अति लघु कथा

1) कुंडली जुळविण्या पेक्षा.......

                        रिमा हॉस्पीटल मध्ये शेवटच्या घटका मोजत होती .   तिचे आई बाबा तिच्या छोट्याश्या मुलीला घेऊन भेटायला यायचे. दुरून बघायचे. तिला खूप वाटायचे की मुलीला जवळ घ्यावे. जाता जाता खूप लाड करावा. पण तस करू शकत नव्हती. कारण ती एचआयव्ही बाधित  होती .तिच्या नवर्‍याचा एचआयव्ही ने मृत्यू झाला होता अणि तिला एचआयव्ही चे दान देऊन गेला होता.  तिच्याकडे सगळे तिरस्काराच्या नजरेने पहायचे . तिला वाटायचं आपण कुठल्या पापाची शिक्षा भोगतोय.

              तिला तिच्या लग्नाचे दिवस आठवले . किती चांगली चांगली स्थळ आली होती. पण आई बाबांनी पत्रिका जुळत नाही म्हणुन नाकारली . पत्रिका जुळवण्यापेक्षा रक्त तपासणी केली असती तर. रिमा च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

2) योग्यता


चहा न आवडल्यामुळे रोहित नी कप फेकला. ऑफिस चा राग तो घरी काढत असे. त्याला वाटायचं बॉस त्याला डावलून त्याच्या सहकाऱ्याला संधी देते. काचेचा आवाज येताच पीयू, धावत आली.
आई ,बाबा किती वाईट.
नाही बेटा.अस नाही म्हणायचं... . मागच्या डांस कॉम्पिटिशन मध्ये तुला न घेता काव्या ला घेतले तेव्हा तू टेडी फेकला होता ना.  तसच काहीस बाबांच आहे.
        तेव्हा तू म्हणाली होती की  आपण आपली योग्यता कामातून दाखवून द्यावी. काव्य तुझ्यापेक्षा छान डांस करीत असेल म्हणुन घेतल.  बघ मी डांस शिकले अणि  सिलेक्ट पण झाले .
रोहित ला आपली चूक कळून चुकली.
"Sorry पिऊ. रीमा, मी चांगला नवरा नसेल कदाचित पण चांगला बाबा होऊन दाखवेल"


3)कर्तव्य


               रिया, श्रेया या जुळ्या बहिणींना  शाळेत स्कूल डे बक्षीस    मिळणार होते . सेनेमध्ये कर्नल  असलेले बाबा सुटीवर घरी आलेले. बाबांसमोर बक्षीस मिळेल म्हणुन दोघी जाम खुष. त्यांनी दहादा बाबांना वेळेवर यायला सांगितले.
    
                          त्या बाबांची वाट पाहू लागल्या पण त्यांची बक्षीस घ्यायची वेळ झाली तरी बाबा आले नाही. दोघींना फार वाईट वाटले . डोळ्यातील अश्रू लपवीत स्टेज वर गेल्या अणि  स्क्रीन वर बाबा दिसू लागले. सॉरी बेटा,मला बोलावणे आले अणि ताबडतोब बॉर्डर वर जावे लागले .  छोटीशी क्लिप रिकॉर्ड करून  पाठविली होती..

        बाबा , आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्हाला माहिती आहे  देश सेवा हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे .  भारत माता की जय. टाळ्यांचा कडकडाट झाला...


                        
                   
         

        4)योगायोग 

             रिद्धी अणि सिद्धी दोघी पक्क्या मैत्रिणी . एक कचराकुंडीत तर दुसरी मंदिराच्या पायरीवर सापडलेली ... दोघीना एकाच अनाथालयात आणण्यात आले. दोघींची खास गट्टी जमली.  एकमेकांशिवाय राहणे अशक्य  अणि पाच वर्षाच्या असताना एकाच शहरात वेगळ्यावेगळ्या पालकांकडे दत्तक दिल्या गेल्या. इवल्याशा जिवाची ताटातूट झाली.
                     
                    एकाच शहरात असून दोघी वर्षभर भेटीसाठी तळमळत होत्या अणि काय योगायोग पहिल्या वर्गात दोघींचा एकाच शाळेत  एकाच तुकडीत प्रवेश झाला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. उज्ज्वल भविष्या सोबत आपली मैत्री पण परत मिळाली यासाठी मनोमन देवाचे आभार मानीत आपल्याला शाळेत सोडून देणार्‍या पालकांकडे प्रेमळ नजरेने दारातून पाहू लागल्या.

5)ऋणानुबंध

                        रेश्मा अणि रिमा हॉस्पीटल मधून घरी जायला निघाल्या . दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या.. दोन महिन्याची ओळख पण अस वाटत होत की रक्ताचे नाते असावेत. दोघींच्याही नवर्‍याच्या किडनी फैल झाल्या होत्या. भाऊ, बहीण कुणीही किडनी द्यायला तयार नाही. म्हातारे आई वडील,त्यांची चालत नाही.. स्वतः द्यायला तयार पण त्यांच्या किडनी त्यांच्या नवर्‍याला मैच होत नाही. सर्व मार्ग बंद  अणि काय योगायोग रेश्मा ची रिमा च्या नवर्‍याला अणि रीमा ची रेशमाच्या नवर्‍याला किडनी मैच झाली... सर्व सोपस्कार पूर्ण करून यशस्वी प्रत्यारोपण झाले. एक वेगळा निर्णय घेऊन दोघींनी आपल्या पतीचे प्राण वाचविले होते.
रेश्मा अणि रिमा च्या कुटुंबाचे जन्मभरासाठी ऋणानुबंध निर्माण झाले.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.