कालचक्र

माझ्या टेबलवर पडलेल्या अर्जांची छाननी करून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या इंटरव्हूसाठी नावांची यादी बनवायची होती.एक एक पाकीट उघडून मी अर्ज वाचत होते.शेजारी आमच्या कॉलेजची पेपरात दिलेली जाहिरात होती.त्यानुसार योग्य असलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तपासून मी अर्ज हातावेगळे केले.शेवटचा अर्ज उघडला,

नाव:सुरेखा जोंधळे,वय:२१ वर्ष,बी ए,एम.सि.ए.,typing:५० WPM. अर्जाच्या मागे लावलेला फोटो पाहिला.तरतरीत मुलगी नजरेत भरली.तिला इंटरव्हू लेटर पाठवाव की नाही अश्या द्विधा मनस्थितीत होते करण कामाच्या अनुभवात तिची पाटी कोरी होती.पण ईश्वरी संकेत असावा,माझ्या सहयोगीने तिला इंटरव्हू लेटर पाठवून दिल.

सुरेखा आमच्या कॉलेजला लागली तेव्हा २१ वर्षांची होती.नुकतीच पदवी परीक्षा पास झालेली!सर्व उमेदवारात वयाने लहान आणि अनुभवानेही.तरीही तिची झालेली निवड सगळ्यांच्या कुतुहुलाचा विषय होता.तिचा इंटरव्हू घेताना प्रत्येकाला जाणवलं कि भले हिच्याकडे कामाचा अनुभव नसेल पण कमालीचा शांतपणा आणि सहनशक्ती होती. पॅनलमधे अननुभवी मुलीला घेण्याबद्दल मतभेद होते.पण शेवटी majority wins या उक्तीनुसार तिची निवड झाली.

“गुड मॉर्निंग,madam”

एरवी मी सर्वांच्या आधी ऑफिसला पोहोचणारी,स्वभावान कडक !! आज माझ्या आधी सुरेखा हजर .मी टेबलावर नजर फिरवली.दोन छान सजवलेल्या छोट्या फुलदाण्या दिसल्या.

“सॉरी,मी तुमची परवानगी न घेताच ठेवली फुलं.म्हणजे फक्त माझ्या टेबलवर ठेवण बर दिसलं नसत म्हणून...”

माझी नजर तिच्या टेबलवर गेली.तिथेही असेच सजवलेले फ्लॉवर पॉट होते. सुरुवातीला मला ती आगाऊ वाटली पण तिच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून मनातलं मळभ किंचित मावळल.

“आपलं ऑफिस ९ वाजता सुरु होत”,मी पर्स टेबलवर ठेवताना तिचं निरीक्षण केलं.

“हो,ठाऊक आहे.पण मी रोज लवकरच येईन.”

“का?”

सुरुवातीला प्रामाणिकपणा सिद्ध करायचा आणि मग खरे रंग दाखवायचे,यातली तर ही नव्हे?माझ्या मनात किंतु डोकावला.

“कल्याणहून मुंबईला येणाऱ्या गाड्यांना नंतर गर्दी होत जाते ना,म्हणून मी लवकर येईन.आणि त्यामुळे कधी लवकर जावं लागलं तर तुम्ही नाही म्हणणार नाही.” ती गोड हसली.बोलण्यात बरीच हुशार होती.संभाषण चालू असताना मी तिचं निरीक्षण केलं.

शिडशिडीत बांधा,त्यामुळे उंची बेताची असली तरी उंच भासली.रेशमी,स्टाईलमधे कापलेले केस,निमगोरा रंग,लक्षवेधक तपकिरी-भुरे डोळे,लांब पापण्या आणि सुरेख भुवया.नावाप्रमाणे सुरेखा होती! कपडे साधे पण शोभणारे,माफक मेकप.

“madam,मला म्हात्रे सरानी कामाची कल्पना दिली आहे.जे शिकायचय आणि जे येतय,त्याची मी लिस्ट केल्येय.”तिच्या बोलण्यान माझी तंद्री भंगली.

हळूहळू आमची वेवलेन्ग्थ जुळली .सुरेखा कामात तरबेज झाली.काम उरकण्याचा तिचा झपाटाही भलताच होता.दिवसभराच काम ती अर्ध्या दिवसात उरकायची ते ही चूक न करता!!सुरेखाला कॉम्पुटरची आवड होती.मी तिला बऱ्याच गोष्टी शिकवल्या.माझं ओफिस बाहेर असण बरच वाढलं होत.कॉलेजात फी घेण्यासाठी क्लार्क स्टाफ आळीपाळीन बसायचा.एक दोनदा उपस्थिती कमी असल्यान मला बसावं लागलं.

“सुरेखा madam नाही आल्या आज?”

