश होता...म्हणजे ते स्वप्न पण

अनाहूत शक्तीचा संदेश होता???विजयला काही कळेना

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.