रहस्य

रहस्य

किती सुंदर असाव एखाद्याने ? एक सवडीन बनवलेला उत्कृष्ट मास्टरपीस होती ती ! तो पहातच राहीला तिला एकटक ! आपण ईथे कशासाठी आलो हेच विसरला तो ! तिनच मौन तोडल चुटकी वाजवून ! शुक शुक ! अहो तोंडात माशी जाईल ! ती खळाळून हसत म्हणाली . त्यान दचकून हं नाही ते ..... मी ते अपहरणाचा त..तपास करण्यासाठी आलोय !
मग झाला का तपास ? विचारल तिन ! पुन्हा खळाळून हसली ती ! पुन्हा भान हरपेल म्हणून त्यान तिच्याकडे पहाण टाळल .
किती दिवस झाले तुमची मुलगी गायब होऊन ? कुठे होती ती ? घरात कोणकोण होत ? त्यान विचारल . हळू हळू जरा .... अहो जरा सावकाश .... ! इतके प्रश्न विचाराल तर कस होणार बर ! तिन लाडीकपणान विचारल .
तिची आमंत्रण देणारी नजर त्याच काळीज चिरून गेली !

क्रमश:


सुप्रभात !

रहस्य

पुर्वभाग : त्यान विचारल . हळू हळू जरा .... अहो जरा सावकाश .... ! इतके प्रश्न विचाराल तर कस होणार बर ! तिन लाडीकपणान विचारल .
तिची आमंत्रण देणारी नजर त्याच काळीज चिरून गेली !

आता पुढे

त्यान पुन्हा तिच्याकडे दुर्लक्ष केल . बर कोण कोण होत त्या दिवशी ? कशी घडली घटना ? ती पुन्हा हसली ! पण यावेळी त्यान निर्धारान विचारल मॅडम मी तपासासाठी आलोय कृपया सहकार्य कराव !
हो हो हो सहकार्य करतो आम्ही , थोड तुम्ही करा ! तिन मादक आवाजात उत्तर दिल . सांगते सर्व मी . मी सागरीका भालचंद्र वाडके . भालचंद्र वाडके यांची पत्नी ! तसे आमचे कोणाशीच वैर नाही पण इतका मोठा व्यवसाय कोणाच काही सांगता येत नाही .
तर त्या दिवशी आम्ही बीचवर गेलो होतो . मी माझी मुलगी व मुलीचा होणारा नवरा . भालचंद्र हाँगकाँगला गेला होता व माझा मुलगा रीसर्चसाठी पेरू या देशात ! आम्ही बीचवर पोहोचलो मज्जा केली . मग माझी मुलगी वाॅशरूममध्ये गेली आणि जावाई बारमध्ये , मी बीचवरच समुद्र न्याहाळत बसले होते आणि एक किंकाळी ऐकू आली . तिथे कोणालातरी भोसकल होत ! मी धावत जाऊन पाहील तर रक्ताच्या थारोळ्यात माझा होणारा जावाई जख्मी पडला होता . मी मुलीला सांगण्यासाठी वाॅशरूमकडे गेले पण सगळ वाॅशरूम खाली होत .....

क्रमश:


रहस्य ३

पूर्वसुत्र : मी धावत जाऊन पाहील तर रक्ताच्या थारोळ्यात माझा होणारा जावाई जख्मी पडला होता . मी मुलीला सांगण्यासाठी वाॅशरूमकडे गेले पण सगळ वाॅशरूम खाली होत .....

आता पुढे

मग मी मुलीला आवाज द्यायला सुरूवात केली पण प्रतिउत्तर आले नाही . तोवर कोणीतरी पोलीसांना फोन केला होता ते आलेे होते आणि चौकशी सुरू होती . अच्छा तर पोलीस तपास करत आहेत मग प्रायव्हेट डिटेक्टीव्हची गरज का पडली तुम्हाला ? तेच जिवघेण हास्य करून ती म्हणाली त्याच काय आहे की आमच्या पुर्वपार चालत आलेला एक परंपरागत हिरा आणि काही कागदपत्रही गायब आहेत . मग ते काम पोलीसही करू शकतात तो उद्गारला !
तेच तर नकोय ना आमच्या आहोंना ! का ? त्यान विचारल . अस आहे की हा हिरा पूर्ण शंभर कॅरेटचा असून कागदपत्रात आमच्या गावच्या वाड्यातील संप्पत्तीची माहिती आहे जर हे पोलीसांना समजल तर काही असामाजीक तत्व जागे होतील आणि मग पुढे काही बरे वाईटही घडेल जे नको आहे . खरे तर पोलीसांकडून गुप्ततेची हमी मिळेल पण गुप्तता राखली जाईल याची खात्री नाही !
मग मी नेमक काय कराव अस तुमच म्हणणे आहे ! बस गुप्ततेन हिरा आणि कागदपत्र आमच्यापर्यंत पोहोचवा बस ! तुमच ईनाम तुम्हाला दिल जाईल !..
त्यान होकारार्थी मान डोलावली . .......

क्रमश:


रहस्य ४

पूर्वसुत्र :
बस गुप्ततेन हिरा आणि कागदपत्र आमच्यापर्यंत पोहोचवा बस ! तुमच ईनाम तुम्हाला दिल जाईल !..
त्यान होकारार्थी मान डोलावली . .......

