मुंजा एक रहस्य भाग-1

अमुक एका गावाची ही रहस्यमय कथा

ती अमावास्याची रात्र असते. गावचे पाटील यांच्या घरी भलतीच गडबड सुरू असते **पाटील:- अहो झालं काय तुमचं।। बायको- झाल झालं नैवैद्य तर घेऊ द्या।।
पाटील-गुरुजी खोळंबले कधीपासून
पाटील व घरचे सगळेजण दर सणाला व अमावास्याला वडाच्या झाडाला नैवेद्द अर्पण करत असतात, याच्या मागचे करण की त्या झाडावर मुंजा राहत आहे असा समज गावाचा असतो।। व प्रथेनुसार गावचे पाटील यांच्यावर पूजा करण्याचा मान असतो।। आता मुंजाची पूजा म्हणजे सगळ्यांच्या पोटात गोळा यायचा त्याच्या मागची कारणे पण तशीच आहेत।। कारण जर काही अघटित घडले तर सगळ्या गावावर संकट उभे राहिल असा समज होता सगळ्यांचा।।

सगळी आवराआवर करून पाटील गुरुजी व परिवार सहित वडाच्या झाडाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचा 8 वर्षाचा मुलगा पण होता।। ईशान त्याचे नाव खोडकर पण तितकाच लाडका मुलगा होता तो. पाटील गावच्या गुरुजींना फार मानत कारण ईशान पण त्यांच्या आशीर्वाद मूळे झाला अशी समजूत होती त्यांची
ईशान त्याच्या खेळण्यासोबत बाहेर पडला।। संपूर्ण रस्ता तो खेळत येत होता ।। त्याची आई मधून मधून त्याला ओरडत होती।। जस जसे ठिकाण जवळ येत होत तस तसे सगळे भिऊन एकमेकांना बघत होते।। पाटील शेता जवळ जाऊन झाडाची वाट तपासुन बघतात।। हातात टॉर्च घेऊन सगळे जण वडाच्या झाडाकडे जात होते।।
शेवटी गुरुजी सगळ्यांना थांबण्यासाठी सांगतात.  नैवेद्द ,सोने दागिने ,पैसे, हळद, कुंकू, घंटी, कापुर, उदबत्ती, नारळ, असे सर्वांची मांडणी करून घेतात.
गुरुजी पाटील व घरच्यांना हात जोडून उभे राहण्यासाठी सांगतात . गुरुजी मंत्र म्हणण्यास सुरू करतात व सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे  भाव दिसु लागतात।। गुरुजी जोशाने अजून मोठ्याने मंत्र म्हणतात
आवाजाची तीव्रता जशी वाढते तसे वडाचे झाड हलायला सुरू होते।। कर्कश आवाज ऐकू येत होते।। कुत्रे भुंकत होते ।। जोराचे वारे सुरू झाले।। तसे गुरुजी अजून जोरात मंत्र म्हणत होते ।। "ये मुंजा ये,गावची पीडा घेऊन जा" असे बोलताच एक स्फोट होतो सगळे जण घाबरून जातात।।
**गुरुजी- सगळेजण या वडाच्या झाडाला पाठ करून घरी जावा आणि एक लक्षात ठेवा मागे वळून बघायचे नाही।। सगळे हो अशी मान डोलावतात।। पण या सगळ्याचा ईशान वर काहीच फरक पडत नाही त्याचे खेळणे सुरू असते ।। आई ओरडतच त्याला खेचून उभा करते व घरी यायला सांगत असते।। ईशान तयार होतो, सगळेजण पाठ करून चालत जात असतात ।। जाता जाता ईशानचा  पाय अडकतो व तो खाली पडतो, त्याचे खेळणे मागे पडते म्हणून तो ते उचलतो व वडाच्या झाडाला बघतो।। तिथले दृश्य पाहून तो तिथेच बेशुद्ध पडतो।।सगळ्यांची धावाधाव सुरू होते।।
पाटील धावत त्याला उचलून घेतात व त्याला बाहेर घेऊन येतात।। घरी गेल्यावर पाटील गुरुजींना निरोप पाठवतात,
गुरुजी घरी येतात, ईशानला बघतात, तपासून झाल्यावर त्यांचा रागाचा पारा अचानक चढतो ते सगळ्यांवर ओरडायला सुरू करतात।। सोबत आणलेली औषधे त्याला देतात व काळजी घ्यायला सांगतात।। इकडे त्याची आई व घरचे सगळे काळजीत असतात कारण तो अजून शुद्धीवर आलेला नसतो, रात्र झालेली असते सगळा परिवार ईशान सोबत झोपतो.