“अरे यार,उद्या येतील त्या तेव्हाच भरुया फी”,कोलेजच्या शेवटच्या वर्गातील मुलांचे डायलॉग कानावर आले.सुरेखा कमी वेळात popular झाल्याची कुणकुण लागली होती,ती खरी होताना दिसली.काही ना काही तरी कारण काढून मुल तिच्या आजूबाजूला घोटाळत होती.सुरेखाही समवयस्कर मुलांकडे आकर्षित होत होती.तिला कामावर ठेवल्याबद्दल मला पुन्हा शंका येऊ लागली.

अलीकडे सकाळच्या वेळात मला outdoor visit होत्या.मी दुपारी जेवायला परतू लागले.माझ्या टेबलवर फोन होता.ऑफिसमधला स्टाफ कधीतरी तिथून फोन करायला यायचा.सुरेखाच फोनवर बोलण वाढल्याच माझ्या कानावर आलं.

“सुरेखा, काही प्रॉब्लेम झालाय का?”

ती चपापली.”नाही madam,असं का विचारताय?”

“एक दोनदा तुला फोनवर बोलताना पाहिलं तेव्हा वाटलं.”

“ताईचं अलीकडेच लग्न झालंय.तिची खुशाली विचारण्यासाठी फोन करते.आईबाबा पण वाट पाहतात तिच्या फोनची.रात्री पोहोचायला उशीर होतो म्हणून दिवसा बोलते तिच्याशी.”माझा संशय निवळला.

बाहेरची काम कमी होत गेली.मला ऑफिसमधे वेळ मिळू लागला.सुरेखाच कामातल लक्ष उडत चालल्याचं जाणवलं.ती चिडचिडी झाली होती.खेळकर स्वभावात बदल झाला.मी बाहेर जाण्याची ती वाट पाहते हे जाणवलं.मलाही तिचा राग येऊ लागला.मी गुपचूप टेलिफोन एक्स्चेंज मधून कॉल रेकॉर्ड मागवले.एका विशिष्ट नम्बरशी सतत बोलचाल चालू होती.

“सुरेखा,हल्ली आपलं फोन बिल वाढलं म्हणून कॉल हिस्टरी आणली.सगळ्या नंबरचा छडा लागला पण एक नंबर कुणाचा ते कळत नाहीये..”

नेम बरोबर लागला.नंबर वरून कॉल येणजाण बंद झालं.सुरेखाच माझ्याशी वागण बदललं.मी काही वरिष्ठांशी बोलून तिला माझ्या केबिन मधून बाहेर ऑफिसमधे ट्रान्स्फर केलं.आमच्यातला संवाद कमी झाला.

परिस्थितीन यू टर्न घेतला.सुरेखाचं लग्न ठरलं.फोन वर बोलणाऱ्याशी!! तो तिच्या ताईचा सख्खा दीर निघाला.सुरेखान पहिला पेढा आणून माझ्या हातात ठेवला.

आमचा संवाद पुन्हा सुरु झाला .फक्त एक गोष्ट पूर्वीसारखी होत नव्हती.सुरेखा वेळेवर ऑफिसला येत नव्हती.

“सुरेखा,उद्यापासून नवीन अॅडमिशन सुरु होतील.नऊ वाजता फीचा काउंटर उघडायचं,”मी आडवळणानं तिला वेळेवर यायला सांगितलं.त्यानंतर सुरेखा वेळेवर ऑफिसला येऊ लागली.मात्र क्वचित तिचं लक्ष फोनवर असायचं.लॅंडलाईन चा वापर कमी होऊन मोबाईल आल्यामुळे फोनवर बोलल्याचे पटकन कळेनासे झाले.नव्या लग्नाची नवलाई म्हणून सगळे तिला चिडवायचे,ती खुश व्हायची.मी मात्र तिला कामात चुका काढून खजील करायचे.आमच्या दोघींच नात टॉम आणि जेरी सारखं होत!!!

तिच ऑफिसला वेळीअवेळी येण सुरु झालं.सुरुवातीला सारवासारव करणारी सुरेखा घाबरलेली दिसू लागली. सुरेखा कारण काढून दांडी मारत होती.मी एक दोनदा विचारलं तर नवऱ्याची तब्येत बिघडली आहे,असं मोघम उत्तर मिळालं.