आता पुढे ..

मला त्या हिऱ्याबद्दल आणि कागदपत्रांबद्दल आणखी काही माहिती हवी आहे . जसे ह्या वस्तु आधी कोणाकडे होत्या ? किती जुन्या आहेत ? सध्या कोणाकडे आणि कुठे होत्या ? याबद्दल कोणाकोणास माहिती होती ?
हिरा आणि कागदपत्र आधी आमच्या ह्यांच्या पणजोबांकडे त्यांच्याकडून आजींकडे व सध्या बँकेच्या लाॅकरमध्ये होते . ह्या बद्दल माहिती फक्त मला , ह्यांना , व आमचे दिवाणजी अजगरसींह यांनाच होती . तिने उत्तर दिले ! हं म्हणजे तुमच्या तीघापैकीच कोणीतरी ह्या घटनेमागे आहेतर ! बर मुलच्या अपहरणाशी आणि तुमच्या होणाऱ्या जावयाच्या खुनाशी याचा संबध असावा असे तुम्हाला वाटते का ?
हं हं हं हं ! ते तुम्ही शोधून काढा मी. अजय पागनीस ! ती हसत म्हणाली !
अजय पागनीस उंची ६:४ , वर्ण सावळा , चेहेरा अप्रतिम , डोळे पाणीदार , आणि कमावलेली शरीरयष्टी ! एकंदर पहाताक्षणी कोणीही प्रेमात पडाव असा ! हौस म्हणून डीटेक्टीव्ह बनला होता ! वारसाहक्काने अफाट श्रीमंत होता ! फार कमी वेळात आणि वयात चांगलाच नावलौकीक कमावला होता .
अजयन मनाशी विचार केला शशीला भेटायलाच हव ! शशी तिथला पोलीस तपास अधिकारी होता ........

क्रमश:


रहस्य ५

पूर्वसुत्र : अजयन मनाशी विचार केला शशीला भेटायलाच हव ! शशी तिथला पोलीस तपास अधिकारी होता ........ आता पुढे,..

शशीकांत भैरव आपटे ईन्पेक्टर शशी अगदी नावातील शशी प्रमाणेच देखणा . चुकून पोलीसात आला अन्यथा चित्रपटात नायक व्हायचा अस वाटावा इतका ! हा अजयचा बालमित्र होता दोघही अगदी भरपूर शिकले . मग अजयन फाॅरेन्सीक विभाग निवडला तर शशीन आपीएस पण मैत्री कायम राहीली . जरी डाॅ. असला तरी अजयन डीटेक्टीव्हच क्षेत्र निवडल का हे त्यालाही माहित नसाव कदाचीत पण, त्यान आता चांगलाच जम बसवला होता ह्या क्षेत्रात !
नेहेमीच्या कॅफेत बसून दोन यार गप्पा मार होते . या विचित्र केसच डीस्कशन करीत होते . दोघांनाही आश्चर्य वाटत होत की घटना घडल्या दिवसांपासून दहा दिवसांनी डीटेक्टीव्ह हायर का केला असावा ? बर पोलीस तपासात ही बाब काही झाले तरी आज ना उद्या उघडच होणार मग नक्की काय गडबड असावी ?
दहा दिवसांच्या तपासातील दुवे शशीन अजयशी डीस्कस केले व अजयन आपल्या भेटीतली निरीक्षण त्याला दिली आणि दोघेही आपल्या वाटेला लागले ........

क्रमश:


रहस्य ६

पूर्वसुत्र : दहा दिवसांच्या तपासातील दुवे शशीन अजयशी डीस्कस केले व अजयन आपल्या भेटीतली निरीक्षण त्याला दिली आणि दोघेही आपल्या वाटेला लागले ........ आता पुढे .....

अजय बीचवर पोहोचला . आता तस तिथे काहीच सापडणार नव्हत पण काही सूक्ष्म दुवा नक्की मिळणे वा सापडण्याची शकत्या नाकारता येत नव्हती ! प्रथम जिथे वाडके यांच्या होणाऱ्या जावायला मारल तिथे तो गेला . तिथे बाॅडीच्या भोवतीच्या खडूची पुसटशी रेषा अजूनही होती . जाणारे येणारे सतत असल्याने बाकी काहीही सापडणे शक्य नव्हते .
अजयने अगदी बारकाईने पाहीले रक्ताचे ओघळ वाहील्याच्या खुणा होत्या . अजय खाली बसला आणि जवळून पाहीले , अंदाज आला की वार पाठीवर झाला असावा , कारण बरोबर रक्त जिथे बाॅडी होती त्याच्याखालीच ते रक्त मोठ्या प्रमाणात होत .
अजय तिथून उठला व वाॅशरूमकडे गेला . पण ते लेडीज वाॅशरूम होत . पण अजयन बेमालूम वेशांतर केल होत . तो अगदी परीपूर्ण सुंदर ललना दिसत होता . खर तर हे चुक होत पण कोणासही नकळत तपास करून काही पुरावा सापडतो का ते पहाण गरजेच होत आणि झोपलेली भूत जागी होण त्याच्या दृष्टीने योग्यही नव्हत . तो आरामात आत शिरला सुदैवान आत कोणी नव्हत ! कदाचीत सोमवार असल्यान कोणी आल नसाव बीचवर ! मुद्दामच निवडलेला दिवस होता अजयन सोमवार कारण सहसा कोणी आठवड्याच्या पहील्याच दिवशी सुटी घेण शक्य नव्हत !
निवांतपणे त्यान प्रत्येक टाॅयलेटच निरीक्षण केल . एका टाॅयलेटच्या चार काचा गायब होत्या ! तसे पहाता ही फार मोठी गोष्ट नव्हती पण या क्षणी त्याचही महत्व होत अजयला ! अजय टाॅयलेट सीटवर चढला त्या चार काचा नसलेल्या खिडकीतून पाहील . एक माणूस सहज जाऊयेऊ शकत होता ! बाहेर थोडी घाण होती पण तिथून बाहेर निसटण सहज शक्य होत !
अजयन त्या खिडकीतून बाहेर पडण्याच ठरवल . अजय हळूच बाहेर आला . बाहेर पडल्यावर एका बाजूला भिंत होती तर दुसऱ्या बाजूने चिंचोळ्या जागेतून थेट तो बीचवर पोहोचला . बीचची ही बाजू अगदी सामसूम होती . एक छोटी टेकडी समोर होती पण चढण अवघड नव्हत ! अजयन टेकडी पलीकडे जायच ठरवल .............

