आठवण पहिल्या प्रेमाची


“ बेस्ट ऑफ लक तनु ” .

“थँक यु, सेम टु यु, चल बाय म्ह्णत तनुने दरवाजा उघडला आणि बाहेर आली. संध्याकाळ झाली होती आज तिने खुप वेळ पेपरची तयारी केली होती. क्लास समोर लावलेली सायकल हातात घेवुन तिने रस्ता क्रॊस केला, एकदा मागे वळुन पाहिलं आणि निघाली. “शेवटी बोललाच नाही तो आज सुध्दा”, तनु मनातल्या मनात म्हणाली.

आता प्रेक्टीस साठी क्लासला येणारे फ़ारसे कॊणीच राहिले नव्ह्ते, तिच्या जवळपास सगळ्या मैत्रिणींची परीक्षा झाली होती. नावाच्या इनिशिअल प्रमाणे परीक्षा होत्या त्यामुळे अंजली ,गिता ,प्रीती सर्वांनतर तिचा नबर आला होता. आता फ़क्त ती, स्नेहा आणि विजय तिघेच राहिले होते. स्नेहाला बोलुन ती क्लास मधुन बाहेर आली .

जवळ्पास चार महिने झाले होते क्लास सुरु होऊन, तिची व विजयची भेट होऊन आणि आज शेवटची भेट होती. भेट म्ह्णजे काय फ़क्त एकेमेकांना पाहणं. तिला आजही आठ्वते त्यांची पहिली भेट, तेव्हा जवळपास पंधरा दिवस झाले होते क्लास सुरु होऊन, क्लास मधे त्याचा मस्त ग्रुप झाला होता. त्या दिवशी सर त्यांना परीक्षा पॅटर्न समजावुन सांगत होते. “तुमचा पेपर mcq पॅटर्न मधे असेल म्हणजे एक प्रश्न आणि चार पर्याय, जसे अमिताभ केबिसी मधे विचारतो ना तसेच ”. “ सर आता अमिताभ नाही शाहरुख खान आहे केबिसी मधे”, तनु खोडकरपणे पटकन बोलली.

“हां....शाहरुख खान”, सर म्हणाले आणि सगळेच हसायला लागले. तनुच्या बेंच वर एका कोप-यात बसलेला एक मुलगा वाकुन तिच्याकडे पाहत होता, तनुने पण त्याच्याकडे पाहिले , ‘हा कोण नविन आलाय’ तनुला वाटलं. क्लास संपवुन तनु आणि अंजली बाहेर आल्या तेव्हा आकाश सोबत तो पण उभा होता, पण काहीच बोलला नाही.

तनु क्लास मधली सर्वात लहान, अभ्यासात हुशार आणि एक गोड मुलगी होती. सड्पातळ बांधा ,लांब केस नेहमी जिन्स पॅन्ट मधे येणारी तनु क्लास मध्ये सर्वांनाच आवडायची. अंजली तिची क्लास मध्ये बेस्ट फ़्रेंड झाली होती. रॊज घरी जाताना त्या दोघी सोबत जायच्या. अंजली आणि तनु एकाच कांप्युटर वर प्रक्टिस करायच्या.

एके दिवशी तनु सायकल लावुन ,क्लास च्या आत आली आणि समोरच तिला तो बसलेला दिसला, क्लास मध्ये प्रॅक्टीकल साठी मुली आतल्या खोलीत बसायच्या आणि मुले बाहेरच्या खोली मधे. विजयने तनुकडे पाहिलं, तनुने पण त्याच्याकडे पाहिल आणि ती आत जाण्यासाठी निघाली, विजय एकटक तिच्याकडे बघत होता. तनु अगदी आत जाइपर्यंत तो एकटक तिच्याकडे पाहत राहिला. तनु पट्कन आत आली ,“हुश्श ,काय होत हे, असा का बघत होता तो ”. “काय गं काय झालं?” अंजली म्हणाली. “ नाहि काही नाही ”.

क्लास झाल्यावर अंजली सोबत तनु घरी निघाली, तो क्लास च्या बाहेर उभा होता , तनुने त्याच्याकडे पाहिले तो तिच्याचकडे पाहत होता. त्याच्या डोळेत एक शांतता होती. आता हे रोजचच झाल होत तो रोज बाहेर थांबायचा आणि फ़क्त दुरुनच तनुकडे पाहायचा . तसा तो दिसायला खुप साधा होता. छोटीशी दाढी, उंची पण फ़ार नाही, हातात नेहमी एक वही.

