१०

           जयचंद बॉडीलेसची वाट पाहून थकला. पण बॉडीलेस काही त्याला न्यायला आला नाही. आणि असं प्रथमच घडत होतं. या पुर्वी असं कधी घडलं नव्हते. काय कारण असावं ? कदाचित बॉसला ही जागा माहीत नसावी. हो, हेच कारण असावं. पण आता इथून सुटका कशी होणार ? कारण मी कुठं आहे, हे जसं त्याना माहीत नाही, तसं मलाही माहीत नाही. मला कुठं आणलं ते ? कारण मला इथं आणताना माझे डोळे बांधले होते, शिवाय माझा मोबाईल सुध्दा माझ्या हातून हिचकावून घेतला. त्यामुळे मला बळीशी संपर्क साधता येत नाहीये. काय करू ? कसा पलायन करू इथून ? काहीच कळत नाहीये. इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसा तो सावध झाला. आक्रमण करण्याचा त्याने पवित्रा घेतला. पण आत येणारा दुसरा कुणी नसून पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर होता. चयचंदकडे पाहत हसून बोलला," मग कसं वाटलं बीन भाड्याच्या खोलीत ? म्हणजे ढेकणानी चांगले स्वागत केलेच असेल तुझं! हो की नाही ? " जयचंदला त्याचा भयंकर राग आलेला असतो. पण तरी देखील रागाला आवर घालत म्हणाला," तुमच्या पाळलेल्या ढेकनानी चांगलं स्वागत केलं की आमचं ! त्या बद्दल आभारी आहे,मी तुमचा ! दु:ख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की त्या बदल्यात मी तुम्हांला काहीच देवू शकलो नाही. "
       " हरकत नाही पुढच्यावेळी द्या. पण आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.बरं. "
        "कोणत्या प्रश्नाचे ? "
        " प्रश्न जूणाच आहे. उत्तर मात्र चालू काळाचे आहे."
        " म्हणजे?"
        "  म्हणजे तुझा बॉस बॉडीलेस कोण आहे ?"
        " अहो साहेब, एकच प्रश्न हजारवेळा विचारलांत तरी त्याचे उत्तर बदलणार आहे का ? नाही ना ?"
       " तुला आपलं उत्तर बदलायलाच लागेल. नाहीतर----"
       " नाहीतर काय ?"
       " तुझ्या सुंदर बायकोचं तुझ्या मृत्यू नंतर काय होईल. याचा विचार केलाहेस का तू ?"
       " म -म - मला कोण मारणार ?"
       " कोण म्हणजे ? आम्ही मारणार, कारण तुला पकडून इथं कोंडून ठेवलं आहे, हे कुणालाच माहीत नाही, म्हणजे तुझ्या बॉसला देखील नाही."
       " माझा बॉस मला शोधून काढल्या शिवाय राहणार नाही."
       " शोधलं त्याला जाते,जो हरवला आहे."
       " म्हणजे ? मी समजलो नाही."
       " हे बघ. आपण पोलीस स्टेशनला तक्रार कधी करतो. जर माणूस घरात उपस्थित नसेल तर ! बरोबर ना ? पण जर त्या जागी दुसरा  म्हणजे त्याचा डुबलीकेट जर त्याच्या जागी असेल, तर कोण कशाला तक्रार करील. नाही का ?"
      " म्हणजे माझ्या जागी माझ्या सारखा दिसणारा दुसरा माणूस पाठविला तुम्ही ?"
      " येस, माय ब्रदर !"
      " नाहीss खोटं बोलताय तुम्ही ! होय ना ?"
      " नाही मी खरं तेच सांगतोय विश्वास नसेल, तर हा व्हीडीओ पहा !" असे बोलून त्याने आपल्या मोबाईल मधला व्हिडीओ दाखविला मोबाईल मधला व्हिडीओ पाहून तर जयचंदच्या पाया खालील जमीनच सरकल्या, त्याला भास झाला. तो गयावया करत बोलला," माझ्या बायकोला काही करू नका. "
       " आम्ही काहीच नाही करणार. जे काय करायचं ते तुझी बायकोच करील. किती खूष होती ती आमच्या डुबलीकेट बरोबर. आता पाहीलेस ना तू ?"
       " तिला माहित नाही की तो तिचा नवरा नाहीये."
       " आणि माहित झालं तरी ती त्याचाच स्विकार करेल. कारण तू नायकीनीच्या नादाला लागला आहेस. त्यामुळे ती तुझी कशाला वाट पाहील?"
       " म्हणजे तिनं तुम्हांला सर्व सांगितलं ?"
