काय असते प्रेम ?


 

प्रेम म्हणजे दिसण्या पेक्षा असण्यावर केलेले प्रेम ,मनानी मनावर केलेले प्रेम ,काल मुंबई च्या मरीन ड्राईव्ह समुद्र किनार्यावर वर बसलो होतो.संध्याकाळची वेळ भरपूर गर्दी जादा करून कपल ,सगळ्या वयोगटातील कोणी चालण्यासाठी आले कोणी वेळ घालवण्यासाठी .इकडे बसलेल्या जोड्या काय करतात हे तर बोलयला नको आणि त्या कडे फारसे कोणी लक्ष देत पण नाही .अचानक सिगरेटचा वास आला.आमचा पासून काही अंतरावर एक जोडी बसली होती आणि तो मुलगा स्मोक करत होता .तो आमच्या बाजूने होता त्या मुळे त्याच्या बरोबर जी मुलगी होती ती दिसत नव्ह्ती.हातात हिरव्या बागड्या दिसल्या म्हणजे बायको असावी असे वाटले काय आहे मुंबईत छोटी घरे म्हणून अनेक कपल बसतात असी .

अचानक माझी मुलगी बोलली तो स्मोक करत आहे आणि ती काही का बोलत नाही त्याला ?
तिला कसे चालते हे ?पण अचानक एक गोष्ट लक्षात आली ते असे बसले होते कि आजूबाजूला कोणी नाहीच आहे .स्वतः मध्ये गुगुन गेले होते ते आणि जाणारे येणारे थाबुन त्यांना बघत होते लोक असे का बघत आहे लक्षातच नव्हते येत .गाव कडून फिरयला आलेली एक मोठी family त्यात जादाकारून बायका होत्या .अगदी डोक्यावर पदर मारवाडी किवा गुजराथी असावे एक एक बाई या जोडी कडे अजीब नजरेनी बघत होते पण त्या नजरेत काय हे लोक असे भाव नव्हतेच .
मला काही समजतच नव्हते कारण असा अजून जोड्या होत्या ना तिकडे .
आणि अचानक तो मुलगा उभा राहिला आणि मला ती दिसली .
सावली म्हणता येणार नाही असी जवळ जवळ काळी,आणि मेन म्हणजे चेहरा एक साईड ने भाजल्या सारखा खूप एका हात वर आणि पाया वर कोड चे डाग.आणि मला क्षणात समजले लोक असे का बघत होते.
पण मला फक्त एक जाणवले त्याचा साठी ती खूप सुंदर होती.
त्याचे तिच्या असण्या वर प्रेम होते ,दिसण्या वर नाही .

त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि दोघे चालायला लागले आणि दिसेनासे झाले .


 

marathi@pratilipi.com
+91 9969484328
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.