अबोलं प्रेम-भाग १

आज बहुतेक आपली शेवटची लोकल ट्रेन चुकणार,असा विचार करतच सारंग आपला डेस्क आवरत असतो.आज खूप काम होतं त्यामुळे सारंगला ऑफिसमध्ये नेहमीपेक्षा जास्त वेळ थांबावं लागलं होतं.कशीबशी तो ऑटो पकडतो आणि स्टेशनला पोहोचतो, पाहतो तर त्याची नेहमीची लोकल गेलेली असते.शेवटी निराश होवून सारंग पुढच्या लोकलची वाट पाहात तिथेच थांबतो.तेवढ्यात सारंगची नजर हि लेडीज डब्ब्याच्या इथे उभ्या असलेल्या एका अनोळख्या मुलीकडे जाते,तेव्हाच तीच लक्ष सुद्धा त्याच्याकडे जाते.पण काही क्षणातच लोकल ट्रेन चा होर्न वाजतो आणि त्यामुळे ते दोघे भानावर येतात.सारंग लगेच ती लोकल पकडतो आणि आपल्या घरी निघून जातो.
दुसऱ्या दिवशीही सारंगला उशीर होतो आणि त्यामुळे आजही त्याची ठरलेली लोकल चुकते.योगायोग म्हणजे आजही तीच अनोळखी मुलगी सारंगच्या नजरेस पडते.सारंग तिच्याकडे बघत आहे हे तिला कळतं,पण तिच्या नजरेत सुद्धा काही वेगळेच भाव असतात.दोघेही डोळ्यांच्या भाषेने एकमेकांशी बोलत असतात, त्यामुळे २-३ लोकल जातात तरी त्या दोघांना कळत नाही.शेवटी तिच्या लक्षात येत कि खूप उशीर झालाय,म्हणून ती लगेच पुढच्या ट्रेन मध्ये चढते.सारंग सुद्धा मग त्या लोकलमध्ये चढतो.ट्रेनमध्ये सुध्दा दोघांच्याही मनात एकमेकांचेच विचार चालू असतात.हळूहळू सारंग आपली नेहमीची लोकल सोडून त्याच लोकल साठी थांबू लागतो.तीसुद्धा रोज त्याचीच वाट बघत असते.रोज त्याच जागेवर, त्याच वेळी दोघे सुद्धा न चुकता उभे असतात.एकमेकांकडे पहात डोळ्यांनीच खूप काही बोलत असतात.आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात.पण स्वतःहून बोलण्याचा पुढाकार कोणीही घेत नाही.असेच काही दिवस जातात सारंग ला सुद्धा तिच्याशी बोलायचं असत आणि तिलाही सारंग शी बोलायचं असत,पण आधी बोलणार कोण? हाच प्रश्न दोघांच्याही मनात येतो.
एकेदिवशी नेहमी प्रमाणे सारंग आपली लोकल सोडून तिची वाट पाहत थांबलेला असतो,कारण अजून ती स्टेशनला आलेली नसते.शेवटी ती अनोळखी मुलगी येते,तिला बघताच सारंग चा चेहरा खुलतो.ती येताच सारंग च्या बाजूला येवून उभी राहते.ती एक चिठ्ठी सारंगला देते आणि पुढच्या येणाऱ्या लोकल मधून ती निघून जाते.काही क्षण सारंगला काहीच कळत नाही कि नक्की काय घडलं.सारंगचं त्याच्या हातातल्या चिठ्ठीकडे लक्ष जातं,तो चिठ्ठी वाचतो.चिठ्ठीमधला मजकूर वाचून अचानक सारंगच्या चेहऱ्यावरील भावचं बदलून जातात,कारण अनपेक्षित असं काहीतरी त्या चिठ्ठीत असतं.

नक्की त्या चिठ्ठीत काय असतं?त्या अनोळखी मुलीला सारंगला त्या चिठ्ठीमधून नक्की काय सांगायचं असतं? सारंगच्या चेहऱ्यावरील भाव का बदलतात? हे सर्व कथेच्या पुढील भागात.....!!!!
कथेचा उर्वरित भाग लवकरच...

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.