       " हां ! आणि आता तू पण खरं काय ते सांगून टाक. नाहीतर बायकोही गेली. आणि नायकीनही !"
     " साहेब माझ्या बायकोला अपवित्र नका करू ,मी तुमच्या पाया पडतो. "
     " नाही करणार , पण तू आमचं ऐकलेस तर !'
     " मी तुमचं सर्व काही ऐकेन. "
     " गुड ! मग आता मला हे सांग,की हा बॉडीलेस कोण आहे ?"
     " साहेब खरंच मला माहीत नाही. आणि मलाच काय आमच्यापैकी कुणालाही ते माहीत नाही."
     " बरं इन्स्पेक्टर श्रीकांत कुठं आहे? ते तरी सांगू शकशील?" जयचंद होकारारथी मान डोलवत बोलला," हो !'
      " मग मला हे सांग बरं की,पो. इन्स्पेक्टर श्रीकांतला कुणीं मारले ?"
      " त्याला बॉडीलेस ने ठार मारले."
     " बब्बरचा मृतदेह इस्पितळातून कुणी गायब केला ?"
     " ते आम्हाला पण माहीत नाही. "
     " बरं तुमच्या पैकी कुणाला माहीत असेल का ? बॉडीलेस बद्दल काही माहिती?"
      " असा एकच व्यक्ती आहे की त्याला सर्व काही माहीत असेल."
     " कोण आहे तो व्यक्ती ?"
     " बळी साहेब. "
     " असं का वाटतं तुला ?"
     " कारण बॉस बळीलाच जास्त मानतो. आणि त्या आधीचा बॉस सुध्दा बळीलाच जास्त भाव द्यायचा, म्हणून मला काय वाटतं साहेब बॉडीलेस दुसरा कुणी नसून बब्बर बॉसच आहे म्हणजे त्याचं भूत आहे."
     " असं का वाटतं तुला ? "
     " कारण त्याच्या सर्व सवयी बॉडीलेस मध्ये आहेत."
     " म्हणजे बब्बर सारखं काय काम करतो तो ? नाही म्हणजे त्याच्या सारखी एखादी सवय सांगा."
     " एखादी सवय म्हणजे बघा बब्बर बॉस कोणतही महत्वाचे काम बळीलाच सांगायचा तसाच बॉडीलेस बॉस सुध्दा बळीलाच सांगतो. शिवाय त्याच्या हाताखाली आम्ही सर्वानी काम करायचं कोणतीही तक्रार न करता.  मग मला सांगा बळीलाच का सर्व अधिकार दिले जातात. ? तसं पाहायला गेलं तर तो आमच्या गैंगचाही माणूस नाही म्हणजे काना मागून आला नि तिखट झाला. नाही का ?"
       " एक सेकंद  तू आता काय म्हणालास ?'
       " हेच की बळी आमच्या गैंगचा माणूस नाही म्हणून."
       " तुमच्या गैंगचा माणूस नाही म्हणजे कुठून आला तो ?
तेव्हा मग बळी बब्बर बॉसला कुठे आणि कसा सापडला या बद्दल सविस्तर माहिती दिली. ती माहिती ऐकल्यानंतर पो. इन्स्पेक्टर अर्जुनची पण खात्री झाली की बळीच दोन वर्षापूर्वी समुद्रात लाकडी फलाटावर बेशुध्द अवस्थेत सापडलेला दुसरा कुणी नसून सायंटिस्ट विश्वजीतच असावा. कारण दोन वर्षापूर्वीच सायंटिस्ट विश्वजीत विमान अपघातात मरण पावला. अशी बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळाली होती. याचा अर्थ सायंटिस्ट विश्वजीत जीवंत आहे, परंतु त्याचा स्मृतीभ्रश झाला असल्याने त्याला पुर्वीचं जीवना बद्दल आठवत नाही.
       पण तो दिसतोय कसा ? हे कुणाला ठाऊक आहे ? हयाला विश्वजीतचा फोटो दाखवून विचारू का ? नाही नको. त्यापेक्षा आपण राणेनाच विचारू त्यानी पण तर बळीला पाहीलं असेल ? हो ! असंच करतो ? तेवढ्यात जयचंद विचारले," काय झाले साहेब ? तुम्हांला अजून खरं वाटत नाही का ?"
     " छे, छे,छे ! तसं नाही काही. "
     " तुमचा विश्वास बसला ना माझ्या बोलण्यावर ?"