क्रमश:


रहस्य ७

पूर्वसुत्र : बीचची ही बाजू अगदी सामसूम होती . एक छोटी टेकडी समोर होती पण चढण अवघड नव्हत ! अजयन टेकडी पलीकडे जायच ठरवल ............. आता पुढे ....

तो त्या टेकडीवर चढू लागला . माथ्यावर पोहोचताच त्यान नोट केल की टेकडी चढायला फक्त दहा मिनीटे लागली आहेत . टेकडीवर बऱ्यापैकी पठार होत व सहसा तिकडे कोणी जात नसाव हे एकंदर स्थितीवरून दिसत होत ! थोड पुढे गेल्यावर त्याला एक पाऊलवाट दिसली . पण इतक्यात त्याची नजर आसपासच्या गवतावर पडली . गवत थोडे दाबले गेले होते आणि जरा पिवळे पडले होते . आठवडाभरापूर्वी कोणीतरी तिथे येऊन गेले होते असे दिसत होते .
अजय बारकाईने त्या परीसराच निरीक्षण करत त्या दबलेल्या गवताच्या दिशेने गेला . तिथे पुरूष जातीचे कपडे पडलेले होते . अजय विचारात पडला की अपहरण मुलीचे झाले मग कपडे पुरूषांचे कसे ? पण दुसऱ्या क्षणी त्याचा संदेह दूर झाला तिथेच पुढे काही अंतरवस्त्रे पडली होती जी स्त्रीयांच्या वापरातील होती . पण दोन कसे हा प्रश्न पडलाच ? अजयन ते सर्व गोळा करून एका प्लास्टीक बॅगेत भरले व मार्करने त्यावर खुण केली !
तिथून अजय थोडा आणखी पुढे गेला . तिथे जुनी वापरात नसलेली पण वापरता येण्याजोगी जेट्टी होती . बहूधा तेथून छोटे पाण्यावरून उड्डाण करणारे विमानही जात असावे ......

क्रमश:रहस्य ८

पूर्वसुत्र : तिथून अजय थोडा आणखी पुढे गेला . तिथे जुनी वापरात नसलेली पण वापरता येण्याजोगी जेट्टी होती . बहूधा तेथून छोटे पाण्यावरून उड्डाण करणारे विमानही जात असावे ...... आता पुढे .....

अजय अजूनही स्त्री वेषातच होता . जेट्टी चांगली सुस्थितीत होती . बहूधा तिथून उड्डाणही झाले असावे असे जाणवत होते ! आसपासचा परीसर स्वच्छ होता नुकतीच धूळ पडली असावी पण बाकी स्वच्छ होते . एक केबीन होती . अजय त्या केबीनकडे गेला . अपेक्षेनुरूप केबीन बंद होती . अजयने मास्टर की ने केबीन उघडले , इतक्यात कानाजवळून गोळी सणसणत गेली . अजय पटकन सावध झाला आणि सेकंदात तो कोलांटी मारून एका मोठ्या दगडाआड गेला . आता हातात फोर्टीफाय आर्मर मेड सेहेचाळीस राऊंडचे फाय पाँईंट फाय कॅलीबरचे पीस्टल होते ! अजयन पुन्हा कानोसा घेतला . पुन्हा दोन राऊंड फायरींग झाले ... अजयन पुन्हा दगडाआड आडोसा घेतला . त्याला एकही राऊंड वाया न घालवता काम करायच होत !
दगडाआडून अजय उलट्या दिशेने जिकडून फायर झाले त्याबाजूला पोहोचला . सुदैवान तिकडे दोनच माणस होती . पाठीमागून जाऊन त्यान एकाला एकाच चाॅपर फाईटने बेहोश केल आणि दुसऱ्याच्या कानफटावर पिस्टल टेकवल ! त्यान हत्यार टाकल व हात वर केले ! अजयन दोघांनाही बांधल आणि शशीला फोन केला ......