सुरेखान एक महिन्याच्या सुट्टीचा अर्ज टाकला.मी चिडले.’नवऱ्याला आतड्याचा क्षयरोग झालाय.ऑपरेशन करायचय.’ कारण कळल्यावर माझा नाईलाज होता. जाताना तिनं पगाराचा अॅडवान्सही घेतला.त्या नंतर मी दुप्पट कामात गुंतले.सुरेखाच्या नवऱ्याचे ऑपरेशन झाल्याचे कानावर आले.पुढे औषधपाण्यासाठी सुरेखान रजा वाढवली.तीही पत्र पाठवून.मला तिला निवडल्याचा पश्चाताप होऊ लागला.कामाचा व्याप वाढला आणि शेवटी सुरेखाला टर्मिनेशन लेटर पाठवलं.सुरेखान मला फोन केला.मी उचलला नाही.मग मेसेज आला.,

“madam,मला माहिती आहे की काहीही अनुभव नसताना तुम्ही मला नोकरी दिलीत.मला शिकवलत.तुमचे उपकार मी विसरणार नाही.”यथावकाश मी सुरेखाला विसरले.

माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला त्या दिवशी अस्वस्थ वाटत होत.त्यान ऑफिसला फोन केला.काम बाजूला ठेवून आम्ही त्याच्या ऑफिसला पोहोचले.आमच्या फॅमिली डॉक्टरांनी जवळच्या स्पेशीयालीटी हॉस्पिटलला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला.आम्ही तातडीन हॉस्पिटल गाठलं.डोक्यात रक्ताची गुठळी आहे,लगेच ऑपरेशन करावे लागेल.पैशाचा प्रश्न नव्हता.पण डॉक्टरांना संपर्क होत नव्हता.

“,डॉक्टरांच्या सेक्रेटरी इतक्यात येतील,त्या मदत करतील.”ड्युटीवरच्या नर्सन मला धीर दिला.माझ मन थाऱ्यावर नव्हत.सेक्रेटरी आमच्यासाठी देवदूत होता.डीपोझीट ठेवायला पैसे कमी पडत होते,मी तिच्या नवऱ्याला ICUत भरती करून तिला धीर दिया.आणि ATM मधे पैसे काढायला गेले.येऊन पाहते तो डॉक्टर येऊन ऑपरेशन सुरु झाले होते.

“सेक्रेटरी आल्या का?”जवळच्या टेबलवर बसलेल्या वॉर्डबॉयला विचारलं.

“हो,त्यांनी आपल्या जवळच्या नंबरवरून डॉक्टरांना फोन लावला.ते दोन बिल्डींग सोडून रहातात.लगेच येऊन त्यांनी थिएटर तयार करायला सांगितलं.

“मी भेटू शकते का त्या सेक्रेटरींना?”

“डॉक्टरांच्या शेजारच्या केबिन मधे आहेत त्या?’ मी मैत्रिणीला बसवून,केबिनचा दरवाजा नॉक केला.

“कम इन’

दरवाजा ढकलून मी आत गेले.सेक्रेटरी madam पाठमोऱ्या फोनवर बोलत होत्या.मी त्यांच्या वळण्याची वाट पाहिली.

त्या वळल्या आणि .......

समोर सुरेखा नजरेला पडली.माझ्या तोंडून शब्द फुटेना.

“या,madam,बसा ना.पाणी घ्या.” माझी अवस्था पाहून सुरेखान मला पाण्याचा ग्लास दिला.मी चुपचाप खुर्चीत बसले.

“मिस्टर दवे सुरक्षित हातात आहेत,डॉक्टर त्यांना बर करतील.trust me.”

“thank you,पण तू इथे?”

“madam,माझा लहानपणापासून देवावर अपार श्रद्धा आहे.एके काळी त्यांनी तुमच्या रुपात मला दर्शन दिले.नंतर डॉक्टरांच्या रुपात.”

माझा गोंधळलेला चेहरा पाहून ती पुढे बोलू लागली.

“तुम्ही मला काही अनुभव नसताना काम दिलत.मला कामावरून कमी करण,ही तुमची मजबुरी होती.माझा नवरा सिरीयस होता.त्यावेळी डॉक्टर माझ्यासाठी देव बनून आले.नवरा बरा झाला.डॉक्टरांनी मला नोकरी दिली.मगाशी अॅडमिशन फोर्मवर तुमच नाव वाचल.”

“आणि तरीही मला मदत केलीस?”

सुरेखा ओळखीच गोड हसली.

“माणस वाईट नसतात,परिस्थिती माणसाला चांगल-वाईट बनवते.आणि परिस्थिती सतत बदलत राहते.मला कामावरून काढल्याबद्दल मी तुमच्यावर राग नाही धरला कारण मुळात कामावर ठेवणाऱ्याही तुम्हीच तर होतात.”

“मला माफ कर सुरेखा,मी वाईट वागले तुझ्याशी,पण आज तूच धावून आलीस मदतीला.”सुरेखान पढे होऊन माझे खांदे दाबले.मी मन मोकळ करून तिला मिठी मारली.हार मानण्यातही सुख असत,हे त्या क्षणी मला जाणवलं.आयुष्यातल्या त्या प्रसंगानंतर चांगुलपणावरचा माझा विश्वास दृढ झाला.....

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.