     " अजून नाही तू सांगतोयेस ते खरंय का खोटं हे मला पडताळून पहावं लागेल. "
     " अवश्य पहा ! मी सांगितलेल एकेक शब्द खरा आहे."
     " ठीक आहे, ते खरंय का खोटं ते नंतर ठरवू ! अगोदर मला स्वतःची तर खात्री करून घेऊ दे. "
      " साहेब, आता मला सोडा ना,तुम्हांला हवी असलेली माहिती मी दिली ना ,मग आता मला सोडायला काय हरकत आहे. "
      " जोपर्यत बॉडीलेस पकडला जात नाही. आणि त्याचं खरा चेहरा जगापुढे येत नाही, तोपर्यंत तुला कुठंच जाता येणार नाही. "
       " पण साहेब माझी बायको सुरक्षित नाहीये, म्हणून मला घरी जाऊ द्या ना. प्लीज !"
      " तुझ्या बायकोला तो अजिबात स्पर्श करणार नाही, याची हमी मी देतो तुला. "
     " साहेब तो  मनुष्य माझ्या बायकोला स्पर्श करणार नाही ही गोष्ट जरी खरी असली तरीही ती त्याला ओळखत नाहीये. अर्थात ती त्याला मी आहे, असं समजून  मिठी मारली, तर काय होईल. याची मला कल्पना सुध्दा करता येत नाहीये. म्हणून मी काय म्हणतोय,मला घरी जाऊ द्या. मी कुणालाच काही सांगणार नाही. "
      " नाही. तुला कुठेही जाण्याची परवानगी नाही. "
       " फक्त एक दिवसासाठी तरी सोडा. मी फक्त तिला एकदा भेटून येतो. नाही म्हणू नका सर. प्लीज !"
       " ठिक आहे, पण फक्त एकदाच ! आणि ते पण पोलिसांच्या देखरेखेखाली कळलं. "
      " हो, चालेल. " जयचंद उद्गारला. आणि त्यानंतर पोलिसांच्या देखरेखेखाली जयचंद आपल्या पत्नीला भेटायला गेला. पण त्यापुर्वी पो. इन्स्पेक्टर अर्जुनला फोन करून सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना थोड्या वेळासाठी तेथून निघून जायला सांगितले होते. त्यानंतर स्वतः साध्या वेषामध्ये त्याचा साहेब बनून त्याच्या घरी गेले. तेव्हा ललिता एकटीच घरात होती आपल्या नवऱ्या सोबत एका अनोळखी व्यक्तीला पाहून ती जरा बावरली. पण लगेच जयचंद त्याची ओळख आपल्या कंपनी मधले साहेब आहेत, अशी ओळख करून दिली. त्यानंतर तिने त्याचे व्यवस्थित आधरातिथ्थ केले. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि निघताना जयचंद पो. इन्स्पेक्टर अर्जुनकडे पाहत म्हणाला," साहेब मला जरा आपल्या पत्नीशी एकांतात बोलावयाचे आहे, परवानगी आहे का तुमची ?"
      " अर्थातच !"
त्यानंतर जयचंद आपल्या पत्नी सोबत आतल्या खोलीत गेला नि ललिताला विचारले," ललिता ह्या काही दिवसा मध्ये मी तुझ्याशी कसा वागलो?"
     " कसे वागलात ते तुम्हांला माहीत नाही आहे. का ?"
     " तसं नाही गं म्हणजे नेहमी तुला शिव्यागाळी करायचा तुझा स्पर्शही मला झालेला चालत नसे, म्हणून मी तुला विचारतोय. या दोन चार दिवसात माझ्याकडून काही असभ्य वर्तन घडलं का?"
       " अजिबात नाही. उलट या चार दिवसात तुम्ही इतके छान वागता की काय विचारू नका.म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आता एका विवाहीत पुरूषा सारखे वागता. पण अजून ---?
      " पण अजून काय ?
      " आता कसं सांगू तुम्हांला ?"
      " का ? सांगायला काही संकोच वाटतोय का ?"
      " हा ना? "
      " असं काय केलं मी ?"
      " तुम्ही काही नाही केलेत हो ?"
       " मग संकोच का वाटतोय तुला सांगायला ?'
       " नाही म्हणजे आपल्याच तोंडानं कसं सांगू?"
       " म्हणजे असं काय आहे न सांगण्या सारखं ?"
       " मला म्हणायचं होतं की, आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली ,पण अजून आपल्या घरात पाळणा  हलला नाही.
अजून किती वाट पाहायला लावणार आहात मला?"
       " म्हणजे?"
      " तुम्ही मला स्पर्शच करत नाही, मग ते होणार कसं ?