क्रमश:


रहस्य ९

पूर्वसुत्र : दुसऱ्याच्या कानफटावर पिस्टल टेकवल ! त्यान हत्यार टाकल व हात वर केले ! अजयन दोघांनाही बांधल आणि शशीला फोन केला ...... आता पुढे.....

शशी अगदी साध्या वेशात आला होता . सोबतचे दोन हवालदार ही अगदी साध्या वेशात होते ! अजयन तस बजाऊनच शशीला बोलावल होत . यामुळे नक्की कोण लोक आहेत हे कोणालाही समजणार नव्हत व पोलीस नाहीत यामुळे गुन्हेगार बेसावधच रहाणार होता . जे दोघ पकडले गेले होते ते अजूनही एका स्त्रीकडून हारलो म्हणून चरफडत होते तर हवालदार मिसेस सलाढाणा उर्फ अजयच खरी स्त्री समजू तारीफ करत होते ! अजय अन शशी मनात हसत होते .
त्या दोघांना शशीन पोलीस स्टेशन मध्ये न नेता स्पेशल सेलमध्ये नेल कारण पोलीस स्टेशन मधून ही बातमी बाहेर जाण्याची शक्यता होती . पत्रकार रोज येऊन त्रास देत होते विचारत होते , त्यामुळे तिथे धोका होता !
इकडे अजयन पूर्ण केबीन शोधल . त्याच्या हातात एक जुना फोटो लागला ज्यात दोन पुरूष दोन स्त्रीया एक लहान मुलगी व दोन मुल होती . फोटो बऱ्यापैकी जुना होता . यात वाडके अगदी तरूण होते . म्हणजे हा फोटो वाडकेंच्या पत्नीचा आणि कोणा मित्राचा व त्याच्या पत्नी व वाडकेंची मुले यांचा होता . अजय चकीत झाला होता की वाडकेंची पत्नी अजूनही इतकी तरूण कशी ? कारण वाडकेंनी दुसरा विवाहही केला नव्हता की त्यांची पत्नीही वारली नव्हती ! बहूधा योगा का कमाल म्हणून अजय मनात हसला पण महत्वाचा क्लू त्याला मिळाला होता ..........

क्रमश:


रहस्य १०

पूर्वसुत्र : पत्नी अजूनही इतकी तरूण कशी ? कारण वाडकेंनी दुसरा विवाहही केला नव्हता की त्यांची पत्नीही वारली नव्हती ! बहूधा योगा का कमाल म्हणून अजय मनात हसला पण महत्वाचा क्लू त्याला मिळाला होता .......... आता पुढे ..,.

अजयन आणखी काही महत्वाचे पुरावे गोळा केले व तेथून तो निघाला . अजयन ठरवले की आता काही दिवस मीसेस सलढाणाच बनून रहायच बस ! अजयन पहीले शशीला गाठल आणि आपली योजना त्याला समजाऊन सांगितली . दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी झळकली . मी . सलढाणा यांचेकडे वाडके यांची पुत्री सुरक्षीत , मी . सलढाणाच त्यांच्या खऱ्या आई आहेत व हे सत्य समजल्याने त्या स्वत:होऊन त्यांच्याकडे गेल्या असून आता त्यांना कोणासही भेटायचे वा बोलायचे नाही असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या ! दरम्यान भालचंद्र वाडके यांच्या सुपुत्री यांचे अपहरण झाले होते असा संशय आल्याने त्यांच्या घरचे लोक त्यांचा तपास करीत होते . त्यांचे होणारे पती रमेशचंद्र गीडवाणी यांच्या हत्येपासूनच त्या गायब होत्या . आता समोर येण्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या की माझे होणारे पती यांची हत्या झाली व माझे अपहरण झाले अशी बातमी मला वाचनात आली व म्हणूनत काही गैरसमज पसरू नयेत म्हणून मी समोर आली आहे ....
इतकी मोठी बातमी ऐकूनही ना भालचंद्र वाडके समोर आले ना त्यांचा घरातील कोणीही मात्र त्यांच्या पत्नीने चांगलीच आगपाखड केली .
अजय आणि शशी यांना वाटले की आपली चाल अयशस्वी होते की काय पण इतक्यात वाडकेंच्या पत्नीचे काॅल रेकाॅर्डस मिळाले व एक अत्यंत महत्वाचा दुवा सापडला . शशीन तातडीने हालचाल करून ज्या व्यक्ती काॅल केला होता त्याची माहिती मिळवली . ती व्यक्ती होती वांडकेचा होणारा जावाई ! मग खून झाला तो कोण होता ? ........

क्रमश:


रहस्य : ११

पूर्वसुत्र : शशीन तातडीने हालचाल करून ज्या व्यक्ती काॅल केला होता त्याची माहिती मिळवली . ती व्यक्ती होती वांडकेचा होणारा जावाई ! मग खून झाला तो कोण होता ? ........ आता पुढे......

