आजचा दिवस त्यांच्यासाठी खुप महत्वाचा होता. महिन्यातील महत्वाची मीटिंग आज सुरु होणार होती. आपले ईप्सित गाठायला सर्वांचीच खुप लगबग सुरु होती. सगळ्यांनी महिनाभर आपला प्रोफाइल अपग्रेड करायला खुप मेहनत घेतलेली तरीही कोण नक्की ध्येयपूर्ती करणार ह्यासाठीची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होतीच. मीटिंगची वेळ खुप उशीरा असल्याने प्रत्येकाने आपापल्या कर्तुत्व कौशल्याचा पुनः एकदा आढावा घेतला. काहीही झालं तरी आज मीच बाजी मारणार हा विश्वास तेथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात भरून राहिला.
ह्यावर्षी प्रमोशन नक्की असल्याने अवंतिकाने कसलीच रिस्क घ्यायची नाही हे ठरवत आपल्या लाडक्या नवऱ्याला तृप्त मनाने झोपलेला पाहुन रात्री उशीरा हळूच आयपील घेतली अन् आजही संधी हुकल्याने सर्वांचा पुनः एकदा हिरमोड झाला.
― अंबज्ञ
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
लेखक - योगेश जोशी
संपर्क - ambadnya123yogesh@gmail.com