      त्यासाठी काही ....पुढचं न बोलता लाजली. नि म्हणाली," मी नाही सांगणार मला  बाई लाज वाटतं. तुम्ही समजून जा ना. "
       जयचंद समजून चुकला की, आपल्या पत्नीला काय म्हणावयाचे आहे ते, आणि आपली पत्नी पवित्र असल्याचही सिद्ध झालं, तसा तो खूष होत बोलला," ही तुझी इच्छा लवकरच पुर्ण होईल फ़क्त अजून काही दिवस तरी तुला वाट पहावी लागेल. "
      " मी जन्मभर वाट पाहायला तयार आहे."
      " हे ऐकून मला फार बरं वाटलं "
      " झालं बोलून, तर बाहेर चला. कारण तुमचे साहेब बाहेर एकटेच बसले आहेत. त्याना काय वाटेल ?  म्हणजे हे बरं दिसत नाही ना ?"
      " बरोबर आहे तुझं, चल जाऊ बाहेर. " असे म्हणून दोघेपण बाहेर आले, तसे पो. इन्स्पेक्टर अर्जुन मिश्किलपणे हसून म्हणाले," आता पटली का खात्री ?" जयचंद खाली मान घालत म्हटले ," हो! " त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला," मग आता निघायचं ना ?" जयचंदने फक्त होकारार्थी मान डोलविली. त्यानंतर दोघेही मोटार मध्ये बसले निघाले. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला," आता तरी तयार आहेस ना ? पोलिसांची मदत करायला ?"
       " पण साहेब मी अजून पोलिसांची मदत काय करणार ? मला जेवढे माहीत होते, तेवढे मी सांगितलं तुम्हांला. "
      " सर्व नाहा सांगितलेस ?
       " म्हणजे ?"
       " बॉडीलेसच्या सवयी कशा आहेत ? म्हणजे बब्बर बॉस साऱख्या का इन्स्पेक्टर श्रीकांत सारख्या ?"
        " साहेब तुम्हांला एकदा सांगितलं ना की, त्याच्या साऱ्या सवयी बब्बर बॉस सारख्या वाटताहेत. "
       " शोहर. "
       " येस सर ! "
       " ठीक आहे, तू जर हे खरं बोलत असशील, तर तुला आम्ही  माफीचा साक्षीदार, म्हणून कोर्टात उभे करू . मग कोर्ट तुझी बाकीची शिक्षा माफ करेल. मग तू आपल्या पत्नी सोबत वैवाहिक जीवन जगू शकशील."
       " खरं सांगता साहेब ?
       " एकदम खरं !"
       " पण साहेब मला इतकेच माहीत होते तुम्हांला. जर जास्त माहिती हवी असेल, तर ती फक्त बळीच देऊ शकेल."
       " ठीक आहे , पण तो कुठं भेटेल तेवढं सांग."
       " तो कुठं राहतो ते कुणालाच माहीत नाही , पण तो तुम्हांला एका ठिकाणी नक्की सापडेल. "
      " सांग. कुठं सापडेल?'
      " मयुरबार तिथं तो नेहमी येतो. "
      " तिथं यायचं कारण?"
      " ते माहीत नाही. पण तो तिथच येतो. "
      " ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते. " असे बोलून जयचंदला अज्ञात स्थळी पोहोचवून पोलीस स्टेशनला येऊन विश्वजीतची अपघातवाली फाईल बाहेर काढायला लाविली. त्यानंतर त्याच्या नावावरून त्याच्या आधार कार्डचा नंबर शोधून काढला. आणि त्यानंतर सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना फोन करून पोलीस स्टेशनला बोलवून त्याच्याशी विचारविनमय केला. तेव्हा सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे बोलला ," जयचंदच्या म्हणण्या प्रमाणे जर बब्बर बॉडीलेस, तर त्याने दोन वर्षे का वाट पाहीली. कारण बळी दोन वर्षापूर्वीच समुद्रात एका तूटलेल्या जहाजाच्या फलाटावर बेशुध्द अवस्थेत सापडला होता ना, मग तेव्हाच काही विश्वजीत ने बनविलेल्या फार्म्युलाच्या वापर का नाही  केला ? का दोन वर्ष वाट पाहत राहीला ?"
      " खराय तुमचं ! सोन्याचं अंड देणारी कोबंडी मिळाल्यावर कोण कसा गप्प राहील?" पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर बोलला.
       " मला काय वाटतं माहीतेय ?"
       " काय वाटतं ?"