अजय आणि शशी ताबडतोब कॅफे मूनलाईटला मध्ये भेटले अगदी गुप्ततेत . कोण होता तो मृत व्यक्ती ? काय होत खर रहस्य ? डोक्याला चांगलच खाद्य मिळाल होत अजय आणि शशीच्या ! पण केस जेवढी काँप्लीकेटेड तेवढ डोक जास्त पळायच दोघांच ! मिळालेल्या फोटोतील दुसरे जोडपे कोण हे शोधायच , फोटोत जी मुल व मुलगी लहान दिसत आहेत ते आता कसे दिसत असतील हे काँम्प्यूटर टेक्नाॅलाॅजीने पहायच आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आता जी स्त्री मीसेस वाडके म्हणून वावरत आहे तिचे डीएनए मिळवायचे ! आणि मीस्टर वाडके हाँगकाँगला ज्यावेळी गेले त्यावेळेसची सगळी डीटेल्स प्रवासी यादी चेक करणे , फोटोतील सर्व भावंड आत्ता नेमके कुठे आहेत याचा शोध घ्यायचा , अत्यंत महत्वाच म्हणजे आजपर्यंत सर्व वाडके कुटूंब होत कुठे ? आणि अचानक कस प्रकट झाल ?
महत्वाच्या विषयावर डीस्कशन करून दोघेही बाहेर पडले .
हैल्लो मी मीसेस सलढाणा , मला मीसेस वाडकेंना भेटायचय ! एक चाळीशीतील स्त्री वाडकेंच्या बंगल्यावर वाॅचमनला सांगत होती . वाॅचमन ने इंटरकाॅम वरून आत कळवल . फोन ठेवून तो म्हणाला तुम्ही आत जाऊ शकता . कृपया आपली नाव नोंदणी रजीस्टरवर करून मग जा मॅडम ! तिन आपल नाव नोंदवल व ती आत गेली . बंगला बराच प्रशस्त होता . बाहेर लांच मध्ये दहा मिनीटांच्या प्रतीक्षेनंतर ती आत गेली .
कोण आहेस तु ? वाडके बाईंनी विचारल . मी मीसेस सलढाणा ! हो ते समजल पण वाडकेंशी तुझा काय संबध ? जो तुमचा आहे सलढाणा उद्गारली ! मूर्खासारख बडबडू नकोस . कस शक्यय हे ! का ? सलढाणान विचारल . भालचंद्र पुरूष आहे आणि मी सौंदर्य , मग का शक्य नाही ? मुर्ख आहेस तु ! वाडकेंची मुलगी तुझ्यापासून ? कस शक्यय ? .... का मी स्त्री आहे ! सलढाणाने उत्तर दिल .... तुला किती पैसे हवेत यातून दूर होण्याचे ?
चुकतेयस तू अग मी पत्नीच आहे वाडकेंची दुसरी पत्नी मग मलाही तेच हव जे तुला मिळतय ! ओह तर बरीच मोठी चाल आहे तुझी ! पन्नास कोटी देते जा इथून दूर .........

क्रमश:


रहस्य १२

पूर्वसुत्र : चुकतेयस तू अग मी पत्नीच आहे वाडकेंची दुसरी पत्नी मग मलाही तेच हव जे तुला मिळतय ! ओह तर बरीच मोठी चाल आहे तुझी ! पन्नास कोटी देते जा इथून दूर ......... आता पुढे .....

हा हा हा ... तु मला वेडी समजतेस , जर मला सहज ळ मिळू शकत तर मग तुझे पन्नास कोटी का हवेत मला ? सागरीका वाडके !
सागरीका रागान लालबूंद झाली आणि म्हणाली हे बघ मुळात तु नेमकी कोण व इथे का आलीयेस हे माहिती नाही पण तुला सांगते की माझी मुलगी तुझ्याकडे असणच शक्य नाही ! आता तुला एक संधी दिली होती जीवन सुधारल असत तुझ पण आता तुला वर जाव लागेल ! हातात रीव्हाॅल्व्हर होत मीसेस सागरीका वाडकेच्या ! काय होतय हे समजण्याच्या आत ते रीव्हाॅल्व्हर सलढाणाच्या हातात होत !
मी अशी सहजासहजी संपेन अस वाटल काय तुला ? मला माहिती आहे की तुझी मुलगी माझ्याकडे नाही पण मला ही संधी सोडायची नाही बोल मी सांगेल ते मंजूर करशील ? सागरीकान विचारल बरगळ काय ते ? सलढाणा म्हणाली तुला जे मिळेल त्यात पन्नास टक्के ! माय फूट सागरीका किंचाळली ! सलढाणा गुढ हसली म्हणाली तुला वेळ देते मी हव तर ! तुझ्या सोबत आणखी कोणी असेल तर बोलून घे त्यांच्याशी ! मी येईन पुन्हा दोन दिवसांनी ! बाय बाय आणि रीव्हाॅल्व्हर तिच्या हातात फेकून सलढाणा तिथून जायला निघाली ! हं हं त्रास करून घेऊ नकोस हे बघ गोळ्या माझ्याजवळ आहे ! हा हा हा .. विचित्र हसत सलढाणा तिथून निघून गेली !
सागरीकाने घाईने फोन गीडवाणीला केला . दोघेही विचारात पडले की या सलढाणाला कस माहिती झाल सगळ ! पण आता यावर तोडगा काढण गरजेच होत ! दोघांनी काहीतरी ठरवल आणि सागरीका आश्वस्त झाली ! पण यांच बोलण दूरवर पोलीस स्टेशन मध्ये शशी ऐकत होता !
यावेळी शशीन अजयला फोन केला . दोघांची गुप्त सल्लामसलत झाली . पुरावे सागरीकास अटक करण्या एवढे नक्कीच होते पण मुख्य सूत्रधार ती नव्हती त्यामुळे अजय मी. सलढाणाच बनून रहाणार होता ! ..........

