मुक्कामी एसटी (भाग-२)

मुक्कामी एसटी(भाग-२)
...आम्ही सर्व मुले जेव्हा पारनेरच्या शाळेत पोहचलो तेव्हा तेथील शाळा तसेच तेथील खेळायचे रेखीव मैदान पाहून आम्ही सुखावलो आम्ही जरी सर्वजण आज विज्ञान प्रदर्शन पाहण्यास आलो असलो तरी आता ह्या क्षणाला आम्हा सर्व मुलांना मैदानावर जाऊन खो-खो आणि कब्बडी खेळू वाटत होते.

पण ते आज शक्य नव्हते आम्ही टेम्पोतून सर्व विद्यार्थी एका मागे एक करत उतरलो तेव्हा गुरुजींनी आम्हाला पुन्हा एका रांगेत उभे करत शिस्तीचा पाढा वाचायला सुरुवात केली तसे आम्ही सर्व मूल खरच खूप वैतागून गेलो आणि माझा मित्र गोट्या मला हळूच म्हणाला आपलं गुरुजी जिथं जाईन तिथं आपली चव घालवणार हे खरं आहे. आता सकाळीच साळत काय मग भजन झालं हुतं का हेच तर सांगितलं हुतं जपून पहा तोडफोड करू नका मस्ती करू नका आण माझ्याकडे त्यो तोंड करत म्हटला आजून काय म्हटलं र गुरुजी आपलं ,थोबाड बंद ठिवून बघा मी असं म्हणताच गोट्या जाग्याव गप झाला आण गुमान पुढं बघत गुरुजी परत सकाळाचाच पाढा गात आहेत ते तो आणि आम्ही सर्व जण ऐकू लागलो.

मनात आईचा विचार येऊ लागला अण्णा ला आजच म्हस विकाया जायचं हुतं का? आई कांद्याव असलं पाणी देत असल,खर तर तिला माया मूळ त्रास झाला परत म्या नाही आईला त्रास होऊ देणार एवढ्या बारीन आये मला माफ कर असं मी मनात म्हटले, माझ्या मनात विचार चालू असताना आम्ही पहिल्या वर्गात पोहचलो ही होतो, नव नवीन प्रयोग आमच्या समोर हुते असे प्रयोग आम्ही कधी पाहिले नव्हते, मला असे जमेल का? खरंच शिकायला हवे मी आता प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहू लागलो.

आपणही काही तरी घरी नक्कीच करून पहावे असं मनातून वाटू लागल हुतं.
ऐका मागे एक आम्ही सर्वजण शिस्तीमध्ये पहात होतो या मध्ये एक गोबर गॅसचा उपक्रम दाखवला हुता मला लय आवडला आण मनात म्या ठरवील की , घरी गेल्यावर गोबर गॅसचा प्रकल्प करून पहायचा आण.. आईला चुलीच्या धुरापासून मुक्त करायचं....!

दिवस भर वेगवेगळे उपक्रम पाहून आता मात्र खूप कंटाळा आला हुता म्या सहज माझ्या जोडीदार गोट्याला म्हटलं लय कंटाळा आला बघ गड्या मला , तसा गोट्या म्हटला तुला कंटाळा आला मला इथं मोकार झोप आली पण कुणी पाहिलं तर काय म्हणून मी झोपत नाही नाहीतर कवाच शाळेपुढच्या झाडाखाली ताणून दिली असती.

बराच वेळ झाल्याने आता आमची जेवायला सुट्टी झाली आम्ही सर्व मुलं मुली शाळेच्या आवारात असणाऱ्या गर्द झाडांच्या सावलीत मनसोक्त जेवण केले काही वेळाने आम्हाला आहे त्याच जागी पारनेरच्या शाळेच्या वतीने सुकी भेळ देण्यात आली होती. परंतु आताच जेवण झाल्यामुळे मी भेळ मोकळ्या झालेल्या डब्यात आहे तशीच ठेवून दिली.

आम्हा सर्वांना सूचना आली की विज्ञान प्रदर्शन समाप्त झाले असून काही वेळातच सर्वांनी शाळे समोरील मोकळ्या जागेत जमा व्हावे त्या सुचनेचे पालन करून आम्ही सर्व मूल मुली जमा झालो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या शाळेच्या आभार मानण्यासाठी भाषण देऊ लागल्या तसा गोट्या आता घोरायला लागला आणि मला म्हटला भाषण सम्प्ले की उठीव मला आणि बसल्या बसल्या घोरू लागला. सर्वांची भाषणे झाली आमच्या शाळेतील गुरुजींनीही भाषण.. दिली, आता साधारण संध्याकाळचे साडेपाच वाजले असावेत गुरुजींनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका रांगेत उभे केले आणि बजावून सांगितले आता आपण सर्व पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे कोणी कुठेही जायचे नाही आम्ही टेम्पो शाळेच्या मैदानात येण्याची वाट पाहू लागलो.