       " मला वाटतं आपण संशयाला पात्र ठरू नये, म्हणून कदाचित तो दोन वर्ष गप्प बसला असेल ?"
       " तसंही असेल बहुधा! पण तरी दखील एक प्रश्न उरतोच की, त्याला कसं समजलं त्याला सापडलेला मनुष्य विश्वजीतच आहे."
       " कदाचित त्याने वर्तमानपत्रात विश्वजीतचा फोटो पाहीला असावा. "
      " हां हे होऊ शकतं. "
      " होऊ शकतं नाही असंच झालं आहे. "
      " असेल ही!  पण आपण ते सिद्ध कसं करणार ?
       " त्यासाठी त्याला अगोदर पोलीस कस्टडीत घ्यावं लागेल. "
      " आणि काय विचारणार त्याला ? तो काही सांगण्याच्या मनस्थीत आहे का ?"
        ओशाळून बोलला," अरे, हो ! विसरलोच मी त्याचा स्मृतीभ्रश झालाय. नाही का?"
       " म्हणूनच मी काय म्हणतोय अगोदर आपण तो खरोखर विश्वजीतच आहे, किवा नाही, हे शोधून काढू. "
       " पण कसं ?"
       " हाताच्या ठशावरून."
       " अरे, हां ही सर्वात बेस्ट आयडीया ! हो की नाही ?"
       " मी त्याला बीयरबार मध्ये घेऊन येतो. तेथे तू सुध्दा साध्या वेषात हजर रहा. मग पुढं काय करायचे ते तुला माहीत आहेच ! " पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने होकारार्थी आपली मान डोलविली. आणि राणेंचा निरोप घेतला.
         त्यानंतर ठरलेल्या प्लँन नुसार ते दोघेही बीयरबार मध्ये आले. आधी ठरल्या प्रमाणे वेटरला कोल्ड्रिंगची ऑर्डर दिली.
वेटरने ऑर्डर प्रमाणे दोन कोल्ड्रिंग च्या बाटल्या टेबलावर आणून ठेविल्या. त्यातील एक बाटली बळीने उचलून घेतली नि दुसरी परत घेऊन जा म्हणाला.तेव्हा जयचंद बोलला,
     " का ? तू नाही पिणार ?" तेव्हा बळी म्हणाला," मला सर्दी झाली आहे. तेव्हा मी काहीच पिणार नाही तू पी. " असे बोलून ती बाटली परत जयचंदकडे दिली. पण जयचंद बाटली हातात न घेता म्हणाला," तुला नको तर मला पण नको. त्या पेक्षा आपण दुसरं काहीतरी खायला मागवू."असे म्हणून तो वेटरला हांक मारत असतानाच बळी बोलला," एक सेंकद हां मला कुणाचा तरी कॉल येतोय. " असे म्हणून तो तेथून उठून बाहेर गेला. त्यांच्या मागच्या टेबलावर साध्या वेषात बसलेला पो.इन्स्पेक्टर अर्जुन जयकर उठून जयचंद जवळ येतो नि  जयचंदच्या टेबलावर असलेली कोल्ड्रिंग ची बाटली हात रूमालाने पकडली. नि तेथून निघून गेला. तसा जयचंद [राणे ] उठून बाहेर आला. तेव्हा त्याने पाहीलं की बळी फोनवर कुणाशीतरी बोलत होता. थोड्यावेळाने फोन कट करून त्याच्या जवळ येत म्हणाला," सॉरी यार, जयचंद! मी तुझ्या सोबत नाश्ता नाही करू शकत. मला ताबडतोब निघायला हवं.बॉसने बोलविले आहे एकदम अर्जड!"
