सिकंदर त्याच्या नेहमीच्याच शैलीत वेगाने धावत होता. मैदानातील सर्व लोकांच्या आशा त्याच्यावरच होत्या कारण सर्वांनी त्याच्या जिंकण्यावर पैसे लावले होते. सिकंदर म्हणजे घोड्यांच्या शर्यतीतील एक घोडा. त्याचं नाव सिकंदर ह्यामुळे पडलं कारण तो आतापर्यंत एकही शर्यत हरला नव्हता. अचानक सर्वांच्या अपेक्षा जमिनीवर कोसळल्या कारण धावपट्टीवर सिकंदर कोसळला होता. त्या दिवशी मोठा डाव हा सिकंदर वर लागला होता. त्यामुळे सगळ्यांना नुकसानीचा फटका बसला. सिकंदर चा पाय मोडला होता आणि नियमाप्रमाणे त्याला गोळी घालून मारण्याचा आदेश निघाला. मोहन जो सिकांदरची काळजी घ्यायला व्यक्ती निवडला होता, तो सगळ्यात जास्त चिंतेत होता कारण तीन वर्ष त्याच्याबरोबर घालवल्यावर त्याच्याशी त्याचा लागावं झाला होता.

मालकांसमोर हात जोडून, त्यांच्या पाया पडून त्याने सिकंदर ला वाचवण्यासाठी त्याच्या आयुष्याची भिक मागितली. एवढे वर्ष तो तेथे काम करत होता, त्याने आतापर्यंत त्यांना काहीच मागितलेले नव्हते. आज पहिल्यांदा त्याने मालकाला काही मागितले, त्यामुळे त्यांना नकार देता आला नाही. आता मोहन सिकंदर चा मालक झाला होता. मोहन ने त्याच्यावर खुप मेहनत घेतली आणि त्याला बर केलं. मात्र अजूनही तो धावू शकत नव्हता कारण मनातून तो एवढा खचला होता, की पूर्णपणे बरा होवून सुध्दा चालण्याचा प्रयत्न करत नव्हता. एकदा मोहन ने त्याला धावण्यासाठी हतबल करायला एक बेत आकला. त्याने त्याला झाडाला एका हलक्या दोरीने बांधलं आणि स्वतः दूर जाऊन जोरात ओरडू लागला, जणू तो संकटात सापडला आहे. त्याची हाक ऐकून सिकंदर ला वाटले की त्याचा मालक संकटात सापडला आहे आणि त्याला त्याची गरज आहे.

ती हाक ऐकून तो झाडाची दोरी तोडून वेगाने आवाजाच्या दिशेने धावत गेला आणि त्याला पाहून मोहन ला त्याचा बेत यशस्वी झाल्याचा आनंद झाला. तो पूर्णपणे बरा झाल्यावर मोहन ची इच्छा होती की त्याने पुन्हा एकदा शर्यतीत उतरावं पण जखमी घोड्यावर पैसे कोण लावणार आणि शर्यतीत त्याला घेतील का ? असे प्रश्न त्याच्या मनात होते. त्यानुसार त्याने मालकाला त्याबद्दल सांगितले त्यावर मालकाची अशी अट होती की, किमान एका व्यक्तीने तरी त्याच्यावर पैसे लावावे. मोहन ने त्याची सर्व जमापुंजी सिकंदर वर लावली आणि किमान त्याच्या तीन शर्यतीवर पैसे लावू शकतो, एवढी रक्कम जमा केली. सिकंदर वर पैसे लावणारा तो एकटाच होता. पहिल्या शर्यतीत तो धावला मात्र एकदम मंद गतीने. सर्व जण त्यावर हसू लागले. दुसऱ्या शर्यतीत सुध्दा तेच झालं.

तिसरी शर्यत सुध्दा तो हरणार हे सर्वांना माहीत होते. तिसऱ्या शर्यतीच्या वेळी सिकंदर हळूहळू धावपट्टीवर धावत होता. अचानक एका व्यक्तीचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याचा मुलगा खुर्चीवरून खाली पडला होता. सुदैवाने त्या मुलाला काही झालं नाही मात्र तो आवाज ऐकून सिकंदर ला वाटले, त्याचा मालक संकटात आहे. त्यामुळे त्याच्या पूर्ण ताकदीने तो पाळायला लागला. शर्यत जिंकण्याच्या रेषेच्या पलीकडे त्याला मोहन दिसला आणि तो आणखी जोरात पाळायला लागला. त्याचा वेग पाहून मोहन अचंबित झाला. मैदानातील सर्व लोक उभे राहून त्याला पाहू लागले. शेवटी सर्व घोड्यांच्या आधी तो ती रेषा पार करून मोहन जवळ आला आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने जिभेने चाटायला लागला.

त्या दिवशी, ती शर्यत जिंकून मोहन आणि सिकंदर दोघांनी एवढा पैसा कमावला की ते कधी विचार सुध्दा करू शकत नव्हते. त्यानंतर दोघांनीही कधी मागे वळून पाहिले नाही. ह्यावरून आपल्याला हे कळतं की, कधी कधी आपल्याकडे जिंकण्याची क्षमता असते मात्र आपण मनातून हरलेलो असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांना मात देऊन जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकता तेव्हा तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. कधी कधी आपलं मन सांगतं की आपण जिंकू शकतो मात्र आपले विचार सांगते की नाही तुम्ही हे करू शकणार नाही. अशावेळी जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर प्रभुत्व मिळवाल, तेव्हा यश तुमच्या पासून फार दूर नसेल. जग जिंकण्यासाठी आधी तुम्हाला स्वतः ला हरवावे लागेल.

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.