बेळगावपासुन साधारण सत्तर ऐशी किलोमिटर अंतरावर विकसनशील भागांमध्ये वसलेले एक पळसंबा गाव. गाव खुप छोटे आणि शहरी वस्त्यापासुन लांब असल्यामुळे किमाण गरजेच्या गोष्टी सोडल्या तर फार काही ना काही मिळत ना चालत आणि इतर गोष्टींची कोणाला गरजही नव्हती, अगदी लाईटची सुद्धा. देशामध्ये कितीही विकास झाला असला तरी त्याच्या प्रभावाखाली काही गोष्टी यायला अजुन अवकाश होता अशांपैकी असलेले हे पळसंबा आणि या गावातील किमाण ५०० कुटुंब. गावामध्ये आमचे हे छोटेसे कुटुंब , मी माझी पत्नी शांता आणि बारा वर्षाची मुलगी नेत्रा. या छोट्याशा गावातील आमच्या छोट्या कुटूंबावर असं काही चमत्कारीक संकट येवू शकेल असा कधी स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता.

पण आता आम्ही यातुन सावलो आहे, त्या वेळी मी आणि माझे कुटुंब ज्या दडपणातून गेले होते ते आठवले की आजही अंगावर शहारे येतात. पण मी आता एक नविन सुरवात करणार आहे. आणि त्या सुरवातीची सुरवात माझ्या वाट्याला आलेल्या कर्मभोगांपासुन करणार आहे. निराशेच्या रुपाने नकारात्मकता आपल्याकडे हात पुढे करते, तो हात आपल्याकडून आपली सद्सद्विवेकबुद्धी न वापरत अगदी अलगदपणे पकडला जातो आणि आधी तो स्वत: नकारात्मकतेच्या गर्तेमध्ये खोल खोल जायला लागतो आणि नंतर ही नकारात्मकता त्याच्यासोबत त्याचे घर, कुटूंब , संसार त्याचे भविष्य या सगळ्यांना आपल्या कव्यात घ्यायला सुरवात करते.


या सागळ्या प्रकरणाची सुरवात झाली दगडांपासुन. आमचे तीन खोल्यांचे आमचे साधे मातीने सारवलेले कौलारू घर. बाहेर शेणाने सारवलेले अंगण आणि अंगणार पाण्यासाठीचा आड (छोटी विहिर) होता. आमचे घर मुळ गावभागाला थोडे सोडून होते, आसपास लागून अशी घरे नव्हते. घरात एक छोटे स्वयंपाकघर एक झोपण्याची खोली त्यात सुद्धा खॉट या हा प्रकार अजुन नविणच होता आणि नाविण्य पचवण्याची कसलीही गडबड नसल्यामुळे तो आजपर्यंत वापरला गेला नव्हता. स्वयंपाकघरामध्ये नेहमीची चूल आणि गरजेपूरती भांडी. आणि सुरवातीला असावा म्हणायला एक बसायला-उठायला खोली, त्यातही तक्के आणि गाद्या पसरलेल्या.


"अगं नेत्रा, हे दगड इथे कोणी आणून टाकलेत ? , घरात आहे आहे एवढे ’दगड’ पुरेसे नाहीत म्हणूण आणखीन इथे मांडून ठेवले आहेत " शांताची किरकीर मला ऐकू येत होती.

उद्या तालूक्याला जावूण घटक चाचणी परिक्षेचे पेपर छापायला द्यायचे होते त्याच्या तयारीत नेमहमीच्या झोपायच्या बेड वर बसुन तयार केलेले पेपर्स वर पुन्हा एकदा नजर टाकत होतो.


marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.