विशाल लोणारी
प्रकाशित साहित्य
48
वाचक संख्या
171,091
आवड संख्या
5,700

चरित्र  

प्रतिलिपि सोबत:    

सारांश:

विशाल नारायण लोणारी नाशिक B.com M.A Freelance reporter माझ्याबद्दल बोलायचे झाले तर मी आजवर हे ठरवले नव्हते की माझी ओळख काय असणार आहे. पण, वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर मराठी वाचन लेखन अन परंपरेची आवड लागली. चार वर्ष झाली तसा मग फेसबुकवर लिहित आलोय, प्रेम कविता करणे मला खूप आवडते अर्थात मी तितकाच सीमित नाही. गेल्या वर्षीपासून पत्रकारीता शिकतोय मोठा लेखक आणि उत्कृष्ट पत्रकार होणे माझे स्वप्न आहे, धेय्य आहे. नाना पाटेकर, अशोक सराफ, पु ल देशपांडे, सौमित्र, गिरीश कुबेर, आदी काही व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. मला अनेक मित्र लाभलेत. काही जवळचे मित्र मात्र भौतिकरीत्या खूप दूर राहतात, खुपदा एकटे वाटते मला. मी आजवर अनेकदा मुलींच्या प्रेमात पडलोय, पण तरीही मी एकटा जगतोय, हे कुठेतरी मला लेखनाला उतप्रेरक ठरते. माझी प्रेयसी माझी स्पृहनीयताच आहे. माझा छोटासा ब्लॉगही आहे, त्यावर कधी कधी लिहित असतो.  आयुष्य सुखात जगायचे असेल तर लहान मुलांसोबत खूप वेळ घालवा. मी बी.कॉम केले आहे, आय. टी इंजीनियर डिप्लोमाही माझा झालाय पण लेखनाची जबरदस्त आवड़ त्या या दोन्ही क्षेत्रात सुटली नाही, स्वभाव असा की लहर येईल तसा रुख ठेवतो, मग म्हटले की ईथे वेळ घालवन्यात अर्थ नाही, त्या दरम्यान कविता लेख लिखाण तूफान चालू होते काही पुरस्कार पदरात आले, बाबाजी यांनी पहिल्यांदा उगवत्या ताऱ्याचा प्रकाश दिला, मग मी ठरवले आणि एम ए इन मासकॉम करायचे ठरवले. पुण्यात शिकायचे होते पण घराचे बांधकाम करायला घेतलेने इथेच पत्रकारीता शिकायचे ठरवले  सकाळ पेपरमध्ये एक महिना बातमीदारी केली, आता कॉलेजचे शेवटचे वर्ष आहे, सर्व मीडिया मी शिकतो आहे.  फेसबुकमुळे मला लेखन आसक्ती झाली. फेबवर अनेक मान्यवर भेटले तसेच पत्रकार बनत असल्याने शासन अधिकारी,राजकारणी, लेखक, कलाकार यांना भेट होत असतेच. मागे घुमान आणि नवी दिल्ली येथे गेलेलो, आयुष्यातला तो एक अनमोल आठवणी ठेवा मला या दोन शहरांनी दिला आहे. मागच्या महिन्यात एक लघुपट दिग्दर्शित केला, एका पटकथा तयार आहे. लोकसत्ताची भरतीपूर्व परीक्षा या वर्षी दिली, प्रयत्न जोरात चालू आहेत मीडियात शिरकाव करण्याचे लवकरच यशही मिळो. आपल व्यासपीठ, फेबूवर लिहित असतो, मला मुक्तहस्त लिहायला खुप3 आवडते, कधी तोल सुटतो, कळतनकळत मनात नसताना खुप दुखावुनही जातो, मात्र मला प्रेम वाटायला जास्त आवडते. ही झाली माझी जुजबी ओळख. बाकी माझ्याशी मैत्री केल्यावरच मी जास्त उलगडतो, तार्किक वागणे माझा स्थायीभाव आहे. परखडपणाचा मी पुरस्कर्ता आहे. आपल्यापुढे माझी ओळख करून देता आली याचा मला आनंद आहे


हर्षद बर्वे

1,469 अनुयायी

Shivaji Gorad

0 अनुयायी
marathi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया वर अनुसरण करा
     

आमच्या विषयी
आमच्यासोबत काम करा
गोपनीयता धोरण
सेवा अटी
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.