संजय रोंघे
प्रकाशित साहित्य
437
वाचक संख्या
16,524
आवड संख्या
4

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

मी.... मी संजय रोंघे , नागपूर ला राहतो. विदर्भाच्या मातीत जन्मलो. विदर्भाच्या मातीतच हसत खेळात शिकून सवरून मोठा झालो. मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी नाही किव्वा मोठा पण नाही. बस तुमच्यातलाच एक, अगदी तुमच्या सारखाच, साधा सरळ, स्वतःतच रमणारा, अंतरात स्वप्न गुंफणारा, शक्य झालं तर ती पूर्ण करणारा, इतरांच्या सुख दुःखात आनंद शोधणारा, आहे त्यातच समाधान मानणारा, अत्याचार, अनाचार, अतिरेक बघून थोडा क्रोधीत, थोडा दुखी होणारा. असाच आहे मी. थोडा हळवा, कुठेही जुळवा , जोडून घेणारा. तुमच्यातच मिळून जाणारा. छंदही माझे साधेच. कधी कविता करायची, तर कधी लेखन. कधी वाचन तर कधी नुसतं भटकायचं. निसर्ग बघायचा. झाड झुडपे , किडा कीटक प्राणी यांच्यातचच रमून जायचं. चित्र काढण्याचा छंद आहे मला. टी व्ही बघणे हाही एक छंद आहेच बातम्या, सिनेमा, राजकारण, डिस्कवरी, नवं नवीन शोध, टेकनॉलॉजि संबंधी माहितीही डोक्यात घालतोच. मित्रांशी गप्पा टप्पा, गरजूंना मदत, काही सामाजिक कार्य यातही जमेल तसा सहभाग देतोच. मी काही कवी नाही पण कविता करण्याचा एक बऱ्यापैकी छंद आहे आणि वेळ मिळेल तेव्हा तो पूर्ण करतो . माझ्या बर्याचशा कविता दैनिक वर्तमान पत्रातही प्रकाशीत झाल्यात.आजकाल ई तंत्रधन्यांना द्वारे सोशल साईट्स वर आपले साहित्य टाकून ते इतरांपर्यंत पोचवण्याची जी संधी उपलब्ध झालेली आहे, त्याचा फायदा मी पण घेतोय. गूगल, फेसबुक व्हाट्स अँप या वर माझे अकाउंट उघडून त्यात मी माझे साहित्य टाकतो.या द्वारे मी बरेच मित्र मैत्रिणी गोळा केलेत. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला पण खूप खूप आनंद मिळतो. या छंदामुळे मला साहित्य क्षेत्रातील नामांकीत तसेच नव साहित्तीक मित्र मंडळी लाभली. यासाठी मी खुप आनंदी आहे. माझे शिक्षण : BE (Elect ), MBA कार्य : नोकरी सोबत शेती हि बघावीच लागते सहभाग : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे द्वारे आयोजित साहित्य संमेलनात सहभाग ; अखिल भारतीय वर्हाडी साहित्य संमेलनात सहभाग, इतरही बऱ्याच साहित्य संमेलनात सहभाग माझा ब्लॉग : https://spronghe.wordpress.com ; https://spronghe.blogspot.com माझा कवितेचा छंद अंतरातला एक बंध अवतरतो शब्द होउन धुंद दरवळतो दूरवर सुगंध . Sanjay R.


अजय कळसकर "Ajay"

481 अनुयायी

सूर "सुर"

13 अनुयायी

amol waykar

76 अनुयायी

सूर "सुर"

13 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.