रहस्य १३

पूर्वसुत्र : यावेळी शशीन अजयला फोन केला . दोघांची गुप्त सल्लामसलत झाली . पुरावे सागरीकास अटक करण्या एवढे नक्कीच होते पण मुख्य सूत्रधार ती नव्हती त्यामुळे अजय मी. सलढाणाच बनून रहाणार होता ! .......... आता पुढे .....

चवताळलेल्या सागरीकान सलढाणा परत जिवंत जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती . सगळीकडे चोख बंदोबस्त होता . पण तिचा प्लॅन फसला . सलढाणान तिच्या घरी बोलावल सागरीकाला ! चडफडत सलढाणाच्या घरी सागरीका गेली . तिथे चक्क डीटेक्टीव्ह अजय बसला होता ! हे काय ? तुम्ही इथे ? सागरीकान विचारल ! हो मी सलढाणा मॅडमशी बोलायला , चौकशी करायला आलो होतो आता निघालोय परत . झालीये चौकशी पूर्ण . बाई पक्की बेरकी आहे . ' ताकास तुर लागू दिला नाही ' बयेने . बर तुम्ही इथे कश्या ? मी माझ्या मुलीबद्दल विचारण्यास आली आहे . पहाते माझे प्रयत्न करते .
ठिक आहे मग मी निघतो . पहा पण जरा सावध रहा बाई फार वेगळी वाटली मला . तस काही वाटल तर मला काॅल करा मी इथे जवळच आहे कॅफे मून मध्ये ! हो मीस्टर अजय जरूर . धन्यवाद आपले . अजय तिथून निघून गेला . दहा मिनीटाने सलढाणा बाई आल्या . बोल काय ते फटाफट सागरीका म्हणाली . मी काय बोलणार ? तुच सांग काय ठरवलस ते ? माझा वाटा पन्नास टक्के ! इतक्यात गीडवाणी तिथे पोहोचला . ते मॅडम कशा अशते ना की हा पन्नाश टका नाय परवडते आमाला साई ! यात पहा हीचा वाटा अशते , माझा अशते , अन माझाही मीसेस सलढाणा ! मीसेस सलढाणान दचकून पाहील आवाजाच्या दिशेने ! एक वयस्कर पण फिटनेस राखलेला कोणी पुरूष होता ! अजय उर्फ सलढाणाला फोटोतील दुसरा पुरूष आठवला ! ओह हा आहे तर यामागे तो मनात म्हणाला !
मला काय करायचय त्याच्याशी ती तुमची समस्या आहे माझी नाही ! मला पन्नास टक्के हवेच ! मागून मीसेस सलढाणाच्या पोटावर पीस्टल टेकवल गेल ! खर तर सलढाणाला म्हणजे अजयला या साऱ्यांशी निपटण सहज शक्य होत पण मुद्दामच त्यान स्वत:स बंदी बनवून घेतल ! इकडे शशीलाही हे सर्व टीव्ही स्क्रीनवर दिसत होत ! त्यान पूर्ण टीम तयार ठेवलीच होती !
मीसेस सलढाणाला पीस्टलाच्या धाकावर गाडीत बसवल आणि सगळे त्यात बसले ! ते वाहन जुना मॅटेडोर होता ! गाडी वेगान शहराच्या आत शिरली . आणि दुसऱ्या दिशेच्या मार्गान बाहेर पडली . तीन तासान गाडी थांबली . तो परीसर निर्जनही नव्हता आणि गजबजलेलाही ! ती एक जुनी वस्ती होती ! झोपडपट्टी !सलढाणाला तिकडे नेण्यात आल . एका झोपडीत दोन बंदूकधाऱ्यांसह तिला बंदी ठेवल गेल !...........

क्रमश:


रहस्य १४

पूर्वसुत्र : ती एक जुनी वस्ती होती ! झोपडपट्टी !सलढाणाला तिकडे नेण्यात आल . एका झोपडीत दोन बंदूकधाऱ्यांसह तिला बंदी ठेवल गेल !........... आता पुढे ......