        " काही हरकत नाही पुन्हा केव्हातरी ! " असे म्हणून पुढं मनात म्हणाला," आमचं काम तर झालचं आहे, आता नाही भेटलास तरी हरकत नाही. "
         त्यानंतर जयचंदशी हस्तांदोलन केलं. आणि तेथून निघून गेला. तसा पो. इन्स्पेक्टर अर्जुन सस्पेंड पो.वीरेंद्र  राणेच्या जवळ येत म्हणाला," काम फत्थ झालं एकदा रिपोर्ट हातात आला म्हणजे बळीला घेतो, पोलीस रिमांड मध्ये. दोघांनाही वाटत होते की, रिपोर्ट पॉटिव्ह येणार, म्हणून दोघेही फार खुशीत होते. अर्धी लूढाई आपण जिंकलो. असेच दोघानाही वाटत होते जणू ! पण जसा रिपोर्ट हातात आला, तसा दोघांचाही हिरमोड झाला. अर्थात दोघांचीही अपेक्षा भंग झाला. रिपोर्ट मध्ये असं सिद्ध झालं की हे ठशे एकाच व्यक्तीचे नसून दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे आहेत. अर्थात बळी विश्वजीत नसल्याचा सिद्ध झालं. त्यामुळे दोघांनाही मोठा धक्का बसला. असं कसं होऊ शकतं. शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की, बळी फक्त विश्वजीत सारखा फक्त दिसतो. पण तो विश्वजीत नाही, पण काही जणाचा म्हणणे असे होते की, मग दोघांचा अपघाताचा वेळ एकच कसा ?     त्यावर उत्तर असं होते  की, हा केवळ योगायोग असू शकतो, तर काहीजणाचे म्हणणे असे होते की, समुद्रात लाकडाचे फलाट कुठून आले ? तर त्याच उत्तरे असे आहे की, काही दिवसापूर्वी समुद्रात वादळ झाले होते. आणि एक जहाज खडकावर आधळून फुटले होते. त्या जहाजातले सर्व खलाशी पाण्यात बुडृन मरण पावले होते. कदाचित त्यातला हा एकादा खलाशी वाचला असावा. नशीब असतं एखाद्याचं! पण न जाणो, पो. इन्स्पेक्टर अर्जुनला अजूनही असं  वाटत असतं की बळीच विश्वजीत नाही, तर त्याने बनविलेला फार्म्युला बॉडीलेस कडे आला कसा ? सर्वच गोष्टी तर योगायोगाने जुळून येऊ शकणार नाहीत; परंतु खोटं तरी कसं म्हणावं ? कारण खोटं ठरवायला काहीतरी
पुरावा हाती लागायला हवा ना,जसं की बाप दाखव नाहीतर श्राध्द कर,अगदी तशीच अवस्था झालीय आपली. काय करावं कसं सिद्ध करावं की, ज्याला तुम्ही बॉडीलेस समजताय, तो बॉडीलेस नसून सायंटिस्ट विश्वजीत आहे, किवा त्याने बनविलेला फार्म्युला आहे ? पण हे कसं सिद्ध करणार ? खूप विचार करूनही त्याच्या प्रश्नाचे उत्तर जसं मिळालं नाही. तसा तो, स्वत:शीच उद्गारला ," आता एकच मार्ग बळीची गेलेली स्मृती वापस आणणं, तेव्हाच या प्रश्नाचे उत्तर सापडेल.
           असा विचार करून तो एके दिवशी बळीला बोलला,     " बळी तू कुठं राहतोस, हे सांगितले नाही कुणाला ? आणि कधी कुणाला बोलविलेसही नाही आपल्या घरी! का बरं?"
       " माझ्या घरी आहे कोण तुमचं स्वागत करायला ? येऊन जाऊन मी एकटा तो पण घरी कधी असतो, तर कधी नसतो. मग मला सांग कसं कुणाला बोलविणार ? पण तुला यायचं असेल, तर येऊ शकतोस तू माझ्या बरोबर."
         " आताच येऊ का?"
         " तुझी इच्छा! मला काहीच प्रॉब्लेम नाही." तेव्हा जयचंद [ राणे ] मनात म्हणाला, हीच संधी योग्य आहे,बळी स्मृतिब्रश झाल्याचा नाटक तर करत नाही ना हे पाहण्यासाठी ! आजच मला त्याच्या घरी जाऊन पाहायला हवं ! काहीतरी पुरावा आपल्या हाती लागतो का? असे मनात बोलून पुढे स्वरात म्हणाला,
         " ठीक आहे,चल येतो मी तुझ्या बरोबर."
         त्यानंतर दोघेही निघाले.बळीच घर एका गलिच्छ वस्तीत असतं, दहा बाय दहाची खोली होती.एक लोखंडी खाट होती ,त्यावर गादी अंथरलेली होती.एका बाजूला मोरी [ बाथरूम ] होती.आणि किचनमध्ये गॅस होती; पण तिचा कधी वापर केला गेला, असं वाटत मात्र नव्हतं.सर्व गोष्टीचं निरीक्षण केल्यावर जयचंद ने विचारले,जेवण वगैरे तू घरीच बनवितोस का बाहेरून ----? " त्यावर बळी बोलला," छे', छे, छे ! एकटयासाठी कोण एवढ्या उचापती करील, बाहेरून मागवतो मी जेवण,तुझ्यासाठी मागऊ का काही?"
         " नाही नको, मला काहीच नको. "
         " का रे ?"
         " किती घाणेरड्या वस्तीत राहतोय रे तू ?"