माझ्या मनात आता एकच विचार येत होता गोबर गॅस चा उपक्रम पुन्हा एकदा नीट पाहून यावे नाहीतर उद्या घरी गेल्यावर एखादी गोष्ट विसरलो तर पुन्हा कुठं पहायला मिळणार नाही त्यामुळे आता पुन्हा जाऊन एकदा वर्गात तो उपक्रम पाहिलाच पाहिजे असे मी मनाशी ठाण मांडले गुरुजींची नजर चुकवून मी सरळ वर्गखोल्यांमध्ये शिरलो घाई घाईत पाहू लागलो मला काही आठवेनाच आपण तो उपक्रम कुठे पहिला कुठल्या वर्गात पाहिला मी सर्व वर्गात आता शोधू लागलो यात माझा बराच वेळ गेला मी पुन्हा एकदा शाळेच्या गेट कडे वळून पाहिले सगळी मुलं अजूनही जाग्यावरच उभी होती. मला तेव्हा सहज आठवले की आपण तो उपक्रम पहिल्या वर्गात पहिला होता घाई घाईत पहिल्या वर्गात शिरलो समोरच पाहिले गोबर गॅस चा उपक्रम मनाला वेगळाच आनंद झाला एखादी मौल्यवान गोष्ट हारावी आणि मिळल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद मला झाला होता.
मी निरखून पाहू लागलो या व्यतिरिक्त मला पर्याय नव्हता कारण माया कडे तेव्हा वही पेन्सिल यातलं काहीच नव्हतं मी तेव्हाच मनाशी ठरवलं अस पुन्हा कुठं जायची येळ आली की वही परेन्सिल सोबत घेऊन जायचे पूर्ण पणे निरीक्षण करून घेतले यात माझा बराच वेळ गेला होता.

चेहऱ्यावर आता आनंद ओसंडून वाहत होता काहीतरी मिळवले याचा मला पूर्ण अनुभव आला परंतु तो आनंद जास्त वेळ टिकला नाही कारण मी जेव्हा वर्गाच्या बाहेर आलो तर समोरचे चित्र पाहून माझ्या पायाखालची वाळूच सरकली, आता काय करावे आणि काय नाही काय समजेना कारण काही वेळा पूर्वी समोर असणारी माझ्या शाळेतील मुलं व शिक्षक यातील मला समोर कोणीच दिसत नव्हते पुढे जाऊन पाहिले तर माझ्या नजरेस कोणीच दिसले नाही आहे त्याच जागी मी आता ढसा ढसा रडू लागलो...!.

वातावरण ही अचानक बदलले अकाशात काळे ढग फिरू लागले सगळीकडे जास्तच काळोख पसरला वाऱ्याचा वेग वाढत चालला चंद्रही ढगांच्या मागे पुढे लपाछपी खेळू लागला असं माझ्या पुढं पहिल्यांदाच घडत होते.

मी पूर्ण भयभीत झालो होतो इतक्यात माझ्या खांद्याव कोणीतरी हात ठेवला वातावरणात शांतता पसरली माझी हिम्मत होत नव्हती मागे वळून पाहण्याची ,
भरदस्त अवाज कानावर पडला का रडतुस र..! पोरा, घाबरत घाबरतच हळूच जीव एकवटून मागे पाहिले तर एक साधारण चाळीशी ओलांडलेल्या खाकी कपडे घातलेला एक माणूस होता आपण कोण मी अस विचारताच ते म्हटले मी या शाळेचा शिपाई वर्गखोल्यांना कुलूप लावत असताना तुझा रडताना आवाज कानावर आला म्हणून मी कोण रडत आहे ते पाहण्यासाठी आलो बरं तुझं नाव काय आण.. का रडतोस बरं, मी त्यांना घडलेली सर्व गोष्ट जशीच्या तशी सांगितली, ते मला धीर देत म्हटले काय घाबरू नको भाळवणी या गावी जाणारी मुक्कामी एसटी असते साडेसहा वाजता ती तुमच्या गावातून पुढं सरळ भाळवणीला जाते त्या एसटीने मी तुला बसून देतो चल सायकलिवर बस माग... स्टँड वर सोडतो आणि तिकिटाला पण पैसे देतो घाबरू नको, काही वेळातच पारनेरच्या एसटी स्टँड वर आम्ही पोहचतो तेव्हा तिथं एकही एसटी नसते आणि वातावरण अजूनच भयानक झालेले होते, मनात माझ्या विचारांचे काहूर माजले होते, माझी आई किती काळजी करत असलं, माझा अण्णा मला आता मरुस्तवर हानल, कसं बी करून आता लवकर घरला जायला पाहिजे बस, चौकशी करून शाळेचा शिपाई आले मला म्हणाले दररोज जाणारी एसटीत बिघाड झाला आहे तिला पर्यायी एसटी येवुस्तवर थांबावे लागेल.

माझ्याकडे तिथंच थांम्बल्या शिवाय काहीच पर्याय नव्हता रात्र होत चालली होती किर्रर्र अंधार आता बऱ्या पैकी पडला होता आईची आता आठवण जरा जास्तच येऊ लागली बिचारी माझ्यासाठी किती रडत असल ह्या विचाराने माझी जीव कासावीस झाला होता.

रात्रीचे नऊ वाजले पारनेर गोरेगाव भाळवणी अशी पाटी असलेली एसटी माझ्या समोर आली मला आता एक प्रकारे एसटी पाहूनच घरी पोहचल्या सारखे वाटू लागले. इतक्या रात्री मी प्रथमच प्रवास करणार होतो मी आता एसटीत बसायला निघालो तेव्हा त्या शिपायांनी मला पाच रुपये दिले आण.. काहीच न बोलता निघून गेला मला काही कळेना काहीच न बोलता ही व्यक्ती कसं जाऊ शकते मी आता एसटीत बसलो आणि स्टँड वर असणारे तीन चार पुरुष आणि तीन स्रिया बसल्या स्टँड पूर्ण मोकळे झाले इतक्या रात्री प्रवास करणारे आता कोणी राहिले नाही बहुतेक हीच शेवटची एसटी असावी त्या सर्व प्रवाश्यांकडे पाहिले तर नवलच वाटत होते एसटीच्या आतमधील गोलाकार हिरव्या निळ्या पिवळ्या बल्पांच्या प्रकाशात त्याचे चेहरे एकदम नटून थटून आल्यासारखे वाटत होते जसे की ते सर्व रात्रीच्या एखाद्या लग्नाला निघालेत.....
पुढील भागात......
(भाग-३)

marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.