थोड्या वेळात तिथे तो फोटोतला दुसरा माणूसही पोहोचला . मीसेस सलढाणा बोल तू कोण आहेस ? कुठून आलीस ? तुला आमच्या बद्दल कस समजल ? बोल ! मीसेस सलढाणा हसली जोरात . मी सांगितले आहे मी कोण व मला काय हवय ? मूर्ख बये ते शक्य नाही ! का शक्य नाही ? कारण मि. भालतंद्र वाडके आता जिवंतच नाही ! हो हो त्याची ती मूर्ख बायकोही जिवंत नाही ! त्यांना आम्ही वीस वर्षांपूर्वीच मारलय !
मग ही कोण ? मी. सलढाणान विचारल ! तस तुला सांगण्याचा काहीच संबध नाही पण तुझा हा शेवटचा दिवस म्हणून तुला सांगतो नंतर तुला सगळ समजलय म्हणून तुलाही मराव लागेल ! ही तरूण मुलगी म्हणजे माझी मुलगी आहे . काय ? तुझी मुलगी ? आणि मग वाडकेंची मुल कुठे आहेत ? त्यांची मुलगी कुठे आहे ? खून कोणाचा झाला होता मग ? तुला फारच प्रश्न पडतात ग ! अं बावळट अग तो आमच्या प्लॅनचाच एक हिसा होता खून ! आणि वाडकेंची मुल आमच्या ताब्यात आहेत ! चांगली मोठी झाली आहेत परदेशात शिकली सवरली आहेत !
का तू जर त्यांच्या आई वडीलांना मारून टाकलस तर त्यांना का वाचवल ? आणि त्यांची ती मुलगी ! चल सांगतो तुला हे ही ! ती मुलगी जिला मी माझी म्हणतोय तीच ती वाडकेची मुलगी आहे ! काय ? तिला हे माहिती आहे ? हा हा हा ! हाच आमचा गेम प्लॅन आहे ! तिला अाणि तिच्या भावांना आम्ही आमची मुल म्हणून सांभाळल आजपर्यंत ! भालचंद्रचा सगळी संप्पत्ती या तिघांच्या नावावर आहे जी त्यांच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांना मिळणार होती पण अचानक ते कागदपत्र हरवले ज्यात भालचंद्रच मृत्यूपत्र होत . मग ते मिळवण्यासाठी आम्हाला हे नाटक घडवून आणाव लागल ! तो खून एका रस्त्यावरच्या भिकऱ्याचा केला होता ज्याची प्लास्टीक सर्जरी करून आम्ही त्या गीडवाणी बनवल होत .........

क्रमश:


रहस्य १५

पूर्वसुत्र : मग ते मिळवण्यासाठी आम्हाला हे नाटक घडवून आणाव लागल ! तो खून एका रस्त्यावरच्या भिकऱ्याचा केला होता ज्याची प्लास्टीक सर्जरी करून आम्ही त्या गीडवाणी बनवल होत ......... आता पुढे ......

मग आम्ही त्या डीटेक्टीव्हला हायर केल आणि पोलीसही तपास करतच होते ! डीटेक्टीव्हला पैसा ओतला की झाल ते मृत्यूपत्र आम्हाला बरोबर मिळाल असत पण , तू मध्ये आलीस मूर्ख बाई ! आता तुला आम्ही तिथेच पाठवणार जिथे भालचंद्रला पाठवल ! हा हा हा हा !
मीसेस सलढाणाही हसू लागली ! वेडी झालीस का ? मृत्यू जवळ आलाय हे पाहून ? हो वेडीच झालीयेस ! अरे मूर्ख माणसा तू कोणाशी पंगा घेतलायस हे तरी माहिती आहे काय ? शशीचा आवाज घूमला आता सलढाणा आणखी जोरात हसू लागली ! तिचे हात आता मोकळे होते आणि तो तिला धमकावणारा माणूस तिच्या गन पाॅईंटवर !
ये ईन्सपेक्टर तू इथे कसा ? त्या माणसान विचारल ! मी बोलावलय त्याला इथे ! अजय उर्फ सलढाणान सांगितल . कस काय ? तुला आम्ही पकडलय हे फक्त आम्हालाच ठाऊक होत ! म्हणून तर तू मुर्ख ! अजय म्हणाला ! अजय इथे ? ये वेड्या इकडे बघ मी अजय मी. सलढाणान सांगितल ! पुरते फसलात माझ्या जाळ्यात ! नाही थांबा हुकूमाचा एक्का माझ्या हातात आहे , फोटोतला माणूस म्हणाला ! तो भालचंद्रचा मोठा मुलगा .. वाक्य पूर्ण होण्याच्या आतच शशीन सणकन् थोबाडीत दिली त्याच्या ! अरे मुर्खा तुला काय वाटत आम्ही इतके दुधखुळे आहोत काय ? कालच माॅरीशस हून त्याला आम्ही आणलय इकडे ! आणि हो आश्चर्याचा धक्का तुला झेलायचाय ! मी. भालचंद्र व मीसेस भालचंद्र या समोर या !
नाही ...... न .... नाही ..... हे कसे जीवंत ? मी तर स्वत: यांना माझ्या हातान बेहोश करून गाडी दरीत ढकलली होती ! न .. न नाही ..! हो विशाल तू मारलच होतस आम्हाला पण तू जे करणार होतास त्याची कल्पना आम्हाला तुझ्या बायकोन मरताना दिली होती ! अरे लोभी माणसा तू तिलाही संपवलस कारण ती तुझ्या वाईट मार्गात अडथळा होती ! तू तिला मारलस आणि तिथून गेलास . तुला वाटल ती मेलीये पण नाही ती जिवंत होती ... आम्ही पोहोचलो तेव्हा तिने सर्वकाही आम्हाला सांगितल आणि प्राण सोडला !
पुढे काही हालचाल करण्याआधीच आम्ही तुझ्या हाती लागलो ! पण दैव बलवत्तर होत आमची तू गाडी ढकललीस आणि ती आधी एका दगडाला आडकली आम्ही शुद्धीत आलो होतो . मग पटकन बाहेर उड्या मारल्या आणि गाडी दगडासह दरीत कोसळली ! तुला वाटल आम्ही मेलो . नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो व सर्व कळवले पण तू फरार होतास !
तुझी चाल तुझ्याच गळ्यात पडली .भालचंद्र वाडकेंचा होणाऱ्या जावयाचा खून व मुलीचे अपहरण ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पोहोचली ! आम्ही दरम्यानच्या काळात सतत तुझा शोध घेत होतो आमची मुल तुझ्या जवळ होती ! मग आम्हाला समजल तू माॅरीशसला आहेस ! तातडीने आम्ही पोलीसांना कळवल . पोलीसांनीही लगेच तुझी माहिती काढायला सुरूवात केली !
मग अचानक पेपरातील बातमी वाचून पोलीसांना संशय आला की तुच यामागे असशील ! मग मधल्या काळात तू प्लास्टीक सर्जरी करून घेतलीस व नावही बदलल काय ते संतोष गीडवाणी ..... आणि हा तुझा मुलगा हाच तो माझा होणारा जावाई म्हणून तु उभा केलास !किव तर तेव्हा आली जेव्हा माझ्या मुलीलाच माझी बायको म्हणून जगासमोर आणलस !
शशी आणि अजयन एकत्रच बोलयला सुरू केल . आम्हाला पहिल्यांदाच संशय आला होता जेव्हा वाडकेंची तरूण बायको पाहिली ! मग मी सगळे रेकाॅर्ड तपासले आणि आणि मला सर्व माहिती मिळाली . हा अजय माझा मित्र जो डीटेक्टीव्ह आहे यालाच तुम्ही हायर केलत ! तुमच ते मृत्यूपत्र तुम्हाला कोणाच्याही नकळत तुम्हाला हव होत ! मग तुम्ही ती हिऱ्याची कहाणी रचलीत आणि याला ऐकवलीत .
मग आम्ही एकत्र कामाला सुरूवात केली........