त्याच्या डोळ्यात वेगळीच शांतता होती, तो नेहमी शांत असायचा कोनाशी जास्त बोलायचा नाही. सगळे बोलताना तो आपला शांत कोपर्यात उभा असायचा. तिला पण कधी त्याच्याशी बोलायची गरज पडली नाही. त्याच नाव सुध्दा तिला नोटिस बोर्ड वर पाहिल्यावर कळालं होत.

तनुला तो आवडायला लागला आणि त्याचे ते शांत डोळे. माहित नाही कसे पण तनु आता त्याच्या प्रेमात पडली होती, तिच पहिल प्रेम. एकदा क्लासमधे लाईट गेला होता कांप्युटर बंद झाला होता, तनु keyboard वर टाईप करायला लागली V I J A Y , तिला इतका आनंद झाला, नंतर पट्कन घाबरुन आजुबाजुला पाहिलं कि कोणी आपल्याला बघितल तर नाही ? पण कोणाच लक्ष नव्हत. अंजली पण गप्पांमध्ये व्यस्त होती. तिने काचेमधुन पलिकडच्या रुममधे बसलेल्या विजयला पाहिल. तो तिच्याकडेच बघत होता. ती पट्कन वळाली. “बापरे, त्याला कळाल कि काय ?” .

पहिल्या पहिल्या प्रेमाच्या अनुभवाने तनु आनंदात होती. असेच दिवस जात होते आणि आज शेवटचा दिवस आला. आज तिची खूप इच्छा होती कि त्यानी तिला बोलावं .सकाळी घरून निघताना तिला वाटलं होत कि निदान आज तरी त्यांची ओळख होईल, बोलणं होईल, पण असं काहीच झालेलं नव्हतं. आणि या पुढे आता आपली त्याच्याशी भेट होणार नाही या गोष्टींमुळे ती जास्त अस्वस्थ झाली होती तिला खूप वाईट वाटत होत कारण आजची शेवटची संधी होती, उद्या फायनल एक्झाम होती आणि परावापासून क्लास बंद. दिवसभर तिला वाटत होत कि तो आता बोलेल, मग बोलेल पण तो बोललाच नाही. दिवस भर तिने वाट पहिली त्याच्या बोलण्याची प्रॅक्टिस पण झाली होती बरीच आणि आता संध्याकाळ पण झाली होती खूप उशिर झाला होता तिला . शेवटी कंटाळून ती घरी जायचा निघाली जाण्याची तयारी करत असताना त्यानी पाहिलं होत तिला , तिनेही पाहिलं त्याच्याकडे “कदाचित शेवटची भेट असेल आपली ” तिनी डोळ्यांनीच सांगितलं त्याला.

घरी येताना तिच्या मनात हेच सुरु होत. का बोलला नसेल तो, त्याच प्रेम नसेल का ? मिच पागलासारखी वागत होती. दिवस जात होते. कॉलेज अभ्यास यात तनु बिझी झाली. कधीकधी तिला आठवण यायची त्याची, कितीही झाल तरी वयाच्या सतराव्या वर्षीच तिच ते पहिल प्रेम होत.

आज जेव्हा तिला ते दिवस आठ्वतात तेव्हा तिच्या मनात विचार येतॊ की तेव्हा जर ते एकमेकांशी बोलले असते तर……. काय झालं असतं? ति तर त्याच्याप्रेमात पुर्ण बुडाली होती, जरीही त्याच प्रेम नसलं असत तिच्यावर तरीही तो सहज तिला फ़सवु शकला असता कोणी दुसरा असता तर त्याने नक्कीच तिचा फ़ायदा घेतला असता पण त्याने असं काहिच केल नाही .त्याच्यामुळे तनुचं पहिलं प्रेम कायम एक चांगली आठवण म्ह्णुन राहिल. त्याच्या डोळ्यातली शांतता खंरच त्याच्या मनाचा आरसा होता.

आज विजय तिच्या समोरुन जरी गेला तरी ती त्याला ओळखु शकणार नाही .
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.