          " त्याचं काय मला माझ्या आई-वडिलांना शोधावयाचे आहे आणि ते अशाच गलिच्छ वस्तीत सापडतील.कारण बंगल्यात राहणारी माणसं रस्त्यावर कधीतरी दिसतात."
         " पण तुला असं का वाटतं की तुझे आई- वडील गलिच्छ वस्तीत रहात असतील.बंगल्यात रहात असतील तर ?"
         " मी जर श्रीमंत घरात जन्माला आलो असतो, तर वर्तमानपत्रात माझा फोटो छापुन आला नसता का ? हरवला आहे म्हणून.आणि मी श्रीमंत माणसाचा मुलगा असतो तर जहाजावर खलाशयाचं काम का करायला गेलो असतो."
          " पण तुला असं का वाटतं की तू त्या जहाजावर एका खल्याश्याच काम करत असशील ? मोठ्या पदावर पण तर असू शकतोस ? आणि मला तर त्या जहाजावरचा
खलाशी नाहीयेस."
         " मग कोण आहे मी ?"
         " नाही म्हणजे असं वाटतं की तू ..." बोलता-बोलता बोलायचा मध्येच थांबला.आणि विषय एकदम चैंज करत म्हणाला," "बळी तुला खरंच माहीत नाही की, तू कोण आहेस ते ?"
         " म्हणजे काय .....तुला काय वाटतं मी नाटक करतोय ?" किचिंत राग व्यक्त करत म्हटले,
          " तसं नव्हतं म्हणायचं मला. "
          " मग काय म्हणायचं होतं तुला?"
          " मला एवढंच म्हणायचंय की आजूबाजूच्या एरियात फिरलं पाहीजे म्हणजे, तुला ओळखणारा कुणीतरी भेटेल. "
         " तो ओळखेल रे, पण मी कसं ओळखणार त्याला ?"
          " हं s हे बाकी खरं ! मी काय म्हणतो तू  सायंटिस्ट डॉ. विश्वजीतच नाव ऐकलेस का कधी ?"
          " हो! ऐकले ना, बरंच लोकांचं म्हणणं आहे की, मी त्याच्या सारखा दिसतो, म्हणून. "
          " हो खरं आहे ते. "
          " पण फक्त दिसून काय उपयोग रे ,त्याच्या साऱखे गुण, पण तर पाहीजेत आपल्या अंगात ?'
           " तू कधी स्वतःला  पारखून पाहील का ? म्हणजे एखादा त्याच्या सारखा गुण तुझ्यात पण असू शकतो. किवा एखाद्यावेळी तूच तो विश्वजीत असलास तर ?"
           " अरे, तसं असेल, तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. पण दुसऱ्याशी नकल करून  फक्त परिक्षेत पास होता येतं. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्यवान होता येत नाही. मुळात  ते गुण आपल्या अंगी असावे लागतात. कळलं. "
         " पण मी काय म्हणतो खऱ्या खोट्याची शहा-निशा करून बघायला काय हरकत आहे?"
         " मग त्यासाठी काय करायचं म्हणतोयेस?"
         " मी काय म्हणतो आपण एक दिवस विश्वजीतच्या गावाला जाऊन येऊ. "
        " कशासाठी ?"
        " अरे, तिथला परिसर तिथला माणसं पाहून तुझी स्मरणश्क्ती वापस आली तर!"
        " म्हणजे तुला अजूनही वाटतं की मी विश्वजीत आहे ?"
        " राग नको मागूस. पण तूच  विश्वजीतच आहेस.असं मला वाटतं."
        " असं वाटण्याचं कारण ?"
        " आता तूच विचार कर. ज्या दिवशी विश्वजीतच्या विमानला अपघात झाला. त्याच दिवशी तू देखील बेशुध्द अवस्थेत बब्बर बॉसला सापडलास! हा योगायोग कसा काय होऊ शकतो ? नाही म्हणजे, एकाच चेहऱ्याची माणसं दोन्ही ठिकाणी कशी असू शकतील ? शिवाय विश्वजीतने बनविलेला फार्म्युला आपल्या बॉसला कसा सापडला ? त्यामुळे मला काय वाटतं माहीतेय तू उंचावरूनू खाली पडल्यामुळे तुझीे स्मरणशक्ती गेली. आणि नेमका त्या गोष्टीचा फायदा बब्बर बॉसने घेतला. आणि तू बनविलेला अदृश्य होण्याचा फार्म्यला वापर करून  तो आता आपल्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवतोय. "
        " पण बब्बर बॉसला तर पो. इन्स्पेक्टर श्रीकांतने ठार मारलं ना?"