क्रमश:रहस्य 16

पुर्वसूत्र : तुमच ते मृत्यूपत्र तुम्हाला कोणाच्याही नकळत तुम्हाला हव होत ! मग तुम्ही ती हिऱ्याची कहाणी रचलीत आणि याला ऐकवलीत .
मग आम्ही एकत्र कामाला सुरूवात केली........ आता पुढे......

मग अजयन वेशांतर केल आणि तो स्त्रीवेषात राहून जिथे तुमच्या तथाकथीत जावयाचा खून झाला व मुलीच अपहरण झाल तेथे गेला . ज्या टाॅयलेट मधून मुलीच अपहरण झाल त्या टाॅयलेटच्या खिडकीतून अजय तुमच्या त्या जेट्टीवरील अड्यावर पोहोचला . मग तुझे दोन साथीदार याला सापडले . यान मला फोन करून बोलावून घेतल व मी त्या दोघांना अटक करून घेऊन गेलो .
मग अजय मीसेस सलढाणा बनून तुमच्या समोर आला ज्यामुळे तुम्हा जेट्टीवर काय घडल याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही . तुझ्या त्या दोन माणसांनी आम्हाला बरीच माहिती पुरवली . मग खरे भालचंद्र वाडके व त्यांच्या पत्नी यांना संपर्क करून बोलावून घेतल . ते दोघेही पोलीसांवर भरवसा ठेवून होते ! तू जीला सागरीका बनवून जगासमोर आणल होतस ती म्हणजे मधुमीता वाडकेंची कन्या हे रहस्यही समजल . मग आम्ही तातडीन हालचाली करून वाडकेंच्या मुलांची माहिती मधुमीताकडून मिळवली , आणि माॅरीशसहून त्यांना सोडवून आणल . ज्या दिवशी मीसेस सलढाणा बनून अजय तिला भेटायला गेला तेव्हाच त्यान सत्य मधुमीताला कथन केल . तिनही गुप्ततेन आमच्या प्लॅनला सहकार्य केल आणि आम्ही थेट तुझ्यापर्यंत पोहोचलो .
अरे नराधमा तू नुसता गुन्हाच केलेला नाहीस तर या मुलांच्या भावनांशीही खेळला आहेस तुला अत्यंत कठोर सजा होईल असा बंदोबस्त आम्ही केलाय . दुर्दैवान या सगळ्याचा छडा लागण्यास वीस वर्ष गेली . तुझ्या संपत्तीच्या लोभानच तुला पकडून दिल . आणि हो ज्या मृत्यूपत्रासाठी तू हा कारभार केलास ते वाडके यांच्या जवळच परत गेल कारण आयुष्याची दोरी बळकट होती त्यांची .
यानंतर भालचंद्र वाडके आणि परीवार सर्व जगासमोर आला . मधुमीता अजयच्या प्रेमात पडली होती तिन सरळ अजयला प्रपोज केल . अजय तर तिच मंजूळ बोलण ऐकूनच घायाळ झाला होता त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता . मोठ्या थाटात मधुमीता अजयचा विवाह वाडके पॅलेसमध्ये पार पडला , आणि सामसूम पडलेला वाडके पॅलेस पुन्हा एकदा गजबजला !

समाप्त

स्वलिखीत कथा

संपूर्ण काल्पनीक

वैभव नारायण जोशी
9604282133/7558644102

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.