सकाळ होते तसे ईशान डोळे उघडतो, हे पाहून सगळेजण फार खुश होतात, पण शुद्ध येऊन 2 तास होतात तरी ईशान काहीच बोलत नसतो, तो फक्त घरच्या भिंती व छप्पर कडे विकृत हास्य करून बघत असतो।। घरचे सगळे समजतात की याला मुंजा ने धरलं।। पाटील तडक त्याला घेऊन गुरुजी कडे जातात , गुरुजी म्हणतात-"तुझ्या मुलाला मुंजाने धरलंय,त्याला आता एकच उपाय घरी होम करावा लागेल व मुंजाची क्षमा मागितली पाहिजे", सगळेजण यावर तयार होतात......

2दिवस होतात तरी ईशान काहीच बोलत नव्हता ना खात होता, सगळे खूप चिंतेत होते, सगळेजण झोपल्यावर रात्री ईशान अचानक उठतो व घरच्या माळ्यावर जायला लागतो त्याला कोणीतरी बोलावतोय असा भास होत होता, तो जायला निघतो, माळ्यावर जाताना आवाज होतो त्या आवाजाने आई जागी होते ईशान कुठे दिसत नाही म्हणून ती कालवा करते, सगळे जण शोध घेऊ  लागतात, एका कोपऱ्यात आईचे लक्ष जाते तिकडे काही हालचाल दिसून येते, सगळेजण तिकडे जातात, पाहतात तर काय ईशान सगळा कुंकुमध्ये भिजला असून वेड्यासारखा नाचत होता ,ओरडत होता  जसे घरचे दिसतात तसे ईशान पळून जायचा प्रयत्न करतो पण अशक्तपणा मुळे तो पुन्हा चक्कर येऊन पडतो ।। सगळे घाबरलेल्या स्थितीत असतात।। ईशान ला अंघोळ घालून पुन्हा आई त्याला झोपवते।। झोपवून झाल्यावर पाटील गुरुजी कडे जायला सांगतात तसे आई बोलते- काही गरज नाही हे सगळे त्यांच्या मुळे घडतंय,त्यांच्यामुळे माझ्या मुलावर ही वेळ आली आहे, इशानच्या आईला आता गुरुजींवर राग येऊ लागला होता
इशानच्या आईची मनस्थिती आता खराब होऊ लागली होती,त्यामुळे तिने झालेला सगळा प्रकार आपल्या भावाला म्हणजे रमेशला सांगायचे ठरवते, तिचा भाऊ पोलीस मध्ये असतो व दुर शहरात त्याची पोस्टिंग असते, तिचा भाऊ सर्व ऐकून घेतो व रजा घेऊन तडक तिकडे येतो असे सांगतो,

रमेश रजा अर्ज घेऊन ACP राजकडे जातात,
व झालेला सगळा प्रकार त्यांना सांगतात.
त्यांची रजा मंजूर होते , ACP राज व ASP स्मिता  यागोष्टीकडे  बारीक लक्ष द्यायला सांगतात व सर्व माहिती पुरविण्यास सांगतात, तसे आदेश घेऊन रमेश गावी निघतो.
गावी पोचल्यानंतर सगळा प्रकार समजून घेतो व तसा रिपोर्ट ACP ना कळवतो,परिस्थितीचे गांभीर्य बघून प्रकरणं हाताबाहेर जाण्याअगोदर काहीतरी करायला हवे म्हणून ACP ,ASP ना घेऊन गावाकडे जायचा विचार करतात व ते तसे निघतात पण.

पुढे जाऊन काय होते, ईशान बरा होणार काय?, मुंजाचा निकाल लागणार काय?ACP व  ASP यांचे प्रयत्न यशस्वी होणार का?हे आपण पाहू दुसऱ्या भागात

क्रमशः

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.