उकड हंडी

विजय राउत

उकड हंडी
(1)
वाचक संख्या − 95
वाचा

सारांश

उकड हंडी साहित्य • बटाटे , वांगी • सुरण , रताळ • गाजर , फ्लॉवर • नवलकोल , मटाराचे दाणे • गवारीच्या शेंगा , पडवळ • तांबडा भोपळा • भोपळी मिरच्या आणि कांदे • थोडी कोथिंबीर . • भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार घ्यावं . सर्व मिळून अंदाजे दोन किलो भाज्या असाव्यात . मसाला :- • तिखट अर्धी वाटी • काळा मसाला अर्धी वाटी • मीठ एक टेबलस्पून • मोठया लिंबाएवढा गुळ • अर्ध्या नारळाचं खोबरं • हळद आणि दीड वाटी तेल . कृती • बटाटे , सुरण , नवलकोल आणि तांबडा भोपळा याच्या मोठया चौकोनी फोडी कराव्यात आणि गाजरं , वांगी , रताळी यांचे गोल जाड काप करावेत . • पडवळाचे जरा मोठे लांब गोल काप करावेत . गवारीच्या शेंगा निवडून सबंधच ठेवाव्यात . • फ्लॉवरचे मोठे तुरे काढावेत . कांद्याची सालं काढून भरण्यासाठी चिरा द्याव्या . • कोथिंबीर बारीक चिरावी . सर्व मसाला एकत्र करून कालवावा . कांद्यात आणि पडवळात भरावा . • सगळ्या भाज्या आणि उरलेला मसाला एकत्र करावा . त्यावर कच्चं तेल घालून कालवावं . • नंतर सर्व भाज्या जाड बुडाच्या पातेल्यात घालाव्यात . मंदाग्निवर ठेवाव्यात . • मधून मधून पातेलं कपड्यानं धरून अवसडाव्यात . भाजी शिजल्यावर उतरवावी . • पूर्वी ही उकडहंडी मातीच्या मडक्यात करत असत .

टिप्पण्या

एक टिप्पणी लिहा
साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.