         " असं आपल्याला वाटतं; पण ते सारं बब्बर बॉसचं नाटक होतं, नाहीतर मला सांग इस्पितळातुन बब्बर बॉसची बॉडी कुठं गायब झाली ? आणि कोणी केली?"
        " तुम्हारी बातो मे बहुत दम है गुरू मैने कभी सोचाही नही की, ऐसा भी हो सकता है।
          " म्हणून तुला मी सांगतोय की, आपण दोघं तुझ्या गावाला जाऊ तिथली लोक आणि तिथला परिसर पाहून जर तुझी स्मरणशक्ती वापस आली, तर बब्बर बॉसचं आपण पीतळ उघडं पाडू !"
           " ते कसं ?"
           " अरे, म्हणजे बघ तुझी स्मरणशक्ती जर वापस आली, तर बॉडीलेसचा वीक पॉइंड तुला माहित असेलच, कारण तूच तो फार्म्युला बनविला आहेस. होय ना?"
           " अगदी बरोबर बोलतोयेस तू. "
           " हो, ना मग जायचं ना गावाला?"
           " येस माय फ्रेड !" पण काहीतरी आठवलं, तसं तो उदास स्वरात बोलला ," अरे आता लगेच शक्य नाही होणार, गावाला जायला ?
           " का ?"
         " अरे का म्हणजे काय बॉसने आपल्याला दिलेलं काम आपण अजून केलंच नाही. आणि अशा परिस्थिती मध्ये गावाला जायचं म्हटलं, तर आपल्या जीववावरच बेतेल ते. "
         " अरे, दोनच दिवसाचा तर प्रश्न आहे तू काहीतरी कारण सांगून दोन दिवसाची सुट्टी घे ना. तुला बॉस नाही म्हणणार नाही. "
        " अरे, पण आपण कुठं चाललो आहे, हे आपल्या बॉसला माहीत पडलं तर ?"
          " गावाचं नाव सांगाय  आणि कुठं जातो असं विचारले तर?"
        " तर सांगायचं गोव्याला चाललो, म्हणून, तसं पण आता नाताळ सुरु आहे, त्यामुळे आपली ही थाप पचून जाईल. "
       " अरे ,वा ! तुझ्याकडे तर सर्व गोष्टीचं सोल्यूशन आहे. "
       " मग फायनल ना ?"
       " येस माय डीअर फ्रेड ! "
        असे बोलून त्याने लगेच आपला मोबाईल बॉडीलेस बॉसला मेसेज केला की, नाताळ सणाच्या निमित्ताने मी आणि जयचंद गोव्याला जात आहोत. दोन दिवसात परत वापस येऊ ? परवानगी आहे का ?
       लगेच बॉडीलेसचा मेसेज आला -ओके! एन्जॉय द ख्रिसमस ! गॉड ब्लेस यू!"
          मग काय दोघानीहा हातावर हात मारून टाळी दिली. आणि एकनेकाना कडकडून मिठी मारली.
       " कधीची गाडी पकडायची?" बळीने विचारले. त्यावर जयचंद म्हणाला," आजच रात्रीच्या गाडीने म्हणजे, कोकण कन्याने राजापूला जाऊ. "
         " राजापूरला गाव आहे का ते?"
         " हो !"
         " काय नाव त्या गावाचं?"
          " नाणारगांव. "
          " ठीक आहे, आजच निघू तू आपल्या घरच्यांची परवानगी घेऊन ये. "
           " परवानगी घ्यायला आहे कोण घरी ?"
          " का ? तुझी बायको कुठं गेली. "
          " बायको ना मा--- पटकन खरं बोलून जाणार होता की, माझी बायको बाळंतपणाला माहेरी गेली आहे, म्हणून पण चटकन ध्यानात आलं तसं विषयातंर करून म्हणाला," बायको ना दोन दिवसासाठी माहेरी गेली आहे, तिचे वडील आजारी आहेत म्हणून. "
           " मग हरकत नाही दोन दिवसानी येतोच आहे आपण. नाही का ?"
          " येस येस !" जयचंद फक्त इतकेच बोलला.
त्यानंतर जयचंद आपल्या घरी आला. पो. इन्स्पेक्टर अर्जुनला आपल्या प्लँन विषयी सविस्तर माहिती दिली. नि ठरल्या प्रमाणे रात्री ठरल्या दोघेही दादर स्टेशनला कोकण कन्या एक्स्प्रेस मध्ये बसले.

क